
Contents
- 1 Shirur News: “शिरूरकरांना पाणीटंचाई जाणवू देणार नाही..!”- आमदार श्री.माऊली आबा कटके !
- 1.1 Shirur News: कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी उपलब्ध करून देणार !
- 1.2 आमदार माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांना यश—
- 1.3 Shirur News:दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता—
- 1.4 आजपासून पूर्ववत दररोज पाणीपुरवठा सुरू होणार—
- 1.5
- 1.6 खास भेट:
- 1.7 Shirur News: नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन—-
Shirur News: “शिरूरकरांना पाणीटंचाई जाणवू देणार नाही..!”- आमदार श्री.माऊली आबा कटके !
Shirur News: कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी उपलब्ध करून देणार !
Shirur Satyashodhak News 29 March:

Shirur News: “शिरूरकरांना पाणीटंचाई जाणवू देणार नाही..!” असे आमदार श्री.माऊली आबा कटके यांनी सांगितले आहे. अशी माहिती सुत्रांकडुन ‘सत्यशोधक न्युज ‘ ला प्राप्त होत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातुन हे पाणी उपलब्ध करून देणार असल्याचे समजते.
Read more >>
Shirur Jalit Kand : न्हावरा येथील कंपनीत जळीत कांड घडले ! 5 कोटी रुपयांचे नुकसान? (पहा व्हिडिओ सह)
आमदार माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांना यश—
शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. शिरूरकरांना त्यांनी दिलासा दिला आहे. शिरूर शहरातील पाणी टंचाईवर अखेर तोडगा निघाला आहे. आज पासून नियमित पाणीपुरवठा सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आमदार माऊली आबा कटके यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि तातडीच्या हालचालींमुळे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ACHIEVEMENT. ..
Read more >>
Shirur News:दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता—
20 मार्च पासून सुरू झालेल्या दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. उन्हाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ नये. म्हणून आमदार माऊली आबा कटके यांनी तत्काळ पाणीपुरवठा विभाग, नगरपरिषद अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
आजपासून पूर्ववत दररोज पाणीपुरवठा सुरू होणार—
त्यानुसार आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आजपासून पूर्ववत दररोज पाणीपुरवठा सुरू होणार आहे. आमदार कटके यांच्या पुढाकारामुळे शिरूरकरांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये. यासाठीही पुढील नियोजन करण्यात येत आहे. “शिरूरवासीयांना पाणी टंचाईचा त्रास होऊ देणार नाही. भविष्यातही योग्य नियोजन करून सतत पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या” असल्याचे आमदार माऊली आबा कटके यांनी सांगितले.
Read more >>
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
Shirur News: नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन—-
नगरपरिषदेने नागरिकांना जबाबदारीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. पाणी साठवताना दक्षता घ्यावी. गळती टाळावी. गरजेपुरतेच पाणी वापरावे. असे नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सांगितले आहे.