
Contents
- 1 Shirur News; बाबुरावनगर मधुन 28 वर्षीय तरुण बेपत्ता!
- 1.1 Shirur News: बेपत्ता तरुण पहाटे रनिंग साठी गेला होता!
Shirur News; बाबुरावनगर मधुन 28 वर्षीय तरुण बेपत्ता!
Shirur News: बेपत्ता तरुण पहाटे रनिंग साठी गेला होता!
Shirur News 17 March 2025 : (Satyashodhak News Report)
Shirur News; बाबुरावनगर मधुन 28 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. हा बेपत्ता झालेला तरुण पहाटे रनिंग साठी घराबाहेर गेला होता.परंतु तो परत घरी आला नाही. त्याच्या नातलगांनी बाबुरावनगर, जांभळी मळा वगैरे अनेक ठिकाणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.पण तो सापडला नाही.शेवटी त्याच्या चुलत्यांनी याबाबत शिरूर पोलीस स्टेशन मधे या घटनेची नोंद केली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
सविस्तर घटनाअशी आहे—-
दिनांक 14 मार्च 2025 रोजी पहाटे साडेपाच वाजता मंगेश बबन खामकर वय. 28 -वर्ष राहणार – बाबुरावनगर, शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे हा घरातून निघुन जांभळी मळ्याकडे रनींगला गेला होता. तो अदयाप परत आलेला नाही. असे त्याची आई कल्पना बबन खामकर यांनी कळवले आहे. तरी,’ तु लवकर ये ! ‘ असेही सागितले आहे.तसेच ते त्याचा आजपर्यंत जांभळी मळा, शिरूर परिसरात शोध घेत आहेत. परंतु तो आजपर्यंत मिळून आला नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली आहे की तो कुठेतरी बेपत्ता झाला आहे.
Read more >>
Mulis Fus Dakhaun Palawale 13 वर्षीय मुलीला रात्री कोपीतुन फुस लावुन पळवले ?
Missing Man And Woman: एकच गाव , एकच दिवस एक महिला व एक पुरुष बेपत्ता झाले !
फिर्यादीच्या या चुलत भावाचे वर्णन पुढील प्रमाणे-
• नाव– मंगेश बबन खामकर ,
• वय – 28 वर्षे, • राहणार – बाबुरावनगर, शिरूर, • तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे
• उंची – 5 फुट 5 इंच, रंगाने गोरा, डोळे काळे ,चेहरा- गोल, नाक-सरळ, केस- काळे,
• अंगात पांढर्या रंगाचा फुल बाहयावा शर्ट ,पांढर्या रंगाची फुल पन्ट, पायात स्लीपर चप्पल,
• भाषा मराठी, हिंदी .
वरील वर्णनाचा फिर्यादी संदीप शिवाजी खामकर, वय-35 वर्षे, व्यवसाय- शेती, राहणार – टाकळी हाजी, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे यांचा चुलत भाउ मंगेश बबन खामकर ,वय- 28 वर्षे, राहणार – . बाबुरावनगर, शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे हा 14 मार्च 2025 रोजी पहाटे साडेपाच वाजता घरातुन निघुन जांभळी मळ्याकडे रनिंगला गेला होता. तो परत घरी न आल्याने त्यांनी त्याचा शोध होण्याची विनंती शिरूर पोलीस स्टेशन मधे केली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन मधे मीसिंग असा नोंद—

शिरूर पोलीस स्टेशन मधे मीसिंग रजिस्टर नंबर – 44 / 2025 असा नोंद करण्यात आला आहे.दाखल अमंलदार पोलिस हवालदार टेंगलेसाहेब आहेत. तर पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. कोथळकर हे करत आहेत. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
Read more >>
शिरुर पोलीस स्टेशनला सलग तीन गुन्ह्यांत आरोपी ‘अज्ञात’ !
ही असुरक्षितता का?—-
व्यक्ती बेपत्ता होण्याच्या घटनांची शिरुर शहर व शिरूर तालुक्यात लक्षणीय वाढ होत आहे. याची कारणे काय आहेत? हे पाहता असुरक्षितता हेच आहे. ही असुरक्षितता का निर्माण झालेली आहे. याचा विचार कौटुंबिक व सामाजिक पातळीवर होणे आवश्यक आहे.
वाढती लोकसंख्या,विश्वासु मित्र मैत्रिणी,नातलग व समाज यांचा वाढता अभाव ,मानसिक कारणे इ.असु शकतात. वाढती गुन्हेगारी हे ही एक महत्वाचे कारण नक्कीच आहे.दाणेवाडी प्रकरणानंतर ही बाब जास्त अधोरेखित झाली आहे.साहजीकच अशा घटनेनंतर कुटुंब भयभित होते.अनेक शंकांनी काळजीत पडते.पोलिस यंत्रणेला कामाला लागावे लागते.एकुणच बेपत्ता होण्याच्या घटना सामाजीक स्वास्य बिघडत असल्याचे निदर्शक आहे.