
Breaking News Ranjangaon MIDC: रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन.
Contents
- 1 रांजणगाव पोलिस यांच्याकडुन कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 10 मुद्यांवर मिटिंग: कोनत्या ते वाचा….
- 1.1 रांजणाव पोलिस व एम आय डी सी तील कंपन्यांमधे महत्वाची मिटींग संपन्न ! नागरिकांनी अवश्य ही माहिती समजुन घ्यावी !
- 1.1.1 शिरुर,दिनांक 19 जानेवारी 🙁 ‘सत्यशोधक न्युज’ रिपोर्ट )
- 1.1.2 रांजणाव पोलिसांकडुन शासनाच्या 100 व्या उपक्रमाच्या अंतर्गत महत्वाचे उपक्रम !
- 1.1.3 ‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
- 1.1.4 रांजणगाव पोलिस आयोजित मिटिंगमध्ये 10 मुद्दे !
- 1.1.5 रांजणगाव पोलिस आयोजित मिटिंगमध्ये वरिष्ट पोलिस अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित !
- 1.1.6 About The Author
- 1.1 रांजणाव पोलिस व एम आय डी सी तील कंपन्यांमधे महत्वाची मिटींग संपन्न ! नागरिकांनी अवश्य ही माहिती समजुन घ्यावी !
रांजणगाव पोलिस यांच्याकडुन कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 10 मुद्यांवर मिटिंग: कोनत्या ते वाचा….
रांजणाव पोलिस व एम आय डी सी तील कंपन्यांमधे महत्वाची मिटींग संपन्न ! नागरिकांनी अवश्य ही माहिती समजुन घ्यावी !
शिरुर,दिनांक 19 जानेवारी 🙁 ‘सत्यशोधक न्युज’ रिपोर्ट )

रांजणगाव पोलिस यांच्याकडुन कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 10 महत्वाच्या मुद्यांवर मिटिंग घेण्यात आली आहे. ते इथे अवश्य वाचा !
रांजणाव पोलिस व एम आय डी सी तील कंपन्यांमधे ही महत्वाची मिटींग संपन्न झाली आहे. नागरिकांनी अवश्य ही माहिती समजुन घ्यावी ! आणि त्यावर आपली मते संबंधित पोलिस अधिकार्यांना कळवणे ही नागरिक म्हणून सर्व नागरिकांची जबाबदारी आहे.
रांजणाव पोलिसांकडुन शासनाच्या 100 व्या उपक्रमाच्या अंतर्गत महत्वाचे उपक्रम !
महाराष्ट्र शासनाच्या 100 व्या उपक्रमाच्या अंतर्गत रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कंपनी व्यवस्थापक / मॅनेजर यांची ‘रिया मीटिंग हॉल’ कारेगाव ,तालुका -शिरूर ,जिल्हा पुणे येथे मीटिंग घेण्यात आली आहे. रांजणगाव एम आय डी सी मधील कंपन्या विनियम करण्यात व प्रशासन यामुळे समन्वय राहावा, कायदा व सुव्यवस्था या अनुषंगाने विविध विषयावर विचार विनिमय या बेठकीत करण्यात आला.
Read more >>
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांचा ‘करेक्ट गेम’! ‘डिझेल चोरां’च्या टोळीचा केला पर्दाफाश !(पहा व्हिडिओसह)
रांजणगाव एम आय डी सी त मोठा बेकायदा गुटका साठा पोलिसांना सापडला !
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog
रांजणगाव पोलिस आयोजित मिटिंगमध्ये 10 मुद्दे !
1. कंपनीमध्ये महिला कामगार यांची वाढती संख्या लक्षात घेता महिलांच्या सुरक्षितते करता कंपनी अंतर्गत ‘पॉस कमिटी‘ नेमणे बाबत विचार विनिमय करण्यात आले आहे.

2. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने कंपनी अंतर्गत येणारे सर्व कामगार यांच्यात जनजागृती करण्या बाबत कार्यक्रम आयोजित करणे .
3. कोनत्याही कंपनीस कोणी ब्लॅकमेल करून खंडणी अथवा कामाची मागणी करीत असल्यास तत्काळ तक्रार करणे.
4. कंपनीमध्ये काम करणार्या कामगारांची ‘चरित्र तपासणी ‘ करून घेऊन सर्व कामगारांची माहिती पोलीस स्टेशन येथे देणे.
5. कारेगाव ,ढोक सांगवी ,रांजणगाव गणपती या गावांमध्ये राहत असलेले कामगार भाडेकरू यांनी भाडेकरू ची माहिती पोलीस स्टेशन येथे देणे.
6. कंपनीमध्ये बालकामगार काम करणार नाहीत. याची काळजी घेणे.
7. एम आय डी सी अंतर्गत सार्वजनिक महिला स्वच्छता गृह उभारणी करणे बाबत एम आय डी सी ने पुढाकार घेणे.
8. वाहतूक समस्या वाढत असल्याने वाहतूक कोंडी होण्यासाठी कंपनी व्यवस्थापक व ‘रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशन‘;’ रिया‘ यांच्याकडून चाईल्ड वॉर्डन उपलब्ध करणे.
9. आय टी आय कॉलेज रोडवरील आठवडा बाजारच्या मुळे कंपन्यांच्या कामात अडथळा येत असलेले बाजार इतरत्र हलविणे. त्यासाठी एम आय डी सी कडून जागा उपलब्ध होणार असून त्याबाबत पत्रव्यवहार करणे.
10. 112 या एमरजन्सी नंबरचा पोलीस मदतीसाठी प्रभावी वापर व्हावा यासाठी प्रयत्न करणे.
रांजणगाव गणपती एम आय डी सी त 75000 हजार रुपयांची खंडणी ? शिरुरच्या दोघांवर गुन्हा दाखल !
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
रांजणगाव पोलिस आयोजित मिटिंगमध्ये वरिष्ट पोलिस अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित !
अशा वरील विषयांवर चर्चा होऊन उपाययोजना करण्याबाबत ठरले आहे. सदर मीटिंग करता श्री. प्रशांत ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी ,शिरूर विभाग, श्री. महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक ,रांजणगाव गणपती एमआयडीसी पोलीस स्टेशन, मिलिंद कासार ,उपअभियंता एमआयडीसी, श्री. अशोक चव्हाण साहेब, पोलीस निरीक्षक रांजणगाव पोलीस स्टेशन, श्री ब्रह्मा पवार, श्री. विवेक ग्रामसेवक कारेगाव, श्री. बी .एन. शुक्ला , ‘रिया व्हाईस’ चेअरमन ,श्री .नितीन पाठक ,बोर्ड सदस्य , श्री जीवन कंपनी व इतर 50 ते 60 कंपनीचे प्रतिनिधी या वेळेस हजर होते.
वरील मिटिंग होणे आवश्यक होते. रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन च्या कार्यक्षेञासाठी वरील दहा मुद्दे व त्यांवर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. येथे महिला कामगार मोठ्या संख्येने काम करतात.त्यांची सुरक्षिततता आणि त्यांच्या साठी दोन तीन ठिकाणी वाशरुम ची सोय असणे गरजेचे आहे. सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत प्रत्येक मोबाइल किंवा इंटरनेट वापरणार्या व्यक्तीची ,’सायबर सुरक्षा अवेअरनेस’ असणे गरजेचे आहे. अनेक परप्रांतीय तसेच राज्यातील इतर भागातील गुन्हेगार लपण्यासाठी या परिसरात भाड्याने रुम घेउन राहण्याच्या घटना घडल्या होत्या. म्हणुन भाड्याने रुम देताना घर मालकाने भाडेकरूची माहिती घेणे आवश्यक आहे. ती पोलिसांकडे देणे प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी आवश्यक आहे. इ.सर्व बाबी महत्वाच्या आहेत.