
Contents
विहिरीत बुडून मृत्यू: पवन अशोक बांदल यांचे दुर्दैवी निधन
करडे, शिरूर (जि. पुणे) | 30 एप्रिल 2025:
विहिरीत बुडून मृत्यू:शिरूर तालुक्यातील करडे गावात आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, मृत व्यक्तीचे नाव पवन अशोक बांदल (वय ३१ वर्षे) असे आहे.
विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते–
पवन बांदल हे रोजच्या प्रमाणे सकाळी ९.३० वाजता आपल्या Shine मोटारसायकलवरून शेतात कामाला गेले. कामाचे साहित्य आणि जेवणाचा डबा घेऊन ते शेतातील गट नं. ७१९ मधील विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही.
पाण्यावर पवन यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला—
दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या भावाने विहिरीकडे जाऊन पाहणी केली असता, पवन यांच्या मोटारसायकल आणि कामाची बॅग विहिरीजवळ असल्याचे दिसून आले. विहिरीत डोकावून पाहिल्यावर, पाण्यावर पवन यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. गावकऱ्यांच्या मदतीने आणि पोलिसांच्या उपस्थितीत त्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तात्काळ न्हावरा ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.
पवन यांना पोहता येत नव्हते?—
पवन यांना पोहता येत नसल्यामुळे अंदाज व्यक्त केला जात आहे की, विहिरीवरील मोटार सुरू करताना त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, अंमलदार पो. हवा. खेडकर व भोते यांनी चौकशी केली असून, पोस्टे अ. म. र. नं. ५५/२०२५ नुसार नोंद करण्यात आली आहे.
या घटनेने करडे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक मेहनती शेतकरी अचानक मृत्यू पावल्याने कुटुंब आणि गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
संक्षिप्त माहिती—-
• मयताचे नाव: पवन अशोक बांदल (वय ३१ वर्षे)
• घटना स्थळ: गट क्र. ७१९, विहीर, करडे, ता. शिरूर, जि. पुणे
• घटनाकाळ: 29 एप्रिल 2025, सकाळी 9.30 ते दुपारी 12.45 दरम्यान
• मृत्यूचे कारण: विहिरीत बुडून मृत्यू (तोल जाऊन पडणे)
• पोलीस चौकशी: पोस्टे शिरूर, तपासी अधिकारी – पो. हवा. भोते व खेडकर
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…