
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Tractor Chori : शिरुर तालुक्यात 2लाख किंमतीचा ट्रॅक्टर चोरीला !
Tractor Chori : शिरुर तालुक्यातील एका डॉक्टरचा ट्रॅक्टर चोरीला !
Shirur 2 March 2025 :
( Satyashodhak News Report )
Tractor Chori च्या घटनेत शिरुर तालुक्यात 2 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर चोरीला गेला आहे.शिरुर तालुक्यातील न्हावरे या गावात एका डॉक्टरचा ट्रॅक्टर चोरीला जाण्याची ही घटना घडली आहे. शिरुर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरटया विरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा…
Moter Cycle Cहेhori मोटर सायकल चोरी ची घटना ! 15,000 रुपयांची मोटर सायकल !
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार घटना अशी आहे. दिनांक 28/02/2025 रोजी रात्री 00:10 ते 00:30 वाजण्याच्या दरम्याण न्हावरे, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे गावाच्या हद्दीत फिर्यादी फिर्यादी निलेश प्रकाश कोळेकर, वय – 40 वर्षे ,व्यवसाय- डॉक्टर, राहणर- न्हावरे, तालुका-शिरूर ,जिल्हा – पुणे यांच्या घराच्या समोर अंगणामध्ये लावलेला न्यु हॉलेन्ड कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर त्याचा आर. टी.ओ. क्र. एम.एच 12 जी.एन. 8212 असा असणारा होता. त्या ट्रॅक्टरसोबत असलेले काकरपाळीचे औजार किंमत 2,00,000/- रूपये कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरून नेला आहे.
हे ही वाचा. …
फिर्यादी –
निलेश प्रकाश कोळेकर, वय -40 वर्षे ,व्यवसाय- डॉक्टर, राहणर- न्हावरे, तालुका- शिरुर , जिल्हा – पुणे
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर- -146 / 2025 असा आहे. तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हणुन त्यांनी अज्ञात चोरटयाविरूद्ध शिरुर पोलीस स्टेशन मधे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.
दाखल अमंलदार पोलीस हवालदार श्री.भगत हे आहेत.तर पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. जाधव हे करत आहेत.