
Shirur Rod Attack at Marriage Function : शिरूर: विवाह समारंभात रॉडने हल्ला!
Shirur Rod Attack at Marriage Function : एक जण गंभीर जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखव!
Shirur 15 May 2025:(Satyashodhak News Report)
Shirur Rod Attack at Marriage Function: मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील पुण्याई मंगल कार्यालयासमोर एका विवाह समारंभात रागाच्या भरात रॉडने मारहाण करून एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना 13 मे रोजी दुपारी 4.10 च्या सुमारास घडली.
फिर्यादी : ऋषीकेश नितीन जाधव (वय 23, व्यवसाय – सलून, रा. नानगाव, ता. दौंड) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
घटनेचा तपशील असा—
फिर्यादी ऋषीकेश हे आपल्या गावातील आबा गुंड यांचे मुलीच्या विवाह समारंभासाठी पुण्याई मंगल कार्यालयासमोर उपस्थित होते. यावेळी संदीप दत्तात्रय शेलार, हर्षद बाळासो खळदकर व विशाल केशव खळदकर (सर्व रा. नानगाव, ता. दौंड) यांनी “तु कृष्णा लोंढे याचे घरी का मदत करतो?” या कारणावरून वाद घातला.
खाली पाडून लाथाबुक्यांनी पोटात, छातीवर मारहाण—-
संदीप शेलार याने हातातील लोखंडी रॉडने ऋषीकेश यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर हर्षद आणि विशाल यांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्यांनी पोटात आणि छातीवर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल—
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. 325/25 प्रमाणे भा.दं.वि. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी:
पो. ह. खबाले हे तपास करत असून दाखल अंमलदार पो. ह. वाडेकर व प्रभारी अधिकारी पो. नि. केंजळे आहेत.
हे ही वाचा…
शिरूर : आठ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल – जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात मारहाण आणि शिवीगाळ
मांडवगण फराटा येथील अवधूत ज्वेलर्समध्ये चोरी:दोन महिलांची केली ३२,००० रुपयांच्या अंगठीची चोरी !