
Contents
- 1 शिवसेना जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेने, चा शिरूर शहरात उत्साहात मेळावा संपन्न !
- 1.1 शिरुरमधे शिवसैनिक पुन्हा कार्यरत !
- 1.1.1 शिरुर,दि.26 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
- 1.1.2 शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती….
- 1.1.3 शिवसैनिकांना मार्गदर्शन उल्हास भाऊ तुपे यांचे……
- 1.1.4 शिवसेनेत नव्यांचा समावेश…..
- 1.1.5 शिवसेनेची शिरुरमधील पार्श्वभूमी….
- 1.1.6 शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रभाव….
- 1.1.7 आजची ‘महायुती’ अवस्था. …
- 1.1.8 उद्धव ठाकरे यांचा नैतिक विजय?…
- 1.1.9 About The Author
- 1.1 शिरुरमधे शिवसैनिक पुन्हा कार्यरत !
शिवसेना जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेने, चा शिरूर शहरात उत्साहात मेळावा संपन्न !
शिरुरमधे शिवसैनिक पुन्हा कार्यरत !
शिरुर,दि.26 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )

शिवसेना जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेने, चा शिरूर शहरात उत्साहात मेळावा संपन्न झाला आहे. त्यामुळे
शिरुरमधे शिवसैनिक पुन्हा कार्यरत (?) होत असल्याचे चित्र आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती….
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रमोद नाना भानगिरे, पुणे शहर, प्रमुख नगरसेवक ,पुणे मनपा ,उल्हास भाऊ तुपे, जिल्हा प्रमुख, शिवसेना,निलेश भाऊ माझी रे, जिल्हाप्रमुख ,जय महाराष्ट्र माथाडी कामगार सेना ,शरद भाऊ नवले, उपजिल्हाप्रमुख ,शिरूर तालुका,मल्हारी शेठ काळे, शिरूर तालुकाप्रमुख ,
मयूर थोरात , शहर प्रमुख, शिरूर
सुरेश गाडेकर , तालुकाप्रमुख वैद्यकीय मदत कक्ष ,
संकेत महामुनी , तालुकाध्यक्ष माथाडी कामगार संघटना, अभिषेक मिसाळ ,सुरज पाडळे, चेतन कुशेकर असे अनेक शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .’शिवसेना‘
शिवसैनिकांना मार्गदर्शन उल्हास भाऊ तुपे यांचे……
मेळाव्यामध्ये मार्गदर्शन उल्हास भाऊ तुपे यांनी केले. ” त्यामध्ये त्यांनी कामगारांचे न्याय हक्क व संरक्षणाच्या माध्यमातून व माथाडी कामगार संघटनेच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार व त्यांना औद्योगिक महामंडळ क्षेत्रामध्ये पूर्णपणे ताकद देऊन स्वतःच्या स्वबळावर उभे राहण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार ” असे प्रतिपादन यावेळेस जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे यांनी केले .

शिवसेनेत नव्यांचा समावेश…..
मेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला व जय महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेतील पदाचे नियुक्तीपत्र देऊन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. त्यामध्ये संकेत महामुनी यांना शिरूर तालुका माथाडी कामगार सेना तालुका अध्यक्ष पद देण्यात आले आहे. अभिषेक मिसाळ , सुरज पाडळे, चेतन कुसेकर यांना उपतालुका प्रमुख पदी नियुक्तीचे पत्र उल्हास भाव तुपे ,नाना भानगिरे यांच्या हस्ते देण्यात आले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन कुसेकर यांनी केले तर प्रास्ताविक सुरेश गाडेकर यांनी केले . आभार सुरज पाडळे यांनी मानले.
शिवसेनेची शिरुरमधील पार्श्वभूमी….
शिरुरमधे शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासुन शिवसेनेच्या काममधे अनेक खस्ता खाल्ल्या. पुर्वीच्या शिवसेनेच्या झंजावाती काळात शिरुरमधील कट्टर शिवसैनिक शिवसेनेचे विभाजन होऊन एकनाथ शिंदे शिवसेना व उद्धव ठाकरे शिवसेनेत विभागले गेले होते.आतादेखील ही विभागणी शिरुर शिवसेनेत आहे.उद्धव ठाकरे यांना मानणारे व शिंदे यांना माणणारे पण माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या थ्रु !
शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रभाव….
म्हणजे माजी खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांचे व्यक्तीगत निष्ठावंत असणारे शिवसैनिक दादा जिथे असतील तिथे ते असणार ! यामधे पक्षनिष्ठा की नेतानिष्ठा हा प्रश्न गौण ठरतो.स्वतः माजी खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी श्री.अजित पवार राष्रवादी कांग्रेस चे चिन्ह घड्याळ घेउन 2024 ची लोकसभा निवडणुक लढले.महायुतीतुनच लढले.पण श्री.एकनाथ शिंदे शिवसेनकडून न लढता राष्रवादी कांग्रेस च्या घड्याळ चिन्हावर लढले.या चिन्हाचा उपयोग माननीय शरद चंद्रजी पवार यांच्या उमेदवाराला पाडण्यासाठी होईल,असा त्यांचा कयास असावा.पण तो प्रयोग अयशस्वी ठरला.
आजची ‘महायुती’ अवस्था. …
अजितदादा अजुन महायुतीत आहेत.कारण केंदात मोदी सरकार आहे.ज्या कारणामुळे ते शरदचंद्र पवार यांना सोडून गेले किंवा त्यांना जाणे भाग पडले.ते कारण बहुदा अद्याप कायम असावे.जर केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार तरले नसते तर अजितदादा महायुतीत नसते.कारण ते कारण राहिले नसते.मोदी सरकार पाडण्यासाठी भाजप,संघातच काही जण इच्छुक आहेत.हे आता स्पष्ट झाले आहे. कदाचित ते वर्षभरात पडेलही ! पण आतुन की बाहेरुन हे सांगता येत नाही. मोदी यांनीच ठरवलेला भारतीय जनता पक्ष अंतर्गत वय 75 चा नियम तेच स्विकारुन नेतृत्वबदल करतील किंवा अपवाद किंवा जनतेच्या हितासाठी नियमास एक अपवाद बनतील.पक्षांतर्गत असल्याने भारतीय जनता पक्ष कोलांटीउडी मारु शकतो.संघ मौन धरण करु शकतो.तरी आता संख्यबळ कमी असल्याने कोनताही मोठा निर्णय किंवा दुरुस्ती करता येणार नाही.
उद्धव ठाकरे यांचा नैतिक विजय?…
इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी आपणच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहोत.हे निवडणुक निकालानंतर हे सिद्ध केले.लोकांची निष्ठा बाळासाहेबांवरच जास्त होती.ठाकरे नावावरच जास्त होती हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्याला देवेंद्र फडणवीस हे कारणीभुत ठरले.मोदी व संघनिष्ठेपायी त्यांनी मराठी माणसाला दुखवले.गुजराती जोडगोळीची जी महाराष्ट्र विरोधी मानसिकतेची आहे.अशी समजुन महाराष्ट्रात पक्की व्हायला महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमधे जाणे आणि मोदीजी मोदीजी हा एकच रट्टा लोकांसमोर निवडणुक प्रचारात लावल्याने मराठी माणसाची उरली सुरली सहानुभुती संपवून घेतली.आणि मोदीजींनी ऐन प्रचारदौर्यात महाराष्ट्रातील ऐंशी उलटलेल्या शरदचंद्रजी पवार यांना भटकता आत्मा म्हणणे आणखी अंगलट आले.
महाराष्ट्रातील मुलभूत समस्या बेरोजगारी,महागाई,जीएसटीने त्रस्त लोक,गस,पेट्रोल दर कुठच्या कुठे गेले. ते प्रश्न न घेता भटकता आत्मा च मागे लावून घेतला.तो आता निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत मोदीजींच्या मागे भटकणार नाही तर काय होणार ! आकड्यांच्या खेळाची टांगती तलवार असल्याने आत्मा मोदीजींना शांत झोप येवू देणार नाही हे ही नक्की !