
Contents
- 1 ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
- 1.1 ऊस तोडणी कामगार व शेतकरी नेहमीच मुकादमाच्या मिळवणुकीचे बळी ठरतात ! असे का ?
- 1.1.1 शिरुर,दिनांक- 16 जानेवारी ; (सत्यशोधक न्यूज रिपोर्ट)
- 1.1.2 ‘मुकादम’ कोण असतो ?
- 1.1.3 10 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक !
- 1.1.4 शिरुर पोलिसांचे शोध पथक होते कार्यरत !
- 1.1.5 गुप्त बातमीदाराकडुन मिळाली ,’टिप’ !
- 1.1.6 शिरुर पोलिसांच्या पथकाने रचला सापळा !
- 1.1.7 कारवाई वरिष्ट पोलिस अधिकार्यांच्या निगरानीखाली !
- 1.1.8 About The Author
- 1.1 ऊस तोडणी कामगार व शेतकरी नेहमीच मुकादमाच्या मिळवणुकीचे बळी ठरतात ! असे का ?
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
ऊस तोडणी कामगार व शेतकरी नेहमीच मुकादमाच्या मिळवणुकीचे बळी ठरतात ! असे का ?
शिरुर,दिनांक- 16 जानेवारी ; (सत्यशोधक न्यूज रिपोर्ट)

ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा. आणि ऊस तोडणी कामगार व शेतकरी नेहमीच ‘मुकादमा’ च्या मिळवणुकीचे बळी ठरतात ! असे का घडते ? असा एक सामाजिक प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो. त्याची उकल पण समाजाने केली पाहिजे. दरम्यान शिरूर पोलिसांनी या घटनेतील मुकादमास अटक केलेली आहे. आणि पुढील तपास शिरुर पोलीस हे करत आहेत.
‘मुकादम’ कोण असतो ?
मुकादम हा साधारणपणे मजुराचा पुरवठा,देखरेख व व्यवस्थापन करणारा शेतकरी व ऊस तोडणी कामगार यांच्यामधील मध्यस्थ असतो.तो जबाबदार घटक असतो.तो गरजु मजुर व गरजु शेतकरी यांच्यामधील पैशाची देवाणघेवाणीचेही महत्वाचे काम करतो. त्याबद्दल तो ‘कमिशन’ घेतो.तो मजुर त्याच्या जबाबदारीवर व त्याने मजुरांची मजुरी ठरवण्याचे त्याचे काम असते.शेतकरी आणि मजुर दोघांनाही या मुकादमावर विश्वास ठेवावा लागतो.पण त्यात फसवणूक करण्याची प्रवृत्ती असणारे,किंवा मी मुकादम आहे.माझ्याकडे एवढे कामगार/मजुर आहेत.आणि या दराने मी ते देतो.असे आश्वासन किंवा शब्द तो शेतकऱ्यांना देतो.असे सांगुन शेतकऱ्यांच्याकडुन पैसे घेऊन पसार होणारे काही लबाड लोक यात सामिल होऊन फसवणूक करण्याचे प्रकार नेहमी समोर येत असतात. तसाच हा एक प्रकार आहे.
Read more >>
10 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक !

ऊस तोडीसाठी मजुरांच्या टोळीच्या नावाखाली 10 लाख 95 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुकादमास शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 408/ 2024, भारतीय न्याय संहिता कायदा कलम 318 3(5) मधील फिर्यादी श्री . बबन बाळासाहेब कोळपे, वय -38 वर्ष, व्यवसाय -शेती, राहणार- मांडवगण फराटा, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे यांनी फिर्याद दिली होती.
ती अशी की दिनांक 4/6/2023 ते1/10/2024 या कालावधीच्या दरम्यान आरोपी
1) चंद्र ताराचंद राठोड,
2) ताराचंद जयराम राठोड,व
3) मुकादम अनिल ताराचंद राठोड ,
सर्व राहणार- पिंपळखेड ,गोरखपुर तांडा, तालुका- चाळीसगाव ,जिल्हा- जळगाव यांनी मिळुन यातील फिर्यादीस ‘ऊसतोडीसाठी मजुरांची टोळी देतो’ म्हणून सांगून वेळोवेळी 10 लाख 95 हजार रुपये फिर्यादी यांच्याकडून घेऊन फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम यांच्याकडे देण्यात आला होता.
शिरुर पोलिसांचे शोध पथक होते कार्यरत !
सदर गुन्ह्ण्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीची गंभीरता लक्षात घेऊन माननीय संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांनी तपास पथकाला आदेशित केले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी आदेशित केलेले होते.
Read more >>
गंठण हिसकावून नेले : तिघे चोरटे फरार !
गुप्त बातमीदाराकडुन मिळाली ,’टिप’ !
त्या अनुषंगाने तपास पथकाचे पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप ,पोलीस अंमलदार विनोद काळे , नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे,नीरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील हे या पथकातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितेश थोरात यांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील मुकादम अनिल ताराचंद राठोड हा शिरूर येथील कुकडी कॉलनी येथे येणार आहे .
शिरुर पोलिसांच्या पथकाने रचला सापळा !
माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी सापळा लावून सीताफिने मुकादम अजित ताराचंद राठोड यास ताब्यात घेण्यात आले आहे. आणि पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे.
कारवाई वरिष्ट पोलिस अधिकार्यांच्या निगरानीखाली !
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक अधीक्षक श्री.पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री.रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस सब इन्स्पेक्टर शुभम चव्हाण ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीरज पिसाळ, निखिल रावडे ,अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने ही कामगिरी पार पाडलेली आहे.