
शिरुर पोलिस स्टेशन
शिरुरमधुन अल्पवयीन मुलगी पळवली? तर दुसर्या घटनेत प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक असलेल्या श्री. बबन राऊत यांची मारुती कार गेली चोरीला !
शिरुरमधुन दोन घटनांमधे कार चोरी व अल्पवयीन मुलगी पळवली !
शिरुर,दिनांक 21 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )

शिरुरमधुन अल्पवयीन मुलगी पळवण्याची घटना घडली आहे. तर दुसर्या घटनेत प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक असलेल्या श्री. बबन राऊत यांची मारुती कार चोरीला आल्याची तक्रार शिरुर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक श्री. ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही घटनांचा तपास शिरुर पोलिस करत आहेत.
शिरुरमधुन कार चोरी झाली. …
शिरुर शहरातील या घटनांची सविस्तर हकीकत अशी आहे की प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक, लेखक श्री.रामदास बबन राऊत वय- 57 वर्ष , धंदा- खरेदी विक्री ,राहणार- समृद्धी अपारमेंट, जोशीवाडी, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे यांची मारुती स्विप्ट डिझायर कंपनीची कार पांढ-या रंगाची 14/12 MF 4028 ही दि २०/०७/२०२४ रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या ते सकाळी ११/०० वाजण्याच्या दरम्यान ते राहत असलेले समृध्दी अपार्टमेंट, जोशीवाडी, शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे येथे इमारती जवळ मोकळया जागेत लॉक करून लावलेली असता ती काणीतरी अज्ञात इसमाने चोरटयाने चोरून नेली आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादी त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.

अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन गुरनं 646/2024 वर तर भारतीय न्याय संहीता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार पोलिस नाईक जाधव हे आहेत तर पुढील तपासपोलिस नाईक शिंदे हे प्रभारी अधिकारी श्री. ज्योतीराम गुंजवटे ,पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
शिरुरमधुन बागवान नगर येथुन मुलगी रुसुन घराबाहेर गेली ती….
तर दुसर्या घटनेत काल दि. 20/07/2024 रोजी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास शिरूरच्या हद्दीत बागवान नगर येथे फिर्यादी व त्यांची अल्पवयीन मुलगी राहते.ती घरात असताना मुलगी बागवान नगर शिरूर, ता शिरूर जि पुणे येथील राहत्या घरी ती एका अनोळखी मुलासोबत इंस्टाग्राम चाट करत असताना फिर्यादी ( नाव गोपनीय) यांनी तिला पहिले.
फुस लावून पळवून नेणे म्हणजे एखादे खास प्रलोभन दाखवून एखाद्या स्री किंवा पुरुष याला आपले स्वतःचे किंवा आई वडिलांचे घर सोडुन दुसरीकडे राहण्यास नेणे असा साधारणपणे आहे.
अल्पवयीन मुलीला लग्नाचे किंवा इतर अमिष दाखवून तिच्या घरातुन तिला दुसरीकडे नेणे असा असतो. अल्पवयीन मुलगी म्हणजे वय 18 वर्षांपेक्षा मी असलेली मुलगी.तारुण्यसुलभ आकर्षण कुमारवयीन मुला मुलींच्या मधे नैसर्गीकपणे असते.मात्र आपल्या जिवनभराचा साथीदार निवडण्यासाठी हे वय कायद्याने योग्य मानले जात नाही.अशा परिस्थितीत मुलगा किंवा मुलगी हिला लग्नाचे अमिष किंवा प्रेमभावनेने तिला किंवा त्याला तिच्या किंवा त्याच्या घरातुन निघुन दुसरीकडे रहाण्यास सांगणे किंवा प्रवृत्त करणे बेकायदा आहे.जरी ती /तो स्वमताने असे कृत्य करत असेल तरी ! यामागे आयुष्यभर सोबत जगायचे असेल तर सुरक्षित व योग्य निर्णय व्हावा,घाईत भावनेच्या आहारी जावून असा निर्णय घेतला तर सर्व आयुष्य बरबाद होवू शकते. म्हणून अशा अर्थाचे काही कायदे या विषयातील तज्ञ,पालक,समाजसेवक इ.समाजधुरीन करत असतात.पण वय कमी असेल तर तेवढा विचार करता येत नाही. असे यामधे ग्रहित धरलेले असते.
ते तिला रागावले.त्यामुळे तिने घरातुन कोणास काही एक न सांगता रागाच्या भरात घराच्या दरवाजाचा कडी कोंडा लावला.त्यानंतर ती घरातून निघून गेली आहे.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद. …
परंतु तिला कोणीतरी अज्ञान पणाचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालेतून फूस लावून पळवून नेले आहे. अशी फिर्यादी यांची तक्रार आहे . त्यामुळे त्यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनला कायदेशीर तक्रार दिलीआहे.अज्ञात व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, 2023 ,कलम 137(2)प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंस्टाग्राम,फेसबुक, शेअरचाट,इ.सामाजिक डिजिटल माध्यमे अनेकांशी जोडले जाण्यासाठी योग्य अशी आहेत.यात शंका नाही. या माध्यमातुन अगणित शक्यता उपलब्ध असु शकतात.या माध्यमांची भुरळ तरुणाईला पडणेही स्वाभाविक बाब आहे. परंतु या माध्यमातून नेमके काय काम साधता येईल ,सकारात्मक कामे कशी करता येतील.अनेक अशा कामांसाठी या माध्यमांमधून लोक एकत्र येतात.
अशा परिस्थितीत थेट एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधता येतो.पण कुमारवयीन मुले मुली या साधनांकडे मित्र जोडणे या उद्देशाने एकमेकांच्या जवळ येणे हा एक चांगला भाग आहे. पण ज्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष कधी भेटलो नाही.त्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवावा.याला मर्यादा आहे.याचे भान मुलामुलींना रहात नाही. त्यातून अनेक गैरप्रकार घडताना समोर येत असताना मुले मुली या माध्यमांद्वारे फसु शकतात.आयुष्याला वेगळे वळण देणार्या काही निर्णयांबाबत मुले मुली गंभीर नसतात.त्यांचे ते वय नसते.अशा परिस्थितीत पालकांनी आपली मुले या माध्यमांकधुन नेमके काय करतात.याकडे काळजीपुर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण हा विषय याचसाठी फार महत्त्वाची भूमिका पार पाडु शकतो.OMG या हिंदी चित्रपटामधुन या विषयावर चांगले भाष्य केले आहे. पालक,शिक्षक,विद्यार्थी विद्यार्थिनींनी असे प्रबोधनकारक चित्रपट पाहणे आवश्यक आहे.
यात दाखल पोलिस नाईक कोथळकर हे आहेत तर पुढील
तपास पोलीस नाईक मोरे हे प्रभारी अधिकारी श्री.ज्योतीराम गुंजवटे,निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.