
Contents
तृप्ती फिल्म प्रोडक्शन चे रामदास राऊत यांचा नवीन चित्रपट ‘यातना’ लवकरच प्रेक्षकांसमोर!
तृप्ती फिल्म प्रोडक्शन व नवीन चित्रपट ‘यातना’!
शिरुर, दिनांक ११ सप्टेंबर २०२५| प्रतिनिधी |
‘मामाच्या गावाला जाऊया’ नंतर तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे दिग्दर्शक-निर्माते रामदास राऊत यांचा नवा चित्रपट ‘यातना’ लवकरच प्रेक्षकांसमोर. समाजातील संघर्ष, भावनिक वेदना आणि वास्तव यांचे दर्शन घडवणारा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

गेल्या काही वर्षांत तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, लावणी, कविता, लोकगीत व समाजप्रबोधनपर कार्यक्रम यशस्वीपणे सादर करणारे दिग्दर्शक, लेखक व निर्माते रामदास राऊत यांचा नवीन चित्रपट ‘यातना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
तृप्ती फिल्म प्रोडक्शनची वाटचाल—
श्री.रामदास राऊत यांनी गेल्या पाच वर्षांत ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’च्या माध्यमातून ग्रामीण समाजजीवन, कौटुंबिक नाती व संस्कृती यांवर आधारित अनेक प्रकल्प सादर केले आहेत.फिल्म्स सादर केल्या.
अलीकडेच त्यांनी ‘मामाच्या गावाला जाऊया’ हा लघुपट प्रेक्षकांसमोर आणला. ग्रामीण निसर्ग, बालपणाच्या आठवणी आणि कौटुंबिक जिव्हाळा यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यापूर्वी त्यांनी लावणी, बतावणी, लोकगीत, हास्याचा धिंगाणा आर्केस्ट्रा यांसारखे प्रकल्प सुद्धा यशस्वीपणे सादर केले आहेत.
२१/०९/२०२१ रोजी ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन ची स्थापना त्यांनी केली. 25 भाग पुर्ण झाल्यावर पुण्यातील हडपसर येथील महात्मा जोतीबा फुले नाट्यगृह,पुणे येथे ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन‘ चा वर्धापनदिन साजरा झाला.यावेळी ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष श्री.मेघराजराजे भोसले हे उपस्थित होते.मा.प्रशांत बोगम,कल्पना जगताप,अमर पुणेकर हे मान्यवरही उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांत तृप्ती फिल्म प्रोडक्शन ने १६० भाग पुर्ण केले. 9 प्रकारचे कलाप्रकार सादर केले. त्यामधे जेष्ठ कलाकार अभिनेते सुनिल गोडबोले,मा.सुनिल शेटे,बालाजी निकाळजे,राजेंद्र ताम्हणे ,अंजली जाखडे या नामवंत अभिनेत्यांनी अभिनय करुन ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’ ला एक उंची प्राप्त करुन दिली.
७ जुन २०२४ रोजी रामदास राऊत यांची राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार च्या सांस्कृतिक कला साहित्य, पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र त्यांना खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.वृद्ध कलावंतांना मानधन मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत.त्यांचे कुटुबीय पत्नी सौ.रंजना,मुलगे कृष्णकांत,रजनीकांत,सुनबाई पायल,काजल,मुलगी तृप्ती, नात व बालकलाकार त्रिशा यांनीही प्रोडक्शन च्या निर्मितींमधे छोट्या,मोठ्या भुमिका केल्या.त्यांना कामात सहकार्य केले.
या निर्मितीत अन्य विशेष व्यक्तींचा सहभागही महत्वाचा आहे.त्यामधे मा.खंडु भुकन,सभापती,पारनेर पंचायत समिती, कवी सिताराम नरके,मा.सुदाम डफळ,सुरेश शिंदे,निवृत्त मुख्याध्यापक, मा.समद पठाण,मा.बबन चाटे,उद्योजक पुणे,मा.शंकरराव गायकवाड,विद्यमान सदस्य,ग्रामपंचायत,शिरूर ग्रामीण, पै.बाळासाहेब पवार, मा.विकास अत्रे, निवृत्त पोलिस अधिकारी, पुणे,सरपंच संतोष आखडे ,आलेगाव पागा ,तंटामुक्ती अध्यक्ष, आशोकराव सोनवणे,निवृत्त बंन्क अधिकारी, बंन्क आफ महाराष्ट्र, संतोष वीर,कानिफनाथ दुध डेअरी,जोशीवाडी, डॉ.संपतराव पार्लेकर,सुवर्णज्योत महिला मंडळ अध्यक्ष चंद्रकला औटी,पारनेर,ग्रामस्थ गुणोरे,म्हसे खुर्द,हिंगणी दुमाला हे आहेत.
नवीन चित्रपट ‘यातना’—
आता त्यांचा नवीन चित्रपट ‘यातना’ प्रदर्शित होणार असून हा चित्रपट समाजातील वास्तव, संघर्ष आणि मानसिक तसेच सामाजिक वेदना यांचे चित्रण करणारा ठरणार आहे.या चित्रपटात प्रमुख भुमिका लेखक कोंडीराम आवळे मास्तर हे करत आहेत. या चित्रपटाच्या कथानकाबद्दल निर्मात्यांनी अद्याप सर्व तपशील जाहीर केले नसले तरी, मानवी भावभावना, संघर्ष आणि सामाजिक सत्य यांना भिडणारा आशय यात मांडला जाईल, अशी माहिती मिळते.
प्रेक्षकांची उत्सुकता वाढली—
‘मामाच्या गावाला जाऊया’ नंतर राऊत सरांचा नवा चित्रपट कोणत्या धाटणीचा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. त्यांच्या प्रोडक्शनचे चित्रपट नेहमीच समाजप्रबोधन आणि मनोरंजन यांचा समतोल राखणारे ठरले असल्याने ‘यातना’ चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••
Trupti Film Production YouTube Channel
Marathi Short Films – Film Companion
Maharashtra Gramin Culture – Official Portal
‘सत्यशोधक’ च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन••••
‘व्हिजन इंटरनॅशनल स्कूल’मध्ये पर्यावरणपूरक तुरटी गणपतीची प्रतिष्ठापना – एक स्तुत्य उपक्रम !