
Contents
- 1 Shirur News Theft: शिरूरमध्ये उसतोड मजुराकडून दुचाकी आणि रोख रक्कम चोरी
- 1.0.1 घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे —
- 1.0.2 Shirur News Theft चा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल—
- 1.0.3 चोरीस गेलेली मालमत्ता पुढीलप्रमाणे —
- 1.0.4 Shirur News Theft मधे विश्वासघात करणारा मंजूर?—
- 1.0.5 पोलीस तपास सुरू–
- 1.0.6 शिरूर परिसरात वाढती चोरीची प्रकरणं—
- 1.0.7 सुरक्षेसाठी उपाय—-
- 1.0.8 आणखीन उपयुक्त माहितीसाठी खालिल लिंक तपासा. ..
- 1.0.9 निष्कर्ष काय निघतो!?—-
- 1.0.10 About The Author
Shirur News Theft: शिरूरमध्ये उसतोड मजुराकडून दुचाकी आणि रोख रक्कम चोरी
Shirur News Theft 25 May: (Satyashodhak News Report )
Shirur News Theft:शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात एका शेतकऱ्याच्या घरातून तब्बल ₹१.१० लाखांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. Shirur News Theft या प्रकारात उसतोडकामगार म्हणून काम करणाऱ्या इसमानेच विश्वासघात करत चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे —
शेतकरी मोहन निवृत्ती सरके (वय ४३, रा. न्हावरे, निंबाळकर वस्ती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी लखन पांडुरंग अडागळे (रा. पाणीटाकी जवळ, डोमलगाव, ता. अंबड, जि. जालना) याने दिनांक २३ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजता त्यांच्या घराजवळून एक चेतक इलेक्टिक दुचाकी (MH 12 XP 4407) व घरातील कपाटातून ₹१०,००० रोख रक्कम चोरी केली आहे.
Shirur News Theft चा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल—

या चोरीसंदर्भात गुन्हा रजिस्टर नंबर 353/2025 नुसार भारतीय दंड संहिता BNS 306 अंतर्गत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीस गेलेली मालमत्ता पुढीलप्रमाणे —
1. बजाज चेतक इलेक्टिक स्कूटर – आर.टी.ओ. क्रमांक MH12XP4407, पांढऱ्या रंगाची व हिरवी नंबर प्लेट असलेली.
• चासी नंबर: MD2C59209RAH49030
• इंजिन नंबर: E20ARH61080
• अंदाजे किंमत: ₹१,००,०००
2. रोख रक्कम: ₹१०,००० (५०० रुपयांच्या २० नोटा)
• एकूण नुकसान: ₹१,१०,०००
Shirur News Theft मधे विश्वासघात करणारा मंजूर?—
या चोरीमध्ये महत्त्वाचं म्हणजे, आरोपी लखन अडागळे हा फिर्यादी मोहन सरके यांच्या शेतात उसतोड मजूर म्हणून काम करत होता. कामानिमित्ताने त्याचा घरात मोकळा प्रवेश होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने चावीसह दुचाकी व रोख रक्कम चोरली आणि पसार झाला.
पोलीस तपास सुरू–
सदर गुन्ह्याचा तपास एएसआय बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, गुन्हा एएसआय थेऊरकर यांनी दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे हे शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असून, या प्रकरणातील पुढील तपास त्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
शिरूर परिसरात वाढती चोरीची प्रकरणं—
या घटनेमुळे शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः उसतोडकामगार, मजूर यांच्यावर विश्वास ठेऊन कामावर ठेवण्यासंबंधी नागरिक आता अधिक सतर्क झाले आहेत.
सुरक्षेसाठी उपाय—-
• घरातील मौल्यवान वस्तूंची योग्य काळजी घ्या.
• नवीन कामगार नेमण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी तपासा.
• दुचाकी किंवा चारचाकी चावी सुरक्षित जागी ठेवा.
• घरात CCTV कॅमेरा लावा.
आणखीन उपयुक्त माहितीसाठी खालिल लिंक तपासा. ..
शेतकरी कर्जमाफी व योजना माहिती
निष्कर्ष काय निघतो!?—-
Shirur News Theft प्रकारातील ही घटना एक इशारा आहे – विश्वासास पात्र वाटणाऱ्या व्यक्तीकडून देखील धोका होऊ शकतो. पोलिसांनी वेगाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक होईल, अशी अपेक्षा आहे.
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
Shirur News Baburavnagar 1 Year’s Old Child Dead :बाबूरावनगरमध्ये १ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू!