” शिरुर तालुक्यातील गुटका व तत्सम अंमली पदार्थांची बेकायदा विक्री कुणाच्या आशिर्वादाने?” – आम आदमी पक्ष नेते श्री.अनिल डांगे यांचा सवाल!
" शिरुर तालुक्यातील गुटका व तत्सम अंमली पदार्थांची बेकायदा विक्री कुणाच्या आशिर्वादाने?" असा सवाल आम आदमी पक्ष नेते श्री.अनिल डांगे यांनी संबंधित विभागाला केला आहे. शिरुर तालुक्यात संबंधित अधिकार्यांच्या कार्यालयासमोर 'आप' आंदोलन करणार आहे, असा इशाराच श्री.अनिल डांगे यांनी केला आहे.
” शिरुर तालुक्यातील गुटका व तत्सम अंमली पदार्थांची बेकायदा विक्री कुणाच्या आशिर्वादाने?” असा सवाल आम आदमी पक्ष नेते श्री.अनिल डांगे यांनी संबंधित विभागाला केला आहे. शिरुर तालुक्यात संबंधित अधिकार्यांच्या कार्यालयासमोर ‘आप’ आंदोलन करणार आहे, असा इशाराच श्री.अनिल डांगे यांनी केला आहे.
शिरुर तालुका आम आदमी पार्टी आंदोलन करणार !
शिरूर तालुक्यामध्ये कोणाच्या आशीर्वादाने होते गुटका व तत्सम अमली पदार्थाची विक्री होत आहे? असा सवाल ‘आम आदमी पार्टी चे शिरुर तालुका अध्यक्ष श्री. अनिल डांगे यांचा संबंधित विभागाला सवाल करण्यात आला आहे. अशा प्रकारची निवेदने श्री.अनिल डांगे यांनी संबंधित असलेल्या विभाग व कार्यालयांना देण्यात आली आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा या विषयावर शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे. यापुर्वी अशीच भूमिका आम आदमी पक्ष व अनेक नागरिकांनी घेतली होती.त्यावेळी बेकायदा धंद्यांवाल्यांना धाम फुटला होता.पोलिस खात्याचीही धांदल उडाली होती.कारण एक नैतिक आधार आम आदमी पक्ष, शिरुर व नागरिक यांच्याकडे होते. बाकी पक्षांचे लोकच बेकायदेशीर धंदे चालवत होते.पण काही प्रमाणात परिणाम झाला होता.आता हे ‘प्रकरण’ कुठपर्यंत ‘मजल’ गाठते हे पाहण्यासारखे असेल असेल !’शिरुर‘
पोलिस व तत्सम अधिकारी जबाबदार?
पोलीस प्रशासनाला निवेदन !
शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शहर, गाव,वाड्या, वस्त्यांवर अमली पदार्थ व गुटखा वितरण, विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करा. अन्यथा संबंधित विभागांच्या दारात येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी आंदोलन करणार असा विनंती वजा इशाराच ‘आप’ शिरुर तालुका अध्यक्ष व जिल्हा प्रवक्ते श्री.अनिल डांगे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी दिला आहे.
शिरूर तालुक्यामध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांनी राज-रोसपणे बेकायदा वितरण व विक्री सुरू केले आहे. संबंधित गुटका व तत्सम अंमली माफ़ीयांनी संबंधित विभागाच्या आशीर्वादामुळें बिनदिक्कतपणे वितरण करता येत असल्यामुळे पोलीस स्टेशन,शाळा,कॉलेज,दवाखान्याचा परिसर,पार्थना स्थळे किंबहुना दूध डेअरी सुद्धा असे एक ही ठिकाण सोडले नाही. की त्या ठिकाणी गुटका मिळत नाही. गुटखा आरोग्यास हानिकारक असल्याने राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी गुटखाबंदी केली आहे.तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातुन बाहेर काढण्यासाठी गुटखा उत्पादन व विक्री वर सरकारने बंदीचा आदेश काढला आहे.महाराष्टात गुटका बंदी असताना अंमलबजावणी होत नसल्याने, बहुतांश ठिकाणी कोणाच्या आशीर्वादाने गुटखा व तत्सम अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जात आहे? वेगवेगळी दुकाने, टपऱ्या,हातगाड्या इत्यादी मधून शिरूर शहर, कारेगाव, रांजणगाव गणपती एमआयडीसी या हद्दीत येणाऱ्या पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांच्या बरोबर साटेलोटे करून या भागात बेकायदेशीर गुटका व तत्सम अंमली पदार्थ विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत.
तरुण पिढी बर्बादीकडे !
त्यामुळे तरुण पिढी,लहान मुले, मुली,तरुणी सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात गुटका व तत्सम अंमली पदार्थांच्या दुष्टचक्ररात अडकत चालले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनी होत असून स्वतःच्या जीवन व कुटुंबाला दुर्दशेकडे घेऊन चालले आहेत. पूर्वी तंबाखू श्रीमंत व ज्येष्ठ नागरिकच खाताना दिसत होते. एखादी व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीसमोर तंबाखू खाण्याचे धाडस करीत नव्हती. आज शालेय विद्यार्थ्यांपासून ते कॉलेजपर्यंत अनेकांच्या खिशात गुटखा, मावा,खर्रा, सुगंधी तंबाखूच्या पुड्या दिसून येत आहेत. अनेक तरुण गुटख्याच्या पुड्या तोंडात टाकताना दिसतात. त्यामुळे दिसेल त्या ठिकाणी गुटख्याची पिचकारी टाकून स्वच्छ असलेली जागा घाण करतात. प्रशासनाने अनेक वेळा गुटख्यावर बंदी घातली. मात्र सध्या अनेक ठिकाणी खुलेआम पणे गुटखा विक्री होताना दिसत आहे.
‘चिरीमिरी’ घेणारे कोण?
शिरुर पोलिस स्टेशनला निवेदन !
गुटखा विक्रीवर एखाद्या पक्षाने किंवा सामाजिक संघटनेने निवेदन दिल्यास चिरीमिरी घेणारे संबंधित पोलीस विभागातील कर्मचारी व अन्न औषध प्रशासन विभागातील कर्मचारी संबंधित विक्रेत्यांना अलर्ट करून ठेवतात. इतर वेळी गुटख्याच्या गोण्या दुकानांमध्ये व टपरीमध्ये ठेवणारे दुकानदार व टपरी धारक अशा आणीबाणीच्या काळात खिशात मोजक्या पुड्या ठेवून ओळखीच्या ग्राहकांना त्यांच्या तोंडाकडे बघून गुटखा देतात.
‘प्रबोधनकारक उपक्रम’ ही घेणार !
याबाबत आम आदमी पार्टी जिल्हा प्रवक्ते व शिरूर शहराध्यक्ष श्री. अनिल डांगे म्हणाले,” की शासनाने कायदा करीत असताना त्याची अंमलबजावणी चोखपणे बजावने आवश्यक आहे. येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी शिरूर तालुक्यात प्रबोधनात्मक उपक्रम राबवून जनजागृती ही करणार आहे. प्रबोधनातूनच, पोलीस प्रशासन अन्न आणि औषध विभाग यांच्या खमक्या, भूमिकेतूनच यासारख्या अनिष्ट व आरोग्यासाठी घातक गोष्टींना मज्जाव होऊ शकतो.”
विद्यार्थी गुटख्याच्या विळख्यात?
शिरुर शहरातील शाळा महाविद्यालयाच्या 100 मीटरच्या परिसरात गुटखा विक्रीवर बंदी आहे.मात्र पोलीस प्रशासन व अन्न, औषध प्रशासन यांच्या मेहरबानीमुळे गुटखा विक्री बिनधास्त सुरू आहे. प्रशासनाला मिळत असलेल्या चिरी- मिरी मुळे गुटखा विक्री शिरूर, कारेगाव , रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जोरात सुरू आहे. शिरूर,सरदवाडी,पुणे-नगर हाय-वे ,कारेगाव ,रांजणगाव पाचंगे वस्ती, ढोकसांगवी या परिसरात पानाचे अनेक ठेले उभे राहिले आहेत. या टपऱ्यातून मोठ्या प्रमाणात खर्रा,मावा, गुटखा अमली पदार्थ सर्रास मिळत आहेत.
व्यसनाधीनतेची पहिली पायरी सुगंधी सुपारी ,तंबाखू पासून होते. शाळेतील वयाच्या दहा वर्षापासून विद्यार्थी त्याकडे आकर्षिले जातात. तिथूनच व्यसनाची पहिली पायरी चढायला सुरुवात होते.यावर स्थानिक प्रशासन यांनी बघ्याची भूमिका न घेता कारवाई करणे आवश्यक आहे.अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व सजग नागरिक मंच कडून होत आहे.
डी वाय एस पी आवर श्री.प्रशांत ढोले.
” शिरूर, कारेगाव ,रांजणगाव, शिक्रापूर परिसरात जर कोणी पान टपरी धारक चोरून गुटखा मावा, खर्रा व अमली पदार्थ विक्री करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, गुटखा विक्री करताना कोणी दुकानदार किंवा पान टपरी धारक आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही.नागरिकांनी गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी” —-
प्रशांत ढोले साहेब, डी.वाय.एस.पी, रांजणगाव कार्यालय.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com