
Contents
- 1 Top 10 पर्यटन केंद्र शिरुर तालुका ! एक अभ्यासपुर्ण लेख !
- 1.1 Top 10 Paryatan Kendra Shirur Taluka
- 1.2 ” Top 10 Paryatan Kendra Shirur Taluka | शिरूर तालुक्यातील नैसर्गिक, ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या दहा ठिकाणांची ही माहितीपूर्ण सफर आपल्याला निसर्गाचे चमत्कार, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान, इनामगावचे पुरातत्त्वीय महत्त्व, कोरेगाव-भीमा विजयस्तंभाची सामाजिक प्रेरणा, औद्योगिक पर्यटन, शैक्षणिक केंद्रे व मस्तानीच्या महालाचे अवशेष अशा विविध पैलूंशी जोडते. शिरूरचा इतिहास, भूगोल आणि संस्कृती यांची ओळख करून देणारा हा लेख पर्यटनप्रेमी, अभ्यासक आणि स्थानिक इतिहास जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.”
- 1.2.1 1. रांजणखळगे (निसर्गाचा चमत्कार) ,टाकळी हाजी —-
- 1.2.2 2. इनामगाव (पुरातत्त्वीय ठिकाण)—
- 1.2.3 3. संभाजी महाराज स्मारक, वढु–
- 1.2.4 4. कोरेगाव भीमा विजयस्तंभ (भीमा-कोरेगाव युद्ध स्मारक)—
- 1.2.5 5 . रांजणगाव MIDC आणि उधोग पर्यटन—
- 1.2.6 6. सी. टी. बोरा कॉलेज, शिरुर—-
- 1.2.7 7. मोराची चिंचोली (निसर्ग पर्यटन)—
- 1.2.8 8. १७ कमानींचा ऐतिहासिक पूल, घोडनदी,शिरुर —
- 1.2.9 9. रांजणगाव महागणपती मंदिर (अष्टविनायक)—
- 1.2.10 10. मस्तानीचा महाल (अवशेष), पाबळ—
- 1.2.11 About The Author
Top 10 पर्यटन केंद्र शिरुर तालुका ! एक अभ्यासपुर्ण लेख !
Top 10 Paryatan Kendra Shirur Taluka
3 जुन 2025 | लेख – डॉ.नितीन पवार, संपादक |
” Top 10 Paryatan Kendra Shirur Taluka | शिरूर तालुक्यातील नैसर्गिक, ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या दहा ठिकाणांची ही माहितीपूर्ण सफर आपल्याला निसर्गाचे चमत्कार, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान, इनामगावचे पुरातत्त्वीय महत्त्व, कोरेगाव-भीमा विजयस्तंभाची सामाजिक प्रेरणा, औद्योगिक पर्यटन, शैक्षणिक केंद्रे व मस्तानीच्या महालाचे अवशेष अशा विविध पैलूंशी जोडते. शिरूरचा इतिहास, भूगोल आणि संस्कृती यांची ओळख करून देणारा हा लेख पर्यटनप्रेमी, अभ्यासक आणि स्थानिक इतिहास जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.”
1. रांजणखळगे (निसर्गाचा चमत्कार) ,टाकळी हाजी —-

टाकळी हाजी गावात नैसर्गिकरित्या तयार झालेले मोठाले गोलाकार खळगे आहेत. ते पावसाळ्यात हे खूप सुंदर दिसतात.ते नदीपात्रात आहेत.खळगे आणखीन आत व खाली गुंतागुंतीचे आकार असलेले आहेत.देवी,देवतांच्या आख्यायिका देखील याबाबतीत सांगितल्या जातात.पण त्या नंतरच्या काळातील आहेत.पण भौगोलिक घटना जसे की ज्वालामुखीच्या हालचाली होवुन तो आज असलेला खडक बनला असणे शक्य आहे. मात्र ज्वालामुखीसारखी परिस्थिती या भागात असु शकते.पण काही लाख वर्षांपूर्वी असु शकते.तो थंड व्हायलाही काही हजार वर्षे लागू शकतात.गाव काही शतकांपुर्वी तिथे वसले असणे शक्य आहे. दिसताना मानवाला थक्क करुन सोडतील इतकी ती रचना पाहण्यासारखी नक्की आहे.मात्र ती नैसर्गिक आहेत.त्यामागे कोणताही अतीमानवी ‘चमत्कार’ नाही.यावर संशोधनाला खुप वाव आहे.त्यातुन भौगोलिक माहितीत भर पडु शकते.
2. इनामगाव (पुरातत्त्वीय ठिकाण)—
इनामगाव हे भारतातील प्रसिद्ध पुरातत्व ठिकाणांपैकी एक आहे. येथे २००० वर्षांपूर्वीचे मानववस्तीचे पुरावे सापडले आहेत. याची तुलना व अभ्यास मोहेंजोदारो,हरप्पा,कालीबंगन इ.पुरातत्वीय अवशेषांशी होवु शकते. त्यादृष्टीने अभ्यासकांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.इथेही आणखीन संशोधन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होवु शकते.
3. संभाजी महाराज स्मारक, वढु–
शूर मराठा योद्धा संभाजी महाराजांचे स्मारक आणि समाधीस्थळ वढू येथे आहे.येथे संभाजीराजांची हत्या मुगल बादशहा औरंगजेब व त्याचे सल्लागार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. आधी फंदफितुरीने भुमिगत असणार्या संभाजी महाराजांना तळकोकणात मुगल सैन्याने बंदिवान केले होते.अंगावर शहारे आणणारे हे स्थान संभाजी महाराज यांचे स्वराज्य रक्षणासाठीचे बलिदान केवळ न भुतो न भविष्यती असे आहे.औरंगजेब असे नाव सुद्धा नंतर कुणाची आपल्या मुलांचे ठेवण्याचे धाडस झालेले नाही. हे विषेश ! अशा इतिहासाची जाणीव करून देणारे आहे.
4. कोरेगाव भीमा विजयस्तंभ (भीमा-कोरेगाव युद्ध स्मारक)—

१८१८ मधील ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ उभारलेला हा स्तंभ ‘दलित स्वाभिमाना’चे प्रतीक मानला जातो. दरवर्षी १ जानेवारीला येथे लाखो अनुयायी भेट देतात.या ठिकाणी इंग्रज व पेशवे यांच्यात लढाई झाली.इंग्रज व पेशवे दोघांच्याही पदरी अनेक जाती,धर्माचे सैनिक नोकरी करत असत.परंतु पुण्यात पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेसारखी अमानवी प्रथा कळसाला पोचली होती.म्हणुन अशी पेशवाई नष्ट करण्याच्या तीव्र भावनेने इंग्रज सैन्यात नोकरी करणारे ,’ महार’ या त्यावेळच्या ‘अस्पृश्य’ मानल्या गेलेल्या 500 सैनिकांनी पेशव्यांचा पराभव करण्यासाठी ऐतिहासिक अशी लढाई करुन पेशव्यांच्या 28000 सैनिकांना नामोहरम केले.या लढाई नंतर पेशवाई संपली.त्यामुळे एक सामाजिक प्रेरणेतुन घडलेला अभुतपुर्व रणसंग्राम या ठिकाणी घडला.हे खास वैशिष्ट्य या लढाई व ठिकाणाचे आहे.भारताचा इतिहास असाच अनेक रोमांचक पैलु असलेला आहे.
5 . रांजणगाव MIDC आणि उधोग पर्यटन—
शिरूर तालुक्याचा आर्थिक कणा असलेले रांजणगाव एमआयडीसी हे विविध औद्योगिक क्षेत्रांसाठी प्रसिद्ध आहे. शैक्षणिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून भेट देण्यासारखे.इथे मोठ्या कंपन्या,परिसर,कारखाने,रस्ते,देश व विदेशातील कामगार ,तज्ञ,अधिकारी, कामगार तरुण तरुणी दिसतात.पाहण्यासारखा असा हा परिसर आहे.
6. सी. टी. बोरा कॉलेज, शिरुर—-
शैक्षणिक पर्यटनाच्या दृष्टीने, सी. टी. बोरा कॉलेज हे शिरूरचे महत्त्वाचे शिक्षणपीठ आहे. स्थानिक आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा केंद्रबिंदू असलेले हे भव्य आणि सुंदर ठिकाण आहे.ते प्रत्यक्ष पाहिल्यावरच अनुभव येतो.
7. मोराची चिंचोली (निसर्ग पर्यटन)—
शिरूरपासून जवळ असलेले हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मोरांचे नैसर्गिक अधिवास असून बाळगुटी शिवार, बागायत शेती आणि ग्रामीण पर्यटनाची चांगली सुविधा आहे.इथे राहण्यासाठी,जेवणासाठी व अगदी झाडांवर तयार केले गेलेले निवासस्थान आहे.नर्सरी,खगोल प्रेमीसाठी व विद्यार्थ्यांसाठी एक खास केंद देखील येथे आहे.
8. १७ कमानींचा ऐतिहासिक पूल, घोडनदी,शिरुर —
घोडनदीवरील १७ कमानींचा हा पूल ब्रिटिश काळातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. फोटोग्राफर आणि इतिहासप्रेमींसाठी खास आकर्षण.येथील सुर्योदय व सुर्यास्त ,पुल,पुलाच्या 17 कमानी,दोन्ही बाजूने नदीपात्र,पाणी आणि सुर्यकिरणे पाण्यावर वेगवेगळ्या पद्धतीने पडल्यानंतर डोळ्यांना सुखावणारा ‘नजारा’ अप्रतिम अनुभव देतो.इंग्रज काळीतील भक्कम दगडी बांधकाम देखील विशेष असेच आहे.
9. रांजणगाव महागणपती मंदिर (अष्टविनायक)—
हे अष्टविनायकातील एक महत्त्वाचे गणपती स्थान. येथे महागणपतीची भव्य मूर्ती असून मंदिराची शिल्पकला आणि वातावरण मन प्रसन्न करणारे असते. भाविक आणि पर्यटक यांची येथे वर्षभर वर्दळ असते.
10. मस्तानीचा महाल (अवशेष), पाबळ—
पेशवे बाजीराव आणि मस्तानीच्या प्रेमकथेचे हे शांत आणि गूढ वाटावे असे हे स्थळ शिरुर तालुक्यातील पाबळ गाव आहे.तेथे मस्तानीच्या महालाचे भग्न अवशेष आहेत.बाजीराव पेशवे यांनी मस्तानीसाठी महाल होता.त्याचे अवशेष म्हणजे मस्तानीसाठी बांधलेला महाल येथे होता, असे स्थानिक सांगतात. जरी महालाचा बहुतांश भाग आता उध्वस्त आहे, तरी उरलेले अवशेष त्या कालखंडाची आठवण करून देतात. इतिहासप्रेमी व अभ्यासकांनी एकदा तरी अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या—
1. इनामगाव पुरातत्त्व माहिती (Archaeological Survey of India):
https://asi.nic.in
2. कोरेगाव भीमा युद्ध व स्मारक माहिती (Gov. Gazetteer of Maharashtra):
https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/
3. रांजणगाव महागणपती मंदिर (Ashtavinayak Temples Info):
https://www.ashtavinayaktemples.com/mahad-ganpati-temple/
4. मोराची चिंचोली पर्यटन माहिती:
https://www.morachichincholi.com/
5. सी.टी. बोरा कॉलेज शिरूर:
https://ctboracollege.edu.in/
6. रांजणगाव MIDC अधिकृत माहिती:
https://midcindia.org/
7. मराठी विकिपीडिया – संभाजी महाराज:
https://mr.wikipedia.org/wiki/संभाजी_महाराज
8. मस्तानी आणि बाजीराव प्रेमकथा (महाराष्ट्र पर्यटन):
https://www.maharashtratourism.gov.in/
9. गुगल लोकेशन लिंक (Google Maps) प्रत्येक ठिकाणासाठी वापरता येतील:
Vadhu Budruk – Sambhaji Samadhi
https://Ghodnadi Bridge Shirur
https://Ranjangaon Mahaganpati
अशीच महत्वाची आणखीन माहिती आपल्याला खालील संकेतस्थळावर क्लिक केल्यावर मिळेल—
Top 10 Hotels Shirur: शिरुर शहरातील टॉप १० हॉटेल्स – एक परिपूर्ण मार्गदर्शक