
Contents
- 1 शिरुर तालुक्यातील कवी गीतकार, अभिनेता आनंद डोळस हे राज्यस्तरीय ‘कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित !
- 1.1 शिरुर तालुक्यासाठी गौरवास्पद ठरलेला , ‘कलारत्न’ पुरस्कार गीतकार , अभिनेते आनंद डोळस यांना !
शिरुर तालुक्यातील कवी गीतकार, अभिनेता आनंद डोळस हे राज्यस्तरीय ‘कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित !
शिरुर तालुक्यासाठी गौरवास्पद ठरलेला , ‘कलारत्न’ पुरस्कार गीतकार , अभिनेते आनंद डोळस यांना !
शिरुर , दि. 30 जुन : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
शिरुर तालुक्यातील कवी गीतकार, अभिनेता आनंद डोळस हे राज्यस्तरीय ‘कलारत्न‘ पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. शिरुर तालुक्यासाठी गौरवास्पद ठरलेला , ‘कलारत्न’ पुरस्कार गीतकार अभिनेते आनंद डोळस यांना ‘तेजस फाउंडेशन’ ने छत्रपती संभाजी नगर येथे प्रदान करण्यात आला आहे .
शिरुर तालुक्यातील प्रतिभावान तरुण !….
शिरुर तालुक्यात बरेच प्रतिभावान तरुण आहेत . हे विविध कार्यकक्षात कार्यरत असतात . पण सामाजिक, आर्थिक दुजाभावाचे बळी ठरले आहेत. ठरत असतात . विविध राज्यस्तरीय व स्थानिक क्षेत्रात सामाजिक, आर्थिक विषमता आजही अस्तित्त्वात आहे . प्रस्थापितांनी पुरस्कृत केलेले हुजरेगीरी करणारे बर्याच वेळा शिफारस मिळवतात . आणि पुरस्कार मिळवतात. कला, अभिनय क्षेत्रात देखील हा रोग पसरलेला आहे. तो आजचा नाही. जुना आहे .अशा परिस्थितीत ‘तेजस फाउंडेशन’ या संस्थेने २०२४ या वर्षाचा ‘कलारत्न’ पुरस्कार कवी, गीतकार , अभिनेता,आनंद संगीता विजय डोळस यांना मिळाला आहे . आनंद डोळस हा प्रतिभावान गीतकार आहे. अभिनेता आहे.कवी आहे.ग्रामीण भागातील आहे . पुरोगामी विचारांचा आहे. आपल्या नावामधे वडिलांबरोबरच आईचे नाव ते लिहीत असतात. आईचे नाव आधी लिहीतात. यावरुन त्यांची ‘ उंची’ समजु शकते . पण इथली व्यवस्था बहुतांशी प्रतिगामी विचारांची आहे. या प्रतिभेला पुरस्कार हे आणखीन खुलवत असतात.त्यातुन अधिकाधिक दर्जेदार कलाकृती निर्माण होत असतात. म्हणून किमान त्या क्षेत्रातील, ‘देणारे हात‘ यांनी अशा तरुणांची दखल घेणे गरजेचे असते.
आनंद डोळस यांच्याबरोबरच हा पुरस्कार सिने अभिनेत्री मेघा ताई डोळस (तेजस फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा) , गायिका कडुमाई खरात, सिने अभिनेत्री मानसी मंदार राणे , अभिनेते आशिष सातपुते, नितीन देशमुख साहेब यांच्या उपस्थिती मध्ये देण्यात आला आहे .
छत्रपती संभाजी नगर मराठवाडा येथे कार्यक्रम संपन्न. …
छत्रपती संभाजी नगर मराठवाडा येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे . हा पुरस्कार आनंद डोळस यांना मिळाल्यामुळे ख-या आर्थाने एका ग्रामीण भागातून आलेल्या कलेला प्रोत्साहन मिळाले आहे. पुढे जाण्याची इच्छा शक्ती मिळाली आहे. असे यावेळी बोलले जात आहे .गीतकार आनंद डोळस यांनी लिहीलेल्या लावणी गीतावरील व्हिडिओ गीत शिरुर वार्ता यु ट्यूब चेनलला प्रसिद्ध झाले आहे. ते पाहण्यासाठी शिरुर वार्ता यु ट्यूब चेनलच्या खालील लिंकवर क्लिक करून शिरुर वार्ता यु ट्यूब चेनल सबस्क्राइब करावे ही नम्र विनंती !
त्यामूळे संपुर्ण शिरूर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
लोकमान्यता मिळते पण राजमान्यता मिळायला पाहिजे. …
शिरुर वार्ता यु ट्यूब चेनलला आनंद डोळस लिखीत लावणी वर व्हिडिओ गीत प्रसिद्ध करण्यात आले होते. ते व्हायरलही झाले. असा लोकमान्यता असलेला हा कलाकार आहे. त्याला राजमान्यता मिळायला पाहिजे . राजमान्यता म्हणजे शासनाचे पुरस्कार असतील, मानधन असेल ! ते मिळायला हवेत ! बरेच तरुण तरुणी यु ट्यूब चेनलद्वारे रोजगार मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. शिवाय त्यांच्या क्षेत्रात त्यांना अडकाठी आणणार्या घटकांना ओळखणे हे ही शासनाचे काम आहे. नवीन मालिका, स्टुडिओ यांसाठी थेट कर्ज किंवा अनुदान देणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पात पहा ! बराच ,’इतर’ खर्च असतो. त्यामधे किंवा अगदी आमदार, खासदार निधी उपलब्ध असतात. त्यांमधून अशा ग्रामिण भागातील talent ला आर्थिक मदत देता येउ शकते.
माणसाची ‘वैचारिक उत्क्रांती’ देखील होत असते. ..
माणसाला जगण्यासाठी अन्न ,वस्त्र , निवारा लागतो. हे आदिम मानवासाठी झाले. आजचा मानव फार पुढे आला आहे. त्याच्या मधे वैचारिक उत्क्रांती देखील वेगाने होत आहे. आता कृत्रीम बुध्दीमत्तेचे युग सुरू घातले आहे . आता मानसाच्या प्राथमिक गरजांची व्याख्या देखील बदलली पाहिजे. फक्त अन्न,वस्र,निवारा या गरजांबरोबर मानसन्मान , प्रतिष्ठा , शिक्षण, पद, स्वातंत्र्य, न्याय, निसर्ग सहवास ,पर्यटन ,वाचन ,प्रेम ,लैंगिकता , तंत्रज्ञान कौशल्य, भांडवल ,आरोग्य ,कौशल्ये अशा अनेक गोष्टी माणसाला जगण्यासाठी लागतात.
पारंपारीक रितीरिवाज नवे रितीरिवाजामधे बदलत जात असतात. जुने बुरसटलेले विचार, भेदभाव,अनिष्ट चाली, रिती, प्रथा, परंपरा कालबाह्य झाल्या आहेत. जोपर्यंत त्या आपण सोडत नाही तोपर्यंत आपण महाशक्ती बनु शकत नाही. त्यामधे जन्मावर आधारित पुर्वग्रह बाळगुन जीवन जगणे.हे अनेक बाबींना माणसाच्या नैसर्गीक इच्छा आकांशा यांच्या दमणास कारणीभुत ठरत असतात. त्यातुन स्वतः व दुसर्यांना मुक्त केले पाहिजे. कला जीवनात रंग भरते .एवढेच नाही तर एक थेरपी असते. मानसिक,मनोशारिरिक व्याधींसाठी उपयोगी ठरते. म्युझिक थेरपी,लाफिंग क्लब,इ.काय दर्शवतात ? कलाप्रेमी कलाकृती मधे तल्लीन होतो तेव्हा ,’ध्यान‘ घडते.एकाग्रता घडते.इतर सर्व दु:खे,व्याधी,स्पर्धा,तणाव,उचनिचता सारे काही विसरुन जातो.हीच समाधी आहे.हीच ती enlightenment ची अवस्था असते.