
शिरुर पोलीस स्टेशन
Contents
Shirur Taluka Crime News: शिरूर- पतीवर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Shirur Taluka Crime News:शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील एका महिलेने आपल्या पतीवर झालेल्या गंभीर हल्ल्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे —
फिर्यादी मंगल संभाजी भाईक (वय ३४ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कवठे येमाई, घोडेवस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी 6 दरम्यान कवठे येमाई घोडेवस्ती येथे त्यांचे पती संभाजी भाईक यांच्यावर संतोष बबन भाईक, योगेश बबन भाईक, बाळासाहेब बबन घोडे व श्लोक अॅकडमी शिरूर येथील १२ अनोळखी इसम यांनी शारीरिक हल्ला केला.
Read more >>
वेदांत हॉस्पिटल शिरूर येथे उपचार सुरू —
या घटनेमुळे संभाजी भाईक यांना गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला त्यांना शिरूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना वेदांत हॉस्पिटल, शिरूर येथे दाखल करण्यात आले. सध्या तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Read more >>
शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल—
शिरूर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 250/2025 अन्वये खालील भारतीय दंड विधानांच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
189(2), 191(2), 191(3), 190, 74, 118(1), 115(2), 352, 351(2)(3) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Read more >>
तपास अधिकारी:
दाखल अमलदार – पोलीस हवालदार टेंगले
तपास अधिकारी – पोलिस हवालदार श्री.वारे
प्रभारी अधिकारी – मा. संदेश केंजळे, शिरूर पोलीस स्टेशन,पोलिस निरिक्षक.
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे घडलेली ही घटना अत्यंत गंभीर असून पोलिसांनी त्वरीत कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.