प्रजनन क्षमता स्रियांच्या शिक्षणामुळे कमी होते ; कारण.. अ,ब,क,ड ?
प्रजनन क्षमता स्रियांच्या शिक्षणामुळे कमी होते ! कारण..
अ,ब,क,ड ? असा प्रश्न एम पी एस सी च्या परिक्षेत विचारला गेला आहे. मात्र हा प्रश्नच चुकीचा आहे. हा काय,कोणाचा,कोठे असा प्रश्न विचारला गेला आहे. आणि कोणी फेटाळला आहे हा दावा?हे सविस्तर वाचण्यासारखं मात्र नक्कीच आहे.
प्रजनन क्षमता स्रियांच्या शिक्षणामुळे कमी होते ! कारण..
अ,ब,क,ड ? असा प्रश्न एम पी एस सी च्या परिक्षेत विचारला गेला आहे. मात्र हा प्रश्नच चुकीचा आहे. हा काय,कोणाचा,कोठे असा प्रश्न विचारला गेला आहे. आणि कोणी फेटाळला आहे हा दावा?हे सविस्तर वाचण्यासारखं मात्र नक्कीच आहे.
एम पी एस सी परीक्षेमध्ये स्त्रियांच्या संबंधित प्रश्न. …
राज्य सरकारच्या एम पी एस सी परीक्षेमध्ये स्त्रियांच्या शिक्षणामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होते ; कारण.. अ,ब,क, ड अशा पद्धतीचा पर्यायी उत्तरे सांगणारा प्रश्न विचारला गेला आहे. या प्रश्नातुन स्रियांचा अवमान होत असल्याची घणाघाती टिका आम आदमी पक्षाचे नेते व महाराट्र राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी राज्य सरकारवर केली आहे.
मुकुंद किर्दत यांची सरकारवर घणाघाती टिका …..
मुकुंद किर्दत, आम आदमी पक्ष प्रवक्ते, महाराट्र.
या प्रश्नावरून सोशल मीडिया वरती बरीच चर्चा रंगलेली आहे.
” मुळात प्रजनन क्षमता आणि शिक्षण याचा एकमेकांशी काही संबंध नाही. प्रजनन दर कमी जास्त होतो . याचा सामाजिक परिस्थितीशी संबंध निश्चित असतो. परंतु प्रश्नच चुकीचा असल्यामुळे त्यातून अनेक शंका निर्माण होतात.’असे मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.’प्रजनन क्षमता”
संपादकिय. …
Dr.Not in Pawar, Editor -satyashodhaknews.com
” गेल्या अडीज हजार वर्षांमधे भारतीय समाजात कठोर अशी एक प्रतिगामी व्यवस्था चालली.यात स्रीयांचे स्री म्हणुन शोषण ,कमकुवत म्हणुन शोषण,पुरुषी अहंकारामधुन शोषण,जाती व्यवस्थेतुन शोषण,धार्मिक व्यवस्थेमधुन ही शोषण होत आले आहे. त्याचे उदात्तीकरण करताना स्री ला देवता मानुन दिशाभुल करुन एकीकडे केलेले शोषण,दुसरीकडे स्री म्हणजे ‘नरकाचे द्वार’ असे ग्रंथांमधे लिहुन ही शोषण केले गेलेले आहे.
आधुनिक काळात आता भारतीय संविधानाने स्रीला पुरुषाच्या बरोबरीचे स्थान दिले गेले.ती गुलामगिरीतुन मुक्त होऊन स्वातंत्र्य अनुभवी लागलेले एक चित्र आज समाजात दिसत आहे. मात्र पुरुषी वर्चस्ववादी मानसिकतेला हे सहन होत नाही. त्यातुन पुन्हा पुरुषी वर्चस्ववादी व्यवस्था रुजवु पाहणारा एक वर्ग कार्यररत आहे.
त्याच्या मानसिकतेचे एक प्रतिबिंब अशा प्रकारच्या कृत्यातुन दिसते.परंतु आता काळाला मागे फिरवणे सोपे नाही.सध्याची तरुण पिढी कळत नकळत का होईना बंडच करताना दिसत आहे. पारंपारीक अनेक विचार,रुढी,परंपरांना भिक न घालता स्वतः विचार करून निर्णय घेताना दिसत आहे. त्यातुन आलेली एक प्रतिक्रीया संघसंचालक मोहन भागवत यांच्या विधानांतुन दिसते.संघ एक राष्ट्रवादी,अखंड भारतवादी,स्वदेशीवादी वगैरे विचारांची जगातील सर्वात मोठी संघटना जरुर आहे.मात्र सामाजिक परिवर्तनाची दिशा भुतकाळाकडे फिरवणे,हे संघाला अपेक्षित आहे का?असा प्रश्न पडतो.”
या प्रश्नाच्या उत्तरांमधील पर्याय….
अ. शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात.
ब. मुलांनी शिक्षित व्हावे वाटते. क. गर्भनिरोधकांविषयी अधिक ग्रहणक्षम बनतात. ड. आर्थिक परिस्थिती सुधारते.
” अशा प्रकारचे पर्याय दिले गेलेले आहेत. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधताना त्यामध्ये एकदम काळे – पांढरे असं नसतं आणि परिस्थिती अनुरूप समाजमन निर्णय घेत असते. अनेक घटकांच्या प्रभावामुळे एखादा वैयक्तिक निर्णय घेतला जातो व त्यातून एकत्रित परिणाम म्हणून समाजाचा कल दिसतो. त्यामुळे अशा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने काळे पांढरे स्वरूपात उत्तर शोधण्याची वृत्ती ही सुद्धा घातक आहे . आणि गंभीर बाब ही की हा प्रश्न महाराष्ट्राचे प्रशासन सांभाळू पाहणाऱ्या उमेदवारांना विचारला जात आहे. त्यांची समज या पर्यायी उत्तरांच्या पलीकडे असायला हवी.
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा. ——- अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा. —– आपला, डा.नितीन पवार,संपादक, सत्यशोधक न्युज, satyashodhak.blog
स्रियांचा अवमान ?
या प्रश्नातून स्त्रियांचा अवमान होत असल्याची भावना निश्चितपणे निर्माण होते, त्यामुळे यावर आयोगाने स्पष्टीकरण द्यायला हवे.” असे श्री. मुकुंद किर्दत यांनी पुढे म्हटले आहे.
” दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोनच दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी सुद्धा प्रजननाचा दर वाढला पाहिजे असे मतप्रदर्शन केले होते. त्यामुळे या सगळ्यात महिलांना उपदेश करणारे, ‘चूल आणि मूल’ यामध्ये अडकवू पाहणारे अनेक मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत.”
महाराष्टात म.फुले,शाहु महाराज ,डा.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्रीसुधारणेचे कार्य….
“ज्या महाराष्ट्रामध्ये फुले यांनी मुलींना शिक्षण मिळवून दिले. विधवांची बाळंतपणे केली. बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क मिळवून दिले. त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची पुरुषप्राधान्य मानणारी टीकाटिप्पणी ही समाजाला प्रतिगामित्वाकडे नेणारी आहे.” अशी टिका मुकुंद किर्दत यांनी राज्य सरकार व राष्टीय स्वयंसेवक संघावर केली आहे.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com