
शिरुर न्यायालयचा महत्वपुर्ण निर्णय !
शिरूर न्यायालयाकडुन सुरेश ओतारी यांना सक्तमजुरीची शिक्षा
शिरूर, दिनांक २० आगस्ट २०२५ | प्रतिनिधी |
शिरुर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील गुन्हा क्रमांक 824/2017 मध्ये आरोपी सुरेश ज्ञानोबा ओतारी याला शिरुर न्यायालयाने भादवी कलम 323 आणि 452 अंतर्गत 6-6 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
ही मारामारीची घटना घडली होती. असे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे. त्याबाबत गुन्हा शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंदवण्यात आला होता.नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. असे समजते आहे.
शिरुर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील एका गुन्हा क्रमांक 824/2017 अन्वये दाखल प्रकरणात दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
या प्रकरणात आरोपी सुरेश ज्ञानोबा ओतारी ,वय -61 वर्षे, राहणार- डंबेनाला, तालुका- शिरुर, जिल्हा – पुणे याला भादवी कलम 323 खाली 6 महिने सक्त मजुरी व भादवी कलम 452 खाली 6 महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
🔎 प्रकरणाचा तपशील—
• पोलीस स्टेशन: शिरुर पोलिस स्टेशन
• गुन्हा क्रमांक: 824/2017
• कलमे: 452, 324, 323, 504, 506
• केस नंबर: आर.सी.सी. 166/2017
• प्रभारी अधिकारी: पोलीस निरीक्षक संदेश केंजळे
• तपास अधिकारी: पोलीस हवालदार उमेश भगत.
• सरकारी वकील: सागर वसंत कदम (सहाय्यक सरकारी अभियोक्ता)
• जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी: पोलीस निरीक्षक संतोष घोळवे
• कोर्ट पैरवी अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक नकाते
• कोर्ट अंमलदार: पोलीस हवालदार तुकाराम गोरे , महिला पोलीस अंमलदार मनीषा फंड.
• कोर्ट: मे. झारी सो कोर्ट
⚖️ निकालाचा सारांश—
आज दिलेल्या निकालानुसार आरोपीला एकूण 12 महिन्यांची सक्त मजुरी भोगावी लागणार आहे. या निकालामुळे पीडित पक्षाला न्याय मिळाला असून पोलिस यंत्रणेच्या तपासाची व सरकारी वकिलांच्या युक्तिवादाची दखल न्यायालयाने घेतली आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••
‘सत्यशोधक’ च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून ••••
शिरूर दरोडा : दरोडेखोरांनी केला १,४०,००० रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास!
शिरूर : पाणी भरताना महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू, अकस्मात मृत्यूची नोंद!
Breaking News Bangladeshi In MIDC: चक्क ४ बांगलादेशी नागरिक रांजणगाव MIDC !
पण त्याचा गुन्हा काय होता ते नमूद करा अशी अर्धवट माहिती नका देऊ