
Contents
शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्ता वाद : तहसीलदारांच्या आदेशाला विरोध, चार आरोपींवर गुन्हा दाखल
शिरूर, ३० एप्रिल २०२५ – (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्ता वाद:शिरसगाव काटा ते पिपळसुटी या ग्रामीण रस्त्याच्या वापराबाबत मोठा वाद निर्माण झाला असून, तहसीलदारांच्या आदेशाची अवहेलना केल्यामुळे चार ग्रामस्थांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदेशाची अंमलबजावणी करताना वाद —
श्रीमती प्रमिला नागेश वानखेडे (सध्या प्रमिला विवेक गायकवाड, वय ४२), खराडी बायपास, ता. हवेली या तलाठी अधिकाऱ्यांनी शासकीय आदेशाची अंमलबजावणी करताना या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. २८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास, मौजे शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्त्याच्या तात्पुरत्या उघडण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करताना हा वाद घडला.
Read more >>
पोलिसांचा स्तुत्य उपक्रम: रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ‘स्पंदन’ उपक्रम राबवला
सोन्याची अंगठी, बिस्कीट, मोबाईल आणि रोकड चोरी !साई लंचहोम जवळ घडली घटना!
तहसीलदारांनी दिलेल्या तात्पुरत्या आदेशाची अवहेलना—
आरोपी ताराबाई पोपट भोईटे, खंडू पोपट भोईटे, महेश पोपट भोईटे आणि दादा पोपट भोईटे (सर्व रा. शिरसगाव काटा) यांनी, तहसीलदारांनी दिलेल्या तात्पुरत्या आदेशाची अवहेलना करत रस्ता मोकळा करण्यास नकार दिला. खंडू भोईटे यांनी थेट सांगितले की “कोणीही सही करणार नाही, न जमिनीची मोजणी होईपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही,” अशी माहिती फिर्यादीने दिली.
Read more >>
चुलत भावास मारहाण:शिरूर पोलिस ठाण्यात चुलत भावाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल
शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल —

या प्रकारामुळे प्रशासनाच्या आदेशाचा स्पष्ट अपमान झाल्यामुळे शिरूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 223, 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
ही घटना स्टे डा. क्र. 63 नुसार २८ एप्रिल रोजी रात्री ११:५६ वाजता नोंदवण्यात आली आहे.
गुन्ह्याचा तपास पो. हवा शिंदे करीत असून, प्रभारी अधिकारी पो.नि. श्री. संदेश केंजाळे यांच्याकडे जबाबदारी आहे.
हा प्रकरण स्थानिक पातळीवर मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Read more >>
Shirur Shanti Nagar News: शिरूरममधील शांतीनगर मधे हळदीच्या कार्यक्रमात वाद, महिलेसह मुलाला मारहाण !
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …