
शिरुर पोलीस स्टेशन
Contents
Shirur Yatra News:शिरूर : यात्रेच्या मिरवणुकीत तरुणावर धारदार हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!
Shirur Yatra News:शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे भैरवनाथ देवाच्या यात्रेदरम्यान मिरवणुकीच्या वेळी वाद निर्माण होऊन एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील असा –—
फिर्यादी संदीप गोरख लोखंडे (वय ३२, व्यवसाय शेती, रा. लोखंडेवस्ती, रांजणगाव सांडस, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास रांजणगाव सांडस येथील ग्रामपंचायत सार्वजनिक रस्त्यावर, करण भंडलकर यांच्या घरासमोर मिरवणूक सुरु असताना त्यांचे पुतण्याला धक्का लागल्याबाबत विचारणा केली असता, आरोपी करण राजेंद्र भंडलकर रा. रांजणगाव सांडस यांनी फिर्यादीवर रागाने धारदार शस्त्राने डाव्या खांद्यावर व कपाळावर वार करून गंभीर दुखापत केली.
“तु आमच्या वस्तीतील मुलींना त्रास देतोस”—
त्याचबरोबर आरोपीने “तु आमच्या वस्तीतील मुलींना त्रास देतोस” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीला लागलेल्या जखमांवर उपचार सुरु आहेत.
शिरुर पोलिस स्टेशनला दाखल —
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 249/2025 अन्वये खालील भारतीय दंड विधानांच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
118(2), 352, 351(2)(3)
तपास अधिकारी—-
दाखल अमलदार – पोलीस हवालदार टेंगले
तपास अधिकारी – पोलिस हवालदार श्री.भोते
प्रभारी अधिकारी – मा. संदेश केंजळे, शिरूर पोलीस स्टेशन,पोलिस निरीक्षक.