
शिरूरमध्ये अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत नेपाळी मजुराचा गंभीर दुखापतीने मृत्यू
शिरूर, पुणे (12 मे 2025):
( Satyashodhak News Report )
शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर येथील एक गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे. रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 9:15 ते 9:30 च्या दरम्यान कोळपे हॉस्पिटलजवळील पुणे-अहिल्यानगर हायवेवर अज्ञात वाहनाने एक व्यक्तीस जोरात धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.
फिर्यादी श्री. रुपेश टेकबहादुर दमाई (वय 24 वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. बाबुराव नगर, ता. शिरूर, मूळ – अच्छाम, नेपाळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या चुलत्यांना – श्री. पहिला दिले दमाई (वय 50 वर्षे) यांना रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला व इतर भागांमध्ये गंभीर जखमा झाल्या असून त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
ही घटना शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 318/2025 अंतर्गत BNS कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब), मो. वा. का. क 134, 177, 184 अन्वये नोंदविण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास पो.हवा खेडकर हे करत आहेत. अज्ञात वाहन व त्याचा चालक यांचा शोध सुरू असून स्थानिक पोलीस विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.