
Contents
शिरुर तालुक्यात अपघातात 32 वर्षीय तरुण मृत्युमुखी ?
शिरुर तालुक्यातील उरळगावजवळ घडला अपघात !
शिरुर ,दिनांक- 12 डिसेंबर: (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरुर तालुक्यात अपघातात 32 वर्षीय तरुण मृत्युमुखी पडला आहे. शिरुर तालुक्यातील उरळगावजवळ हा अपघात घडला आहे.पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानुसार हकीकत अशी की तारिख 11/12/2024 रोजी सकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास उरळगाव येथील तळेगाव ढमढेरे ते न्हावरा रोडवर जिओ पेट्रोल पंपाचे समोर रोडवर फिर्यादी प्रमोद गोरक्ष राजगुरव, वय- २६ वर्षे,व्यवसाय- नौकरी,राहणार- निर्वी,तालुका-शिरूर, जिल्हा – पुणे यांचा चुलतभाउ विशाल राजगुरव हा न्हावरे बाजुकडुन तळेगाव ढमढेरे बाजुकडे त्यांच्या मोटारसायकल क्र. एम. एच. 12 एक्स. एल. 9207 वरून सणसवाडी येथे कामास जात असताना समोरून येणोरी फोरव्हीलर महेन्द्रा टीण्यु व्ही 300 गाडी नंबर,एम. एच.- 12 आर. आर. 1799 यावरील चालक दिनकर शंकर देवकर,वय- 54,राहणार- माउडी सुपे,तालुका- पुरंदर, जिल्हा – पुणे याने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे हयगयीने अविचाराने रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन फिर्यादीचे चुलतभाउ विशाल बाळासाहेब राजगुरव, वय -32 वर्ष, राहणार-निर्वी,तालुका- शिरूर जि. पुणे यांच्या मोटासायकलला समोरूण धडक देवुन त्याच्या मृत्युस कारणीभुत झाला.’शिरुर‘
त्यामधे मोटारसायकलच्या तसेच स्व:ताच्या गाडीच्याही नुकसानीस कारणीभुत झाला आहे. म्हणुन फिर्यादी यांनी त्याच्या विरूद्ध शिरुर पोलिस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
गुन्ह्यातील वाहने पुढीलप्रमाणे —
१) मो.सा. नं- एम. एच. १२ एक्स.एल. ९२०७
२) फोर व्हीलर महिंद्रा गाडी नंबर :-एम. एच. १२ आर. आर. -१७९९
आरोपीवर कलम ९८८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम -१०६ (१),३२४ (४), १२५ (अ) (ब),२८१, सह मोटार वहन कायदा कलम -१८४,१३४/१७७ प्रमाणे शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार जाधव करत आहेत. तर दाखल अंमलदार पोलिस हवादार उबाळे हे आहेत. शिरुर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.