
Contents
Shirur News – शिरूरमध्ये रासायनिक खतांचा बेकायदेशीर साठा उघड – दोन आरोपींवर गुन्हा दाखल
Shirur News Illegal Chemicals
दिनांक 29 मे 2025 | सत्यशोधक न्युज
शिरूर तालुक्यातील नावरे गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा बेकायदेशीर साठा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा क्र. 363/2025 नुसार भा.दं.वि. कलम 318(4), 3(5), रासायनिक खते नियंत्रण आदेश 1985 चे विविध कलम, तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📌 गुन्ह्याची ठळक माहिती पुढीलप्रमाणे —
✅ गुन्हा दाखल तारीख व वेळ : 28/05/2025 रोजी सकाळी 06:19 वा.
✅ घटनास्थळ : गाव नावरे, ता. शिरूर, गट नं. 313, नावरा-गुणाठ रस्ता शेजारी
✅ घटनेचा कालावधी : 27/05/2025 रोजी सायं. 05:30 वा.
✅ फिर्यादी : धनंजय दिनकर पाटील, वय 53 वर्षे, राह. सण ओर बीट, सिंहगड रोड, पुणे
✅ आरोपी :
1. संतोष दिनकर वेताळ, राह. न्हावरा, ता. शिरूर
2. महेंद्र गणपत शेलार, राह. न्हावरा, ता. शिरूर
✅ 🧾 जप्त मालमत्ता :
✅ अमोनियम सल्फेट खत – 917 बॅगा (40 किलो प्रति बॅग) – किंमत ₹8,71,150/-
✅ मॅग्नेशियम सल्फेट कात – 11 बॅगा (25 किलो प्रति बॅग) – किंमत ₹7,150/-
✅ एकूण किंमत : ₹8,78,300/-
⚖️ गुन्ह्याचा तपशील :
शासकीय परवानगीशिवाय आरोपींनी अमोनियम सल्फेट व मॅग्नेशियम सल्फेट या खतांचा साठा केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या रासायनिक खतांच्या साठ्यामुळे पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. शासनाची फसवणूक करत बेकायदेशीररित्या खत साठवणाऱ्या आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
👮 पोलिस तपास :

✅दाखल करणारे अंमलदार : पो.ह. शिंदे
✅ तपास अधिकारी : पोलीस उपनिरीक्षक चव्हाण
✅प्रभारी अधिकारी : संदेश केंजळे
आणखीन उपयुक्त माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा —–
1. The Essential Commodities Act, 1955 – India Code
2. Fertilizer (Control) Order, 1985 – Department of Agriculture
3. IPC Indian Penal Code – Bare Acts Live
सत्यशोधक न्युज च्या आणखीन उपयुक्त बातम्या व लेख वाचण्यासारखी खालील लिंक वर क्लिक करा. ..
Breaking News Ranjangaon Lady Murder: रांजणगावमध्ये महिला आणि दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या!