
Contents
Shirur News | शिरूर – बाभुळसर खुर्द येथे एकाच कुटुंबावर घातक हल्ला : गुन्हा गुन्हा दाखल
Shirur News Babhulkar Khurd
🗓️ दिनांक: 01 जुलै 2025 | स्थळ: बाभुळसर खुर्द, शिरूर, पुणे
Shirur News: बाभुळसर खुर्द, शिरूर येथे कुटुंबावर संगनमताने जीवघेणा हल्ला; गंभीर दुखापत आणि गुन्हा दाखल. रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गु. र. नं. 216/2025 अन्वये IPC कलमाखाली गुन्हा नोंद.
बाभुळसर खुर्द (ता. शिरूर) येथे दिनांक 29 जून 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता वृंदावन लॉन्स शेजारी राहणाऱ्या मनोज कुमार जगरनाथ सिंह यांच्या कुटुंबावर संगनमताने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गु. र. नं. 216/2025 अन्वये विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔴 गुन्ह्याची सविस्तर माहिती——
फिर्यादी श्री. मनोज कुमार सिंह (वय 42) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सकाळच्या सुमारास त्यांच्या घरासमोर काही आरोपींनी एकत्र येत बेकायदेशीर गर्दी करत त्यांच्या पत्नी बबीतादेवी सिंह यांच्यावर लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने, दगडाने व बांबूने गंभीर मारहाण केली.
फक्त पपईच्या झाडामुळे सांडपाण्याचा पाईप फुटल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपींनी हे भयानक कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पत्नीला वाचवण्यासाठी गेलेले मनोज सिंह आणि त्यांचा मुलगा आदर्शकुमार यांनाही आरोपींनी मारहाण केली.
👨👩👦 जखमी—–
1. मनोज कुमार सिंह – डोक्याला, चेहऱ्यावर व हातापायावर दुखापत
2. बबीतादेवी सिंह – डोक्याला व शरीरावर गंभीर मारहाण
3. आदर्शकुमार सिंह – पोटरी, डोके व हातावर मार
⚖️ कायदेशीर कारवाई——-
या प्रकरणात खालील आरोपींविरुद्ध IPC कलम 118(2),117(2),118(1),115(2),352,351(2)(3),189(2),191(2)(3),190 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे——
1. सौ. सविता संदीप रामफले
2. संदीप रामफले
3. आकाश संदीप रामफले
4. आकाश लहाने
5. आकाश लहाने याचे पालक (नाव अज्ञात)
6. दोन अनओळखी इसम
👮 तपास व कारवाई—–
• दाखल अंमलदार: पो. हवा जगदाळे
• तपास अधिकारी: पोसई कर्डीले
• पोलीस निरीक्षक: रांजणगाव MIDC पोलीस ठाणे
पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये या घटनेबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🔗
https://www.mahapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
https://pune.gov.in – पुणे जिल्हा प्रशासन
https://www.indiacode.nic.in – IPC कायदे
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून ••••••
Breaking News: शिरूर पोलिसांची गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर मोठी कारवाई!