
Contents
- 1 Shirur Shanti Nagar News: शिरूरममधील शांतीनगर मधे हळदीच्या कार्यक्रमात वाद, महिलेसह मुलाला मारहाण !
Shirur Shanti Nagar News: शिरूरममधील शांतीनगर मधे हळदीच्या कार्यक्रमात वाद, महिलेसह मुलाला मारहाण !
Shirur Shanti Nagar News 19 April 2025:
(Satyashodhak News Report )

Shirur Shanti Nagar News: शिरूर शहरातील शांतीनगर येथे हळदीच्या कार्यक्रमादरम्यान किरकोळ वादातून महिलेसह मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील पुढील प्रमाणे—
दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दीक्षा मोहन राखपसरे (वय -30, व्यवसाय मजुरी, राहणार- शांतिनगर, शिरूर) या आपल्या सासू लिलाबाई राखपसरे व मुलगा श्रेयश यांच्यासह प्रकाश विठ्ठल लोंढे यांच्या घरी मुलगा श्रेयश व प्रकाश यांच्यात पूर्वी झालेल्या वादाविषयी बोलणी करण्यासाठी गेल्या होत्या.
Read more >>
शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी —
तेव्हा आरोपी गंगा विठ्ठल लोंढे, प्रकाश विठ्ठल लोंढे आणि कैलास विठ्ठल लोंढे (सर्व राहणार – शांतिनगर, शिरूर) यांनी फिर्यादी दीक्षा व त्यांच्या सासूला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच प्रकाश लोंढे याने श्रेयश याला काठीने मारहाण केली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
Read more >>
Shirur Shanti Nagar News: शिरूरममधील शांतीनगर मधे हळदीच्या कार्यक्रमात वाद, महिलेसह मुलाला मारहाण !
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल—-
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. 261/2025 अन्वये खालील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे:BNS 115 (2), 118(1), 352, 351(2)(3), 3 (5)गुन्ह्याचा तपास पो. हवा/खेडकर हे करत आहेत.
Read more >>
स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण—-
ही घटना शिरूरमध्ये खळबळ उडवणारी ठरली असून, शांतिनगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत गुन्हा दाखल केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३१ मध्ये काय वाचाल ..👇
• भारताच्या शासन संस्थेचे सर्वंकष आरिष्ट व त्याची क्रांतीकारक सोडवणुक…..
• शूर्पनखेच्या जनस्थानाचा काम्रेड शरद पाटील पुरस्कृत शोध…
• एक सांस्कृतिक युगप्रवर्तरक शाहिर गव्हाणकर….
मावळाई प्रकाशन ची पुस्तकें. …