Contents
राष्ट्रीय समाज पक्ष नेते शिवाजीराव कुर्हाडे यांनी भरला उमेदवारी अर्ज ! शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील लढतीत येऊ लागला आहे रंग !
राष्टीय समाज पक्षाचे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात शक्ती प्रदर्शन !
शिरुर ,दिनांक 1 नोव्हेंबर : ( प्रकाश करडे यांच्याकडुन )
राष्ट्रीय समाज पक्ष नेते शिवाजीराव कुर्हाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे ! शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील लढतीत आता रंग येऊ लागला आहे ,असे म्हणायला हरकत नाही. निवडणुक अर्ज भरताना राष्टीय समाज पक्षाचे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात भव्य शक्ती प्रदर्शन या निमित्ताने केले आहे. महा आघाडी चे उमेदवार श्री.अशोक पवार,महायुतीचे उमेदवार श्री.माऊली आबा कटके यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार श्री.शिवाजीराव कुर्हाडे व ‘बहुजन मुक्ती पक्षाचे श्री.नाथाभाऊ पाचर्णे अशा चार प्रमुख उमेदवारांमधे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात तुंबळ लढत रंगणार हे स्पष्ट आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष राज्यातील सर्व जागा लढणार !
राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्रपणे राज्यातील सर्व 288 जागा लढवत आहेत.फडवणीस सरकार मधे मंत्रीपदी राहिलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक नेते आहेत.’राष्टीय समाज पक्ष’
राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्रपणे राज्यातील सर्व 288 जागा लढवत आहेत.फडवणीस सरकार मधे मंत्रीपदी राहिलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक नेते आहेत.
शिवाजीराव कुर्हाडे : सर्वसामान्यांचा आधार! ….
श्री.शिवाजीराव कुर्हाडे हे एक शुन्यातुन प्रवास करणारे व्यक्तिमत्व आहे.सर्वसामान्य माणसात वावरणारे ते कार्यकर्ते आहेत. शिरुर तालुक्यात असलेल्या रांजणगाव एम आय डी सी मधे स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा ही त्याची प्रमुख मागणी आहे.शिवाजीराव कुर्हाडे हे स्वत: शिक्षण शास्राचे B.ed. पदवीधर आहेत.बर्याच वर्षांपासून शिवाजीराव कुर्हाडे हे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात कार्यरत आहेत. त्यांची ओळख या मतदार संघात नवीन नाही.प्रामुख्याने शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील धनगर समाज हा राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्य कणा मानला जातो. धनगर समाज शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात लक्षणीय मतदार संख्या असलेला भाग आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार शिवाजीराव कुर्हाडे हे मोठे मतदार खेचण्यात यशस्वी ठरतील का? असे घडल्यास शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील समीकरणे बदलु शकतात.मात्र शिवाजीराव कुर्हाडे यांना सर्व बहुजन समाजाची मते मिळतील.कारण राट्रीय समाज पक्ष हा ”बहुजन ‘ चळवळीतील एक महत्वाचा पक्ष आहे, असा शिवाजीराव कुर्हाडे यांना विश्वास असुन सर्व समाजातुन त्यांना भरघोस मते मिळतील, असे त्यांनी ‘सत्यशोधक न्युज’ शी बोलताना सांगितले आहे.
जोरदार शक्ती प्रदर्शन. …
उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या संख्येने पायी,दुचाकी आणि चारचाकी वाहनांतुन महिला,पुरुष मोठ्या संख्येने न्हावरा फाटा,शिरुर येथुन शिरुर तहसिल कार्यालय परिसरात जमा होउन शिवाजीराव कुर्हाडे यांना समर्थन करण्यासाठी जमला होता.त्यामुळे मतदारांचे लक्ष वेधुन घेण्यात राष्ट्रीय समाज पक्षाला यश मिळाले आहे. हे आज स्पष्ट दिसत आहे.
पक्षाचे मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने. ..
यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय समाज पक्षाचे
जिल्हाध्यक्ष किरण गोपने, शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मच्छिंद्र शेठ कारंडे, माजी सरपंच कृष्णा गुलदगड, माजी सरपंच हनुमंत ऊकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष राजेंद्र पुणेकर, संपर्कप्रमुख वाल्मीक करे, उपसरपंच भिमाजी करे, प्रकाश येळे, मेजर बाबाजी कारंडे, उद्योजक विठ्ठल कुराडे, उपाध्यक्ष राजू थोरात, धोंडीबा कोळपे,प्रवीण लगड, भानुदास ढमढेरे इ.कार्यकर्ते उपस्थित होते.
