
Contents
- 1 शिरूर : स्विफ्ट कारच्या धडक: दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर : स्विफ्ट कारच्या धडक: दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर : स्विफ्ट कारच्या धडक:निर्वी गावाजवळघडली घटना !
शिरुर,दिनांक 5 मे 2025: (प्रकाशकरडे यांच्याकडुन)
शिरूर : स्विफ्ट कारची धडक:शिरूर तालुक्यातील निर्वी गावाजवळ २४ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता घडलेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात स्विफ्ट कार (MH14KN8388) ने पल्सर मोटारसायकलला समोरासमोर धडक दिली असून, संबंधित कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक आखुटे आणि मित्र निलेश गव्हाणे हे बजाज पल्सर गाडीवर—
फिर्यादी अशोक मारुती आखुटे (वय ५१, व्यवसाय: शेती, रा. निर्वी, शिरूर, पुणे) यांनी पोलिसात दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांच्या मुलगा दीपक आखुटे आणि मित्र निलेश गव्हाणे हे बजाज पल्सर (MH12S33302) वरून न्हावरा ते काष्टी रोडने जात असताना, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
दोघांना गंभीर व किरकोळ दुखापती—
अपघातामुळे दोघांना गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कारचालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकारामुळे अपघाताची गंभीरता अधिकच वाढली आहे.पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार टेंगले (प.ह. २४९९) पुढील तपास करत आहेत.
गुन्हा दाखल कलमे—
भारतीय दंड विधान कलम ३०४ (अ), २८१, १२५(अ)(४), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांसाठी सूचना-
वाहन चालवताना ट्राफिक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. भरधाव वेगात वाहन चालवणे आणि अपघातानंतर पळ काढणे हे गुन्हे आहेत. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, जेणेकरून गुन्हेगारावर तत्काळ कारवाई करता येईल.
——
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…