‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’चे रामदासजी राऊत यांच्या द्वितीय पुत्राचा थाटामाटात विवाह सोहळा आनंदी येथे संपन्न !
‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’चे रामदासजी राऊत विचारांप्रमाणे कृती करुन दिला संदेश !
दिनांक १३ ऑगस्ट २०२५ | प्रतिनिधी|
आळंदी येथे तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते-दिग्दर्शक रामदासजी राऊत यांच्या द्वितीय पुत्र रजनीकांत राऊत यांचा पारंपरिक थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगला.
तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते, दिग्दर्शक व लेखक मा. रामदासजी राऊत (शिरूर) यांच्या द्वितीय चिरंजीव रजनीकांत राऊत (शिरूर) यांचा, सौ. का. काजल यांच्याशी शुभविवाह सोहळा आळंदी ,ता.राजगुरुनगर ,जि.पुणे येथे मंगळवार, दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी येथील आराधना हॉलमध्ये अतिशय उत्साहपूर्ण व पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.
मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा रंगला—-
विवाह सोहळ्यात उपस्थिती मान्यवर.
या शुभविवाहप्रसंगी राऊत परिवार व जाधव परिवारातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांमध्ये:
• मा. खंडू भूकन साहेब – पंचायत समिती सभापती, पारनेर
• पुणे-पिंपरी येथून मा. राजेश जगताप, मा. किरण जगताप, मा. प्रदीपजी जगताप व परिवार
• म्हसे खुर्द येथील विकास सोसायटी चेअरमन मान. संभाजी मदगे, मा. अनिल मदगे, ग्रामपंचायत सदस्य मा. हनुमान जगताप
• मान. एकनाथ ताठे – मुंबई बेस्ट अधिकारी
• मा. शंकरजी शिरसागर – पोलीस अधिकारी, लोणीकंद पोलीस स्टेशन
• अशोक शिंदे – वारकरी दिंडी अध्यक्ष, टाकळी हाजी
• अर्जुनजी शिंदे – शिरूर तालुका नाभिक संघ अध्यक्ष
• गुणवरे येथून सर्व राऊत परिवार
श्री.बबन राउत, अभिनेते,लेखक,दिग्दर्शक, शिरुर.
दिनांक 12,8,2025 रोजी माझ्या मुलाचा शुभविवाह संपन्न झाला अगदी मोजक्या लोकांमध्ये हा शुभविवाह पार पडला माझ्या तृप्तीची प्रोडक्शन मधील बरेचसे आर्टिस्ट कलाकार टेक्निकल टीम या सर्वांना बोलावण्याची इच्छा होती परंतु लग्न छोट्या पद्धतीने असल्याने त्यांना मी बोलू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तसेच इतरही राजकीय सामाजिक क्षेत्रातील व आमच्या नात्यातील याही मंडळी यांना मनापासून बोलवण्याची इच्छा होती परंतु लग्न छोट्या खाणी करण्याचे आयोजन केल्यामुळे मी बोलू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो
सांस्कृतिक संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी——
मान. खंडू भूकन साहेबांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले की, “तृप्ती फिल्म प्रोडक्शन” ने यापूर्वी आपल्या चित्रपटांद्वारे सामाजिक संदेश दिला आहे – ‘लग्न छोट्या खाणी करणे ही काळाची गरज आहे’. आज राऊत सरांनी स्वतःच्या मुलाच्या विवाहात हाच संदेश प्रत्यक्षात आणून एक आदर्श निर्माण केला आहे. यासाठी त्यांच्या संपूर्ण परिवाराचे कौतुक केले पाहिजे.”
उपस्थित मान्यवरांचे शुभाशिर्वाद—-
कार्यक्रमात मान. संभाजी मदगे साहेब (चेअरमन, विकास सोसायटी, म्हसे खुर्द) यांनीही नवदाम्पत्यास आशीर्वाद दिले.
समारंभाचे सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक मा. सुरेश शिंदे सर यांनी सुयोग्यरीत्या केले.
राऊत परिवाराच्या वतीने मान. उद्योजक शंकर राऊत यांनी सर्वांचे सहर्ष स्वागत केले व उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले.
विवाहसोहळ्याची वैशिष्ट्ये—-
• साध्यापणाने पारंपरिक विधींचे पालन.
• मराठी संस्कृती व वारसा जपणारे वातावरण
• नातेसंबंधांमध्ये जवळीक निर्माण करणारी साधेपणा व आत्मीयता
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com