शिरुर विधानसभा मतदार संघ : टाप 10 इंटरेस्टींग फक्टस !
शिरुर विधानसभा मतदार संघातील Top 10 इंटरेस्टींग फक्टस सत्यशोधक न्युज ने शोधून काढले आहेत.ते शिरुर विधानसभा मतदार संघातील आजच्या पिढीसाठी अनोखी माहिती देतात.
शिरुर विधानसभा मतदार संघ : टाप 10 इंटरेस्टींग फक्टस !
शिरुर विधानसभा मतदार संघात आजच्या पिढीसाठी अनोखी माहिती !
शिरुर,दि.5 जुलै :
(Dr.Nitin Pawar,Editor, Satyashodhaknews.com)
(डा.नितीन पवार, संपादक)
शिरुर विधानसभा मतदार संघातील Top 10इंटरेस्टींग फक्टस सत्यशोधक न्युज ने शोधून काढले आहेत.ते शिरुर विधानसभा मतदार संघातील आजच्या पिढीसाठी अनोखी माहिती देतात.
शिरुर विधानसभा मतदार संघ आधी होता ; आता शिरुर हवेली. …
शिरुर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्र राज्य विधानसभा स्थापित करणारा महाराष्ट्रातील 198 वा मतदार संघ आहे. या मतदार संघामध्ये विधानसभेसाठी आजपर्यंत 14 वेळा निवडणुक झाली होती. मतदार संघाच्या रचनेमधे बदल होऊन आज हा मतदार संघ शिरुर हवेली मतदार संघ बनला आहे.
शिरुर विधानसभा मतदार संघ आणि तरुण पिढी….
आगामी 15 व्या निवडणुकीसाठी मतदार असणारी पिढी नवी पिढी प्रामुख्याने असणार आहे. या नवीन पिढीला आपल्या शिरूर विधानसभा मतदार संघाचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही ठळक घटना ,माहीती,किस्से,व्यक्ती शिरुर विधानसभा मतदार संघामधील लोकांना सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अशा काही ठळक बाबींचे क्रम आम्ही केले आहेत.एकुण 10 बाबी उलट्या क्रमाणे म्हणजे क्रमांक 10,9,8,7 अशा पद्धतीने टौप नंबर 1 पर्यंत क्रम असणार आहे !
स्व.रसिकलाल धारीवाल, एक धडाडीचे व्यक्तीमत्व!
10. 1972 च्या शिरुर विधानसभा निवडणूकीत रिपब्लीकन पार्टी आफ इंडियाचे उमेदवार गुजर रायकुमार हे 12,325 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते. 9. शिरुर शहरातील एक धडाडीचे व्यक्तीमत्व असलेले व नंतर जगभरात प्रसिद्ध झालेले रसिकलाल धारीवाल हे 1980 च्या शिरुर विधानसभा निवडणूकीत कांग्रेसचे उमेदवार असुनही मतदारांनी त्यांना नाकारले होते. 8.शामकांत वर्पे हे सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार देखील शिरुर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी निवडून दिले होते.ते 1967 चे साल होते. त्याकाळी समाजवादी, आंबेडकरवादी पक्ष हे समुख विरोधी पक्ष होते.ते विचारांच्या आधारावर असत.आजचे बरेच पक्ष अगदी बहुजन समाज पक्षदेखील त्यावेळी अस्तित्त्वात नव्हता. विधानसभा निवडणूकीत देखील होत्याचे नव्हते असे होवू शकते. नव्हत्याचे होते असे देखील होवू शकते. भारतीय जनता पक्षाप्रमाणे ! 7. शिरुर विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार रावसाहेब पवार हे त्यावेळच्या राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे होते.तर आजचे त्यांचे पुत्र आमदार अशोक पवार हे राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. 6.1978 ची ऐतिहासीक व बहुचर्चित विधानसभा निवडणूक जनता पक्षाने जिंकली होती.जनता पक्ष हा त्याकाळी इंदिरा गांधी, संजय गांधी व आणिबाणी नंतर अवतीर्ण झाला होता. इंदिरा गांधी यांच्या विरोधकातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत हा पक्ष सत्तेवरही आला.आज हा पक्ष अस्तित्त्वात ही नाही. 1978 च्या विधानसभा निवडणूकित जनता पक्षाचे बाबुराव दौंडकर हे आमदार झाले होते. 5. शिरुर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व धनगर समाजाला बर्यापैकी मिळाले आहे. धनगर समाजाचे श्री.पोपटराव गावडे दोनदा, पोपटराव कोकरे इ.आमदार झाले आहेत.
स्व.बाबुराव पाचर्णे, संघर्षातून आमदारपदी !
4. शिरुर शहरात आज उभे राहिलेले बाबुरावनगर हे ज्यांच्या नावाने उभे राहिले आहे.ते स्व.बाबुराव पाचर्णे पहिल्यांदा आमदारकीसाठी उभे राहिले होते.तेव्हा ते अपक्ष म्हणून उभे होते. तेव्हा ते आमदार झाले तेव्हा ते भारतीय जनता पार्टीकडून आमदार झाले ! 3. पहिल्या शिरुर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दुसर्या क्रमांकाचे उमेदवार रिपब्लीकन पार्टी आफ इंडियाचे उमेदवार होते.आजचे शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, भारतीय जनता पक्ष हे त्यावेळी जन्माला सुद्धा आले नव्हते. 2. शिरुर शहरातील दिवंगत उद्योजक रसिकलाल धारीवाल यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. 1. शिरुर विधानसभा मतदार संघासाठी पहिली निवडणुक 1962 साली झाली. त्यावेळी भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे श्री.रावसाहेब पवार हे पहिले आमदार ठरले होते.आज विद्यमान आमदार अशोक पवार हे श्री.रावसाहेब पवार यांचे पुत्र आहेत. ते 14 वे आमदार आहेत.
एकंदरीत अल्प असा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.तसे निवृत्तीअण्णा गवारी, मंगलदास बांदल,जयश्रीताई पलांडे,बाळासाहेब खैरे,इ.शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील काही आला ठसा उमकवलेले राजकारणी देखील शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात आहेत.
शिरुर विधानसभा मतदार संघ आणि इतर पक्षात….
वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष,बहुजन मुक्ती पक्ष,राष्ट्रीय समाज पक्ष ,डावे,समाजवादी, संभाजी ब्रिगेड इ.पक्ष संघटनांनी देखील शिरुर हवेली मतदार संघात निवडणुका लढवल्या आहेत. अगदी स्टॅम्प पेपरवर वचन या विधानसभा मतदार संघात दिले गेले आहे.पण ते काही लोकांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाले नाहीत.त्याला ते कारण नाहीत.इथला मतदार लोकशाहीसाठी अजुन तयार झालेला नाही, हे आहे.निवडणुक जिंकण्यासाठी मनी,मिडीया आणि माफिया यांची आवश्यकता असते,असे सांगितले जाते.उद्योग जगत यांना फंडिंग करत नाही. त्यामुळे ते मनी,मिडीया व मसल पॉवर मिळवू शकलेले नाहीत. त्यामुळे ते हरतात.पण तेच लढाऊ आहेत.हे समजायला मतदार कमी पडतात.अमिषाला बळी पडतात.जात,धर्म,गरीब, श्रिमंत अशा पुर्वग्रह दुषित मनाने पाहतात.म्हणून यांना यश मिळवणे अवघड आहे. आगामी निवडणुकीत सुद्धा तेच घडणार आहे.
आम आदमी पार्टीचा तालुक्यात प्रवेश झाला आहे. अनिल डांगे हे एक धडाडीचे व्यक्तीमत्व ‘आम आदमी पक्षा’त आहे.आम आदमी पार्टी व इंडिया आघाडी यांच्यातील चर्चेनंतर ठरवू ! पण आमची तयारी आहे, असे ते सांगतात.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com