
Contents
सोन्याची अंगठी, बिस्कीट, मोबाईल आणि रोकड चोरी !साई लंचहोम जवळ घडली घटना!
शिरूर ,२८ एप्रिल २०२५ : (कल्पना पुंडे यांच्याकडुन)
सोन्याची अंगठी, बिस्कीट, मोबाईल आणि रोकड चोरी:शिरूर (जि. पुणे) येथील साईलंच होम शेजारील मार्बलच्या दुकानाजवळ एक गंभीर चोरीची घटना घडली आहे. दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.30 ते 8.30 च्या सुमारास पुणे नगर हायवे रोडवर व्हिजन इंटरनॅशनल स्कूल जवळ बस अचानक बंद पडल्याने काही प्रवासी मार्बलच्या मंदिर पाहण्यासाठी गेले असता ही घटना घडली.
पर्स झाली झाली गायब—
प्रवासी शांतम्मा यांनी आपली भगव्याआ रंगाची पर्स मार्बल मंदिराजवळ ठेवली होती. काही वेळाने परत येऊन पाहिले असता पर्स गायब आढळली. शोधाशोध करूनही पर्स न मिळाल्याने अखेर शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चोरीस गेलेला माल:
• ₹200 ची भगवा रंगाची पर्स
• ₹70,000 किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
• ₹45,500 किमतीचे 6.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट
• ₹88,000 रोख रक्कम (500, 200 व 100 च्या नोटा)
• ₹3,000 किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल (सिम क्र. 8217401489)
शिरूर पोलिसांकडुन पुढील तपास सुरू —
या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल क्र. 279/2025, भारतीय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी अज्ञात असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
तपास अधिकारी: मा. संदेश केंजळे, प्रभारी अधिकारी, शिरूर पोलीस स्टेशन.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …