
Contents
प्रतिबंधीत तंबाकुजन्य पदार्थ विक्री करणार्यावर कारवाई !
प्रतिबंधीत तंबाकुजन्य पदार्थ विकत होता नम्रता काम्प्लेक्स मधे !
शिरुर , दिनांक 14 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

प्रतिबंधीत तंबाकुजन्य पदार्थ विक्री करणार्यावर कारवाई करण्यात आली आहे. हा प्रतिबंधीत तंबाकुजन्य पदार्थ विकत होता नम्रता काम्प्लेक्स मधील एका पानटपरीत ! शिरुर पोलिसांनी काल एका कफे चालकावर तर आज प्रतिबंधीत तंबाकुजन्य पदार्थ विक्री करणार्यावर कारवाई केली आहे.
Read more >>
कफे चालकावर गुन्हा दाखल : कफे मधे मुला मुलींना, ‘ खास ‘ पार्टिशन?
Breaking News ब्रेकींग न्युज : 6 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटरसायकल चोरी करणार्यास अटक !
प्रतिबंधीत तंबाकुजन्य पदार्थांची विक्री करणारा पानटपरीधारक हा नम्रता काम्प्लेक्स मधील साईदरबार पानवाला,नाव – शाहरुख याकुब शेख ,वय 32 वर्षे, राहणार- रम्यनगरी,मुंबई बाजार,शिरुर हा आहे. सिगारेट व अन्य तंबाकुजन्य पदार्थ , (जाहिरात प्रतिबंध व पुरवठा वितरण यांचे विनीमय ) सनातन 2023 कायदा कलम 4, 24 अन्वये गुन्हा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more>>
शिरुर पोलिस आज शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यामधे पोलिस उप निरीक्षक श्री. शुभम चव्हाण, नितेश थोरात , विजय शिंदे, नीरज पिसाळ हे होते.
त्यावेळी शोध घेत असताना वरील टपरीचालक प्रतिबंधीत तंबाकुजन्य पदार्थांची विक्री करत होता. असे आढळले. म्हणुन आज ही कारवाई करण्यात आली आहे.
Read more>>
वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस अधिक्षक ,पुणे ग्रामीण श्री. पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक, पुणे विभाग श्री. रमेश चोपडे, उप विगागीय पोलिस अधिकारी, शिरुर विभाग श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदेश केंजळे ,पोलीस निरीक्षक ,शिरुर, पोलिस सब इन्पेक्टर श्री. शुभम चव्हाण, नितेश थोरात ,विजय शिंदे, नीरज पिसाळ ,अजय पाटील यांनी काल व आज हे अभियानच सुरु केले आहे.
आणखीन कसुन तपास करत वेगवेगळ्या बेकायदा धंद्यांच्या ठिकाणी जाऊन कसुन तपास व कारवाई करण्यात यावी. अशी शिरुर मधील नागरिकांना अपेक्षा आहे.