

Contents
शिरुरमधे एकाला लोखंडी रॉडने गंभीर जखमी कले?
शिरुर येथे जुन्या व्यवहारातील कारणावरुन लोखंडी रॉडने मारहाण?
शिरुर,दि.14 जुन : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून)
शिरुरमधे एकाला लोखंडी रॉडने गंभीर जखमी करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरुर येथे जुन्या व्यवहारातील कारणावरुन लोखंडी रॉडने मारहाण करून एकाला गंभीर जखमी करण्यात आले आहे. त्याबाबतची फिर्याद फिर्यादीने आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशन ला दाखल केली आहे.
शिरुर पोलिसांनी याची दखल घेत आरोपीवर शिरूर पोलीस स्टेशन मधे IPC कलम 326,504 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
लोखंडी रॉडने मारहाण. …
याबाबबत सविस्तर हकिकत अशी की दिनांक १३/०६/२०२४ रोजी दुपारी ०१:१५ वा सुमारास शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे गावच्या हददीत नवीन कांदा मार्केट येथील घावटे कॉम्पलेक्स, मधील जिन्यामध्ये किसन जयवंत नरवडे, रा. कुरूंद, ता. पारनेर, जि.अहमदनगर याने त्याचे वाहन कर्जाचा पायल सर्व्हिस सेन्टर सोबत झालेल्या व्यवहाराचा राग मनात धरून फिर्यादी दत्तात्रेय वसंत लंके, वय- 35 वर्ष, धंदा:- नोकरी, रा. शिरूर, ता.शिरूर, जिल्हा- पुणे, मूळ रा. निघोज ता.पारनेर जि. अहमदनगर यांना लोखंडी रॉडने व हाताने मारहाण करून, शिवीगाळ करून डाव्या हाताच्या करंगळीस गंभीर दुखापत आरोपी किसन जयवंत नरवडे रा. कुरूंद ता. पारनेर जि. अहमदनगर याने केल्याने आरोपी विरुद्ध शिरूर पो स्टे ला गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेपासून आरोपीचा शोध चालू असून ,गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करत आहे.
एक गोष्ट येथे नमुद करावी वाटते.ती अशी आहे की शिरुर पोलिस बर्याच दिवसांपासुन नियमितपणे प्रेस नोट पाठवत नाहीत.आजची ही बातमी बर्याच काळानंतर शिरुर पोलिसांनी पत्रकारांकडे प्रसिद्धीसाठी दिली आहे. त्याबद्दल धन्यवाद ! मधे लोकसभा निवडणुकीची धामधूम होती.त्यामुळे पोलिस यंत्रणा बर्याच इतर ठिकाणी तैनात होती.हे खरे आहे. आम्ही पोलिस कार्यालयात जावून विनंतीही केली होती.पण ‘देतो देतो’असे सांगितले जात होते. पण माहीती काही मिळत नव्हती.

जनित्रे कसे चोरावे याचे प्रशिक्षणच जणु घेतले…..
दरम्यान शहर व तालुक्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. बेकायदेशीर नशेच्या वस्तु,धंदे,मटका,लाज पुन्हा एकदा चालु झालेले आहेत. अशी नागरिकांकडून माहिती मिळत आहे. ग्रामिण भागात जणु विद्युत जनित्रे कसे चोरावे? याचे प्रशिक्षणच जणु कुठेतरी घेवून लिलया अनेक विद्युत जनित्रांची चोरी होत आहे. हाणामार्या,सुपारीच्या धमक्या, अल्पवयीन मुलींना नादी लावुन बिघडवणे,त्यांच्या भावी जिवनावर जीवनावर कायमचा विपरित परिणाम होईल असे मार्ग दाखवणे,काॅलेज, शाळांच्या परिसरातील रोमियोंचे थांबणे,बस स्थानकावर हातात फोन घेऊन कुणाशी तरी बोलत असल्याचा दिखावा करणे.नंतर चोरी करणे.’वडापाऊ घ्याना मामा,भाऊ,वगैरे म्हणून मागणे.नंतर पुन्हा पुन्हा मागणे.मग फोन नंबर घेणे.फोन करणे.पैसे मागणे.हुल देणे.गरीबी दाखवणे.वगैरे नाटके करुन पुरुष वा तरुणांना फसवणे.पैसे लुटणे.असा प्रकार बस स्थानकावर सहज दिसेल.बस स्थानक परिसरातील झोपडपट्टीत याचे उगमस्थान आहे.एकदा महिला पोलिसांनी या परिसरातील पोरींची ‘चांगली’ छानबीन केली तर जरब बसेल. याव्यतिरिक्त काॅलेजच्या तरुण तरुणींनी देखील बस स्थानकावर वावरताना काही समज बाळगली पाहिजे.तोंडावर रुमाल बांधून संशयास्पद हालचाली करणे.तेथील वातावरण बिघडवण्याचे काम आहे.हे करणे आहेत योग्य नाही. बसस्थानकात नवीन लाज झाले आहे. ते सभ्य लोकांना ,प्रवाशांसाठीही उपयुक्ततेच्या साठी आहे.आपण उच्चशिक्षित आहोत.याचे भान ठेवून वागावे.असे वाटते.
बस स्टँडवर गोरख धंदा?…..
शिरुर शहरात आणि ग्रामिण भागात देखील हातभट्टीवाल्यांचा धंदा,तथाकथित ताडीचा धंदा,विमल,गोवा गुटका सर्रास विकला जात आहे. अल्पवयीन मुले व वर उल्लेख केलेल्या ठिकाणच्या अल्पवयीन मुलीच्या देखील तोंडात विमल गुटका सर्रास दिसुन येतो.तोंडातून विशिष्ट पद्धतीने दोन बोटे ओठांवर ठेउन गुटक्याची थुकी पिचकारीप्रमाणे मारणार्या मुले मुली,महिला सुद्धा बस स्थानकावर मधुन मधुन चकरा मारत असतात. Washroom च्या बहाण्याने ,त्याचेही पैसे न देता सार्वजनीक शौचालयाकडे येतात.शौचालय चालकाला दमाची भाषा करतात.तो त्रस्त होऊन हे नेहमी सांगत असतो.शिवाय या बहाण्याने शौचालयातुन देखील सहसा साध्या फोनवरुन बराच वेळ गप्पा मारत असतात. यात या परिसरातील अल्पवयीन मुली आहेत. त्या बिघडण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे पालक नशाबज आहेत.काही स्रियादेखील नशा करतात. पितात.मटका लावतात.सार्वजनिक शौचालये,व इतर बांधकामाच्या साहित्यातले नळ तर हमखास उपसुन नेले गेले आहेत. काचा फोडल्या गेलेल्या आहेत.भंगारात विकल्या जणार्या वस्तु तर हमखास चोरीला जातात.म्हणून भंगार गोळा करणार्या व विकणार्या महिला,पुरुष,मुले,मुली यांच्यावर लक्षात ठेवले पाहीजे. त्यात ही मंडळी सराईत बनली आहेत. शिवाय त्यांच्या घरांमधील पुरुप आजुबाजूला थांबुन संरक्षण देतात.असेही समजते.
शिरुर बस स्टँडवर पारंपरिक चोरट्या जमाती (?)…
पारंपारीक चोरट्या जमातींपैकी अनेकांनी ती परंपरा काही प्रमाणात पुढे चालू ठेवली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अहमदनगर येथील एका निवृत्त महिलेच्या पर्सवर डल्ला मारुन दोन तरुण महिलांनी लुटले होते.ही बातमी आम्ही दिली होती. याच्या तपासात पुढे काय झाले?हे माहित नाही.पण आम्ही पिडीत वृद्ध निवृत्त महिलेशी फोनवर सविस्तर बोललो असता त्यांनी सांगितलेल्या वर्णनाशी साम्य असणार्या तरुण महिलांची उपस्थिती नवीन बसस्थानकात हमखास सापडते.
एकंदरच पोलिसांनी पत्रकारांना सहकार्य करावे,पत्रकार समाजात फिरत असतो.बारीक सारिक बाबी त्याच्या लक्षात आलेल्या असतात. त्याचा उपयोग समाजातील, ‘असामाजिक ‘ तत्वांना,घटकांना आवर घालण्यात यश मिळवण्याकरता होवू शकतो.