
Contents
‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’ च्या ‘मामाच्या गावाला जाऊया’ व ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ लघुपटांच्या शूटिंगला गणेशपूजनाने प्रारंभ!
‘मामाच्या गावाला जाऊया’ व ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ द्वारे ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’ काय संदेश देणार ?
दिनांक १७ ऑगस्ट २०२५ |प्रतिनीधी |
‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’ निर्मित ‘मामाच्या गावाला जाऊया’ व ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ या लघुपटांच्या शूटिंगला गणेशपूजनाने प्रारंभ. गुणवरे ग्रामस्थांकडून दिग्दर्शक रामदास राऊत सरांचा सन्मान.”
‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन‘ व दिग्दर्शक श्री.रामदास बबन राऊत हे नाव आता महाराष्ट्राला पुर्ण परिचित झाले आहे.श्री.रामदास बबन राऊत सरांनी सातत्याने सामाजिक संदेश देणारे लघुपट, यु ट्युब मालिका यांमधे स्वतःच्या अभिनयाची व दिग्दर्शनाचीही उंची सतत वाढवली आहे.शिरुर,पारनेर व श्रीगोंदा या शिरुर शहरालगतच्या तालुक्यातील अनेक स्थानिक सुप्त अभिनयाचे गुण असलेल्या उच्चशिक्षित मान्यवरांना देखील अमिनयाची संधी दिली.त्याचे दर्शन या भागातील अबालवृद्धांना त्यांनी घडवले आहे.या कलाकारांना आत्मिक समाधान मिळाले.
दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’ निर्मित “मामाच्या गावाला जाऊया” व “मोबाईलचे दुष्परिणाम” या दोन लघुपटांचे शूटिंग ‘गणेश पूजन’ व ‘कॅमेरा पूजन’ करून पार पडले आहे.त्याचा प्रारंभ झाला आहे. या शुभमुहूर्तानंतर दिवसभर उत्साहात चित्रिकरण पार पडले.
या कार्यक्रमात निर्माते-दिग्दर्शक-लेखक श्री.रामदास बबन राऊत सर यांच्या जन्मभूमी असलेल्या पारनेर तालुक्यातील गुणवरे गावातून आलेल्या ग्रामस्थांनी त्यांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय खंडू भुकन (सभापती, पंचायत समिती पारनेर) यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी राऊत सरांच्या कार्याचा मागोवा घेतला.गौरव केला.
ते म्हणाले –
“२०११ मध्ये रामदास राऊत सरांनी भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती. आज त्याला १४ वर्षे झाली तरी गावाशी त्यांची नाळ कायम टिकून आहे.”
ग्रामस्थ व मान्यवरांची उपस्थिती—

या छोटेखानी सन्मान सोहळ्यास गुणवरे येथील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये –
• मान. अण्णासाहेब बढे (माजी संचालक, कृषी बाजार समिती पारनेर)
• श्री. मच्छिंद्र गोपाळे (सदस्य, विकास सोसायटी गुणवरे)
• उद्योजक शंकरजी राऊत (अहमदनगर)
• मान. कचर बोचरे
• मान. रामदास विरोळे
• मान. बबन दादा भाऊबडे
• मान. प्रभाकर पठारे (सामाजिक कार्यकर्ते, जवळा)
• सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकलाताई आवटी (पारनेर)
‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’चे सहयोगी कलाकार, तांत्रिक टीम व स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
विशेष उपस्थिती—
हार्दे हॉस्पिटलच्या डॉ. मिस हारदे यांनी या लघुपटात छोटी भूमिका साकारली. त्यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याने ग्रामस्थ, मान्यवर व चित्रपटसृष्टीतील कलाकार यांना एकत्र आणत एक वेगळा आदर्श उभा केला.
अधिक माहिती वाचा खालील लिंकवर क्लिक करून •••
मराठी चित्रपटसृष्टी – अधिकृत संकेतस्थळ
Divya Marathi – चित्रपट बातम्या
‘शिरुर न्युज’ च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून •••
१५ ऑगस्ट २०२५ : स्वातंत्र्यदिन, इतिहासापासून उद्याच्या भारतापर्यंत !