Contents
📰 शिरूर शहरातून 19 वर्षीय मुलगी बेपत्ता — शिरूर पोलीसांनी तपास सुरू !
शिरूर | 19 नोव्हेंबर 2025 | प्रतिनिधी |
शिरूर शहरातील रामलिंग रोडवरील ओआयसीस सोसायटी येथून 19 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद आज शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बेपत्ता मुलगी शोधण्यासाठी पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला असून नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🔎 काय आहे घटना?
➡️ बेपत्ता व्यक्ती: नाव गुप्तता (वय 19 वर्षे 9 महिने)
➡️ पत्ता: ओआयसीस सोसायटी, रामलिंग रोड, शिरूर (मूळ गाव — अजयबाग कॉलनी, इंदूर, मध्यप्रदेश)
➡️ बेपत्ता होण्याची वेळ: 19 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 8:28 वाजता
➡️ माहिती देणार : योगेश रविंद्र आव्हाड (वय 35, रा. ओआयसीस सोसायटी)
निवेदकांच्या म्हणण्यानुसार, सकाळी घरातून कोणालाही काही न सांगता ही मुलगी कुठेतरी निघून गेली असून तिचा काहीही मागोवा लागत नाही.
👧 मुलगीचे वर्णन
- उंची: 5 फूट
- केस: काळे
- रंग: गोरा
- बांधा: सडपातळ
- चेहरा: उभट
- अंगावरील कपडे: पांढरा टी-शर्ट, तपकिरी पॅन्ट
- भाषा: मराठी व हिंदी
📝 पोलीस नोंद
- मानव मिसिंग नोंद क्रमांक: 178/2025
- नोंद वेळ: 19/11/2025 रोजी रात्री 10:37 वा. (नोंद क्र. 59/25)
- नोंद अंमलदार: पो.ह.वा. पवार
- तपास अधिकारी: पो.ह.वा. जगताप
- प्रभारी अधिकारी: मा. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे
🚨 नागरिकांना आवाहन
कोणाला ही मुलगी दिसल्यास किंवा संबंधित माहिती मिळाल्यास
ताबडतोब शिरूर पोलीस स्टेशन किंवा मो. 9146384137 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Read more >>>>>>
शिरूरमध्ये जातीवाचक शिवीगाळ ,धमकी,व मारहाण प्रकरणी पाच आरोपींवर ‘अट्रासिटी’चा गुन्हा दाखल?
रांजणगाव येथे दरोडा – महिलांचे दागिने लुटले!
