शिरुर तालुक्यातील जांबुतमधे बेकायदेशीर नशेची वस्तु विक्रेता ताब्यात तर न्हावर्यात 40000 रुपये किंमतीची मोटारसायकल चोरीला !
शिरुर तालुक्यातील जांबुतमधे बेकायदेशीर नशेची वस्तु विक्रेत्याला शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर शिरुर तालुक्यातीलच न्हावर्यात 40000 रुपये किंमतीची मोटारसायकल चोरीला गेली आहे. पोलिस सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.
दि.18 जुन : (डा.नितीन पवार ,संपादक,सत्यशोधक न्युज )
“दारु पिणे हा एक मानसिक आणि मनोशारिरिक आजार आहे. आमच्या वाचकांनी केवळ बातम्या वाचु नका तर समाजासाठी थोडं का होईना काम करावे.आम्ही बातमीबरोबरच माहितीही देण्याचा प्रयत्न करत आहोत.हे फक्त बातमीपत्र नाही.साईट नाही.ब्लाग आहे.हे समजुन घ्यावे.बातमीपेक्षा काही अधिक ब्लाग लेखनातुन देता येते.जे मी भोगले ते कुणी भोगताना पाहिले तर जीव कासाविस होतो.म्हणून हा सर्व लेखनप्रपंच !”
शिरुर तालुक्यातील जांबुतमधे बेकायदेशीर नशेची वस्तु विक्रेत्याला शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर शिरुर तालुक्यातीलच न्हावर्यात 40000 रुपये किंमतीची मोटारसायकल चोरीला गेली आहे. पोलिस सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. दोन्ही घटनांचा तपास शिरुर पोलिस करत आहेत.शिरुर तालुक्यातील अंतर्भागात गुन्हे सातत्याने घडत आहेत. मात्र शिरुर पोलिस गुन्हेगारांना काही ‘सुट्टी ‘ देत नाहीत आणि देणार नाहीत.हे देखील तितकेच खरे आहे. छोट्याछोट्या चोर्या आणि बेकायदेशीर नशेचे धंदे, मटका,जुगार,चोरी,हाणामार्या, शेतातील रोहित्र चोरीचे प्रकार शिरुर तालुक्यातील गावांमधे घडत आहेत. नुकतीच बेट भागामधे शिरुर पोलिसांनी एक बैठक घेतली होती.त्यानंतर शिरुर पोलिसांचे कारवाईचे सत्र चालु आहे.
शिरुर तालुक्यातील जांबुत येथे मद्यसाठा जप्त. ..
शिरुर तालुक्यातील जांबुत येथे दि. 17/06/2024 रोजी सायंकाळी 6 : 30 वाजण्याच्या सुमारास जांबूत, ता. शिरूर, जि. पुणे गावच्या हद्दीत हॉटेल मिरावली बाबा येथे रमेश बबन पळसकर, वय- 38 वर्षे, रा.जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे हा बेकायदेशीर देशी- विदेशी अशा दोन्ही प्रकारच्या नशेच्या वस्तु विक्री करत असताना पोलिसांना आढळून आल्यानंतर त्याच्यावर शिरुर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याविरूध्द कलम 65 (ई) महाराष्ट्र अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 1635 रुपये किमतीची नशेची वस्तु जप्त करण्यात आली आहे.दारु कायदा कलम प्रमाणे कायदेशीर फिर्याद पोलीस हवालदार परशुराम सुदाम म्हस्के , नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय, शिरूर यांनी दिली आहे . त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार उमेश भगत हे करत आहे.
शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत मोटर सायकलची चोरी…
शिरुर तालुक्यातील दुसऱ्या एका गुन्ह्यामधे दि. 13/06/2024 रोजी दुपारी 3 : 00 वाजण्याच्या सुमारास न्हावरे, बस स्टँड , ता. शिरूर, जि. पुणे येथे दीपक काळूराम नाचन, रा.आरणगाव, ता शिरूर,जि. पुणे यांची स्लेंडर मो.सा. नं.MH-12-VP-3189,चासी न MBLHAW123PHAA7392,इंजिन न HA11EDPHA74479 या वर्णनाची व अंदाजे 40000 रुपये किंमतीची मोटर सायकल कोणी तरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे.
म्हणून अज्ञात चोरट्यांविरोधात शिरूर पोलीस स्टेशन मध्ये दि.17/06/2024 IPC कलम 379 प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार कदम , नाव्हरे आऊट पोस्ट हे करत आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांचे मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
नशा आणि तीही कमी किंमतीत…
बेकायदेशीर नशेची वस्तु बनवणे व ती विकणे हे काही नवे नाही.पण ही वस्तु जिला हातभट्टी ची वस्तु असेही म्हटले जाते.ती वस्तु गरीब वर्गातील नशाबाजांना लोकांसाठी जीव की प्राण असते.ती अगदी 10 रुपयेच नाही तर 5 रुपयांनाही मिळते. गावच काय मोठी शहरे,तालुक्याची गावे अन् सर्वत्र हीअसते.त्यामुळे बेकायदेशीर पणे अशी वस्तू बनवणे आणि विकणे हा एक चंगा धंदा म्हणून सर्वांना माहित आहे.तरुण वर्गही त्यातुन सुटलेला नाही. कमी खर्चात पण नशा ! याचा गेरफायदा घेत ती एका विशिष्ट पारंपारीक पद्धतीने बनवली जाते.त्यात नफेखोरीच्या लालसेने अलिकडे या वस्तुत काय काय टाकलेले असते? हे पाहिले पाहीजे. ती वस्तु पिणारे अल्पायुषी ठरत आहेत. मरत आहेत.मरणाच्या जवळ चाललेले गल्लीबोळात दिसत असतात.
मद्यपान एक मानोशारिरीक आजार…
शिरुर तालुक्यातील गावागावांत असे बेवडे आहेत.त्यांचा संसार ,बायका मुले यांचे हाल होतात. हार्ड काम उदाहरणार्थ हमाली करताना काम सुरु करण्यापूर्वीच यांना मालक वस्तु पिण्यासाठी 100 ,200 रुपये देतो.त्याशिवाय ते कामच करु शकत नाहीत. असा त्यांचा दावा असतो.हे मालकाला माहित असते.पण काय करणार? त्यांची ती सायकालाजी ! त्यात काही खाणारे तर काही वस्तु जास्त अन खाणे कमी ! पण काम करत असताना घामाद्वारे त्यातील अल्कोहोल बाहेर पडते.मग फ्रेश वाटते.पण पुन्हा दुसरा राउंड होतो.मग तिसरा.असे हे लोक मग सकाळी उठल्याबरोबर उतारा म्हणून परत 10 ची तरी ! ‘मला काय होत नाही ‘असे म्हणतात ! पण त्यांना कुठून मेडिकल सायन्स कोणी सांगणार? लिव्हर ,किडनी कमकुवत होण्याची प्रक्रिया शरिरात चालु असते.नंतर भुक लागत नाही. पण वस्तु चालुच राहते.पुढे शेवट ! कुटुंबे बरबाद ! असा हा प्रवास असतो.एकदा सुरु झाला की फारच कमी बेवडे हा प्रवास थांबवु शकतात.त्यांना समाज चुकीचे मानतो.समाजाला,कुटुंबाला हा एक आजार आहे, हे माहीत नसते.त्याच्याकडे पेशंट म्हणून पहावे लागते.
समाज त्याला आणखी बेवडा बनवतो.दुषणे देउन,शिव्या देउन ! कुटुंबही हेच करते.त्याला माहित नसते.घरात ,नात्यात कोणी मेडिकल हन्ड माणूस नसतो.शेवटी शोकांतिकाच ! व्यसनमुक्ती केंद्रे,मानसोपचार केंद्रे,समुपदेशन केंद्रे आहेत.त्यात काही जण जावून सुधारतात.पण अशांची संख्या कमी असते.
एक प्रश्न. ..
पाप,पुण्य मानणार्या या समाजात हे पाप आपल्यावर घेण्यास हे बेकायदेशीर वस्तु धंदेवाले कसे तयार होतात?हप्ते खानारे कसे या पापात भागीदार होतात?की यांच्या मुलाबाळांचा तळतळाट या लोकांना लागतो का ? लागतोय ! हे खरे आहे ! म्हणून पैशाला किती महत्वाचे मानायचे ? हा व्यवस्थेसमोरील खरा प्रश्न आहे !
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com