📰 शिरूर – पार्किंग मधून मोटरसायकल चोरी, गुन्हा दाखल
शिरूर ,दि. १० नोव्हेंबर 2025|प्रतिनिधी|
प्रितमप्रकाश नगर, यशोदाई बिल्डींगच्या पार्किंग परिसरातून एक मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली असून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 795/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दयानंद भिमराव पटेकर (वय 29, रा. शिरूर, मूळ रा. कोथिबीरवाडी, जि. बीड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 06 नोव्हेंबर रोजी रात्री 09.00 वाजेपासून ते 07 नोव्हेंबर रोजी रात्री 08.00 वाजेपर्यंतच्या वेळेत, त्यांच्या HF Deluxe (Hero Company) मोटरसायकल क्रमांक MP-41-N-1224 ही पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने चोरी केली.
मोटरसायकल तपशील:
किंमत : ₹10,000/-
रंग : सिल्वर
चेसी नंबर : MBLHA0292J9A00108
इंजिन नंबर : HA11EMJ9A08775
या प्रकरणी BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपास पो. हवा. शिंदे यांनी केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या प्रकरणाचे निरीक्षण पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
