
Contents
- 1 Shirur Taluka Crime: नवर्याने रागात घरसामान पेटवले म्हणुन बायकोने नवर्याला पोलिस स्टेशन मधे नेले !
- 1.1 Shirur Taluka Crime: पती पत्नी च्या भांडणात पतीने घरातील 25 हजार रुपयांचे घरसामान पेटवले !
- 1.2 फिर्यादी —
- 1.3 उषा संतोष पवार, वय -27 वर्षे, धंदा -मोलमजुरी, राहणार – फॉरेस्ट, शिनगरवाडी, तालुका – शिरूर,जिल्हा – पुणे,मुळ राहणार – बोटा, तालुका – संगमनेर, जिल्हा – अहिल्यानगर.
- 1.4 आरोपी –
- 1.5 संतोष वसंत पवार, फोरेस्ट , शिनगरवाडी तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे.
Shirur Taluka Crime: नवर्याने रागात घरसामान पेटवले म्हणुन बायकोने नवर्याला पोलिस स्टेशन मधे नेले !
Shirur Taluka Crime: पती पत्नी च्या भांडणात पतीने घरातील 25 हजार रुपयांचे घरसामान पेटवले !
Shirur Taluka Crime News 17 March 2025:
(Satyashodhak News Report)
Shirur Taluka Crime: नवर्याने रागात घरसामान पेटवले म्हणुन बायकोने नवर्याला पोलिस स्टेशन पर्यंत पोचवले आहे.या पती पत्नी च्या भांडणात पतीने घरातील 25 हजार रुपयांचे घरसामानच चक्क पेटवले आहे.ही घटना शिरुर तालुक्यातील शिनगरवाडी येथे घडली आहे. याबाबत पत्नीने पतीवर शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल केला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Read more>>
Shirur Taluka Crime News; घटना अशी आहे—-
दिनांक 14 मार्च 2025 रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास शिनगरवाडी, फॉरेस्ट, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे येथे
फिर्यादी उषा संतोष पवार, वय -27 वर्षे, धंदा -मोलमजुरी, राहणार – फॉरेस्ट, शिनगरवाडी, तालुका – शिरूर,जिल्हा – पुणे,मुळ राहणार – बोटा, तालुका – संगमनेर, जिल्हा – अहिल्यानगर या
राहत असलेल्या झोपडीला त्यांचा पती संतोष वसंत पवार याने घरगुती व प्रापचिक कारणावरून रागाच्या भरात कशाचच्या तरी सहायाने आग लावली. त्या आगीमध्ये घरामध्ये असलेले सर्व प्रापंचिक साहित्य जळुन गेले.त्याची अंदाजे किंमत 25000/- रूपये आहे.
Read more>>
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
फिर्यादी —
उषा संतोष पवार, वय -27 वर्षे, धंदा -मोलमजुरी, राहणार – फॉरेस्ट, शिनगरवाडी, तालुका – शिरूर,जिल्हा – पुणे,मुळ राहणार – बोटा, तालुका – संगमनेर, जिल्हा – अहिल्यानगर.
आरोपी –
संतोष वसंत पवार,
फोरेस्ट , शिनगरवाडी तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे.
म्हणुन पती संतोष वसंत पवार याच्या विरुध्द त्यांनी शिरूर पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल केली आहे .
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल—

शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर – 179/ 2025 असा आहे. तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम नुसार आरोपी पतीवर 326 (G), 352,351(2)(3) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री.टेंगले हे आहेत. तर पुढील तपास अमंलदार पोलीस निरीक्षक श्री. कारांडे हे करत आहेत. हा तपास पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
Read more>>
पती पत्नी चे नाते ही अगदी मजेदार—
पती पत्नी चे नाते ही अगदी मजेदार असते.त्याचा प्रत्यय येईल अशी ही घटना आहे. लग्नापुर्वी नवरा मुलगा आणि नवरी मुलगी एकमेकांना भेटण्यास किती अतुर असतात.हे आपण नेहमी आपल्या आजुबाजूला पाहतो.पण बर्याच वेळा सध्या तर काही महिण्यात पती पत्नी पोलिस स्टेशन मधे आलेले दिसतात. किती विरोधाभासी वाटते हे ! एखाद्या तटस्थ पण संवेदनशिल व्यक्तीला ! पण हे घडते.आणि यांना मुलबाळे होतात.इतके हे प्रेमात बुडुनही जातात.आता याच केसमधे पहा.पतीला पोलिस चोपही देउ शकतात. पण नंतर परत हे पती पत्नी घरात एकत्र राहणारच आहेत की ! आणि एकमेकांवर प्रेम करणारही आहेतच ना ! मग याचा अर्थ तरी काय लावायचा बरं !
की स्टिफन हाकिंग या वैज्ञानिकाने देखील म्हटले आहे की ,’मी ब्रम्हांडातील रहस्ये उलगडली आहेत.पण स्री मनाचे रहस्य काही मला अजुन उलगडता आले नाही.’ हे अगदी खरे आहे. पण पुरुषाच्या मनाच्या रहस्याचे काय ?
1 thought on “Shirur Taluka Crime: नवर्याने रागात घरसामान पेटवले म्हणुन बायकोने नवर्याला पोलिस स्टेशन मधे नेले !”