‘विद्याधाम प्रशाला,शिरुर’ ला ‘आंतरशालेय नाट्यछटा’ स्पर्धेत सांघिक नैपुण्यपदक !
'विद्याधाम प्रशाला,शिरुर' ला 'आंतरशालेय नाट्यछटा' स्पर्धेत सांघिक नैपुण्यपदक मिळाले आहे. तसेच 'विद्याधाम प्रशाला,शिरुर' मधील तन्वी साके, समिक्षा स्वामी व समृध्दी कारखिले या विद्यार्थीनींची प्रथम क्रमांकासह जिल्हास्तरावर निवड झाली आहे. त्यामुळे या मुलींचे, स्पर्धकांचे, त्यांच्या मार्गदर्शकांचे आणि विद्याधाम प्रशालेचे शिरुर व शिरुर परिसरात कौतुक केले जात आहे. 'विद्याधाम प्रशाला,शिरुर' हे महाराष्ट्रातील एक नामवंत विद्यालय मानले जाते.आपल्या लौकीकाला साजेसे असे हे यश 'आंतरशालेय नाट्यछटा' स्पर्धेत या विद्यार्थीनींनी मिळवले आहे.
‘विद्याधाम प्रशाला,शिरुर’ ला ‘आंतरशालेय नाट्यछटा’ स्पर्धेत सांघिक नैपुण्यपदक मिळाले आहे. तसेच ‘विद्याधाम प्रशाला,शिरुर’ मधील तन्वी साके, समिक्षा स्वामी व समृध्दी कारखिले या विद्यार्थीनींची प्रथम क्रमांकासह जिल्हास्तरावर निवड झाली आहे. त्यामुळे या मुलींचे, स्पर्धकांचे, त्यांच्या मार्गदर्शकांचे आणि विद्याधाम प्रशालेचे शिरुर व शिरुर परिसरात कौतुक केले जात आहे. ‘विद्याधाम प्रशाला,शिरुर’ हे महाराष्ट्रातील एक नामवंत विद्यालय मानले जाते.आपल्या लौकीकाला साजेसे असे हे यश ‘आंतरशालेय नाट्यछटा’ स्पर्धेत या विद्यार्थीनींनी मिळवले आहे.’विद्याधाम प्रशाला’
‘विद्याधाम प्रशाला,शिरुर’ला सांघिक नैपुण्यपदक …..
‘बालरंगभूमी परिषद, पुणे’ व ‘निळू फुले नाट्य कला अकादमी आयोजित ‘ ‘नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती’ आंतरशालेय तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धेत शिरुर येथील विद्याधाम प्रशालेने सर्वाधिक गुणांसह प्रथम क्रमांकाचे सांघिक नैपुण्यपदक प्राप्त केले.
स्पर्धा ‘ज्ञानगंगा हायस्कूल’,शिरुर मधे पार पडली….
शिरुर येथील ‘ज्ञानगंगा हायस्कूल’ मध्ये तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकुण 134 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा एकूण चार गटात घेण्यात आल्या. स्पर्धेत प्रशालेच्या सर्वाधिक ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सर्वाधिक सहभागी विद्यार्थ्यांची नोंद केली.’विद्याधाम प्रशाला,शिरुर’ मधील
स्पर्धक विद्यार्थीनी तन्वी साके, समिक्षा स्वामी व समृध्दी कारखिले या तीन विद्यार्थ्यांची प्रथम क्रमांकासह जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा पुणेकर यांच्या हस्ते पार पडला.
‘बालरंगभूमी परिषद, पुणे’ व ‘निळू फुले नाट्य कला अकादमी आयोजित ‘ ‘नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती’ आंतरशालेय तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धेचा….
तन्वी साके व समिक्षा स्वामी, उत्तेजनार्थ – आर्या नलगे, दुर्वा दाभाडे व स्वराज मांढरे.
८ वी,९ वी गट- प्रथम क्रमांक – समृध्दी कारखिले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्याधाम प्रशाला,शिरुर मधील सौ.सारिका वेताळ,सौ.छाया वेताळ, सौ.वैशाली ढवळे,सौ.कल्पना फराटे व सौ.वैशाली वाघमारे या अध्यापिकांनी मार्गदर्शन केले.
शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाकडून अभिनंदन. ….
‘विद्याधाम प्रशाला शिरुर’ ही शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ, शिरुर या संस्थेची एक प्रमुख व सुरुवातीची शाखा आहे. या संस्थेच्या शिरुर,शिक्रापुर,विद्याधाम प्रशाला देवदैठण,मंगलमुर्ती विद्याधाम शाळा,रांजणगाव वगैरे ठिकाणी शाखा आहेत.शिरुर शहरातील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरुर हे आर्टस,कामर्स व सायन्सचे प्रसिद्ध काॅलेज आहे.हे प्रामुख्याने शिरुर तालुक्यात शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शाखा आहेत.
Dr.Nitin Pawar,Editor,Shirur.
‘संपादकिय टच”
“शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना 1952 साली झाली. शिरुर शहरातील ही अभिजनांची संस्था/शाळा विद्याधाम प्रशाला आहे,असे मानले जाते. पण आज समाजातील सर्व जाती धर्माचे विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. शिरुर शहरामधे मग रयत शिक्षण संस्था या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रचंड मोठ्या संस्थेची शाळा आहे.ती साधारणपणे बहुजन समाजाची शाळा मानली गेली.शहरातील बहुजन समाजातील मुले या न्यु इंग्लिश स्कूल, शिरुर मधे मोठ्या प्रमाणात शिकत आहेत.
अशी पार्श्वभूमी असलेल्या शिरुर शहरातील शिक्षण क्षेत्रातील ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या वर्गांतील विद्यार्थींच्या शिक्षणाचे एक चित्र आहे.हे चांगले नसले तरी ते वास्तव आहे. पुढे मध्यम वर्गीय पालक या संस्थेच्या ‘विद्याधाम प्रशाला,शिरुर’ काही प्रमाणात दिसू लागले. या बहुजन वर्गातील विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी यशाची अनेक शिखरे गाठली.महाराष्ट्रातील गुणवत्ता यादीत या शाळेतील बरेच विद्यार्थी आले.अर्थात बहुतेक आज देशाबाहेर जास्त पैसा मिळवण्यासाठी गेले.परत शिरुरमधे ते दिसले नाहीत. ‘गुणवत्ता’ यादीत आतापर्यंत महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आले.त्यांनी पुढे काय केले?यावर पी.एचडी.साठी संशोधन करणे गरजेचे आहे. कारण त्यांना गुणवंत म्हणुन समाजाने मिरवणुका काढुन त्यांना शहरातुन मिरवले.
शिरुर शहर :शहरात स्वागत करणारा हा फलक !
नंतर मोठ्या पदांवर किंवा देशाबाहेर हे गेले.त्यांच्या गुणवत्तेचा फायदा साध्या भोळ्या मराठी समाजाला काय झाला?आज ते कुठे आहेत. का आहेत?कशासाठी आहेत?यावर संशोधन करणे आवश्यक आहे. अशा गुणवंतांनी आपल्या मात्रभुमीची सेवा आणि प्रगती होईल असे काम करणे,हे खर्या गुणवत्तेचे लक्षण मानले पाहिजे.की सिलीकॉन व्हॅलीत मोठ्या रकमेच्या पगारासाठी जाणे,तिकडेच कुठेतरी UK,USA मधे जावुन स्थायिक व्हावे हे गुणवत्तेचे लक्षण मानावे? असा Rich Dad Poor Dad सारखा भलताच प्रश्न एखाद्याने विचारला तर पंचायत होईल.वा ‘गुणवत्तावान माजी विद्यार्थी की ‘ढ’ असणारा माजी विद्यार्थी’ योग्य असा प्रश्न देखील निर्माण होवून एखादे पुस्तक कोणी लिहीले तर नवल वाटु नये.एक बरे झाले Rich Dad व Poor Dad असणारे दोघे वेगवेगळ्या मुलांचे Dad त्या पुस्तकात आहेत.एकाच मुलाचे दोन Dad असते तर पंचायत झाली असती.आणि ‘संभोगातुन समाधीकडे’ हे पुस्तक वाचण्याआधीच आपल्या समाजाने ते नाकारले होते.त्याची टिंगल केली होती. आणि अध्यात्मिक कामवासना आणि विकृत कामवासना यातला फरक आजपर्यंत समजला नाही.आणि त्यामुळे मानवाचे मोठे नुकसान झाले ते झाले नसते. किंवा असे गुणवंत क्लास वन,क्लास टु च्या जागांवर जावुन भ्रष्टाचाराची व्यवस्था पोसणारे आणि त्या व्यवस्थेचे लाभार्थी बनले तर ती गुणवत्तेची कोणती व्याख्या ठरेल?हे ही जरा समाजाने डोळे उघडे ठेवुन पाहिले पाहिजे .”
‘शिरुर‘ मधील या गुणवंत अशा सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक अध्यापकांचे संस्था शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ,शिरुरचे अध्यक्ष श्री.अनिल बोरा, शालेय समिती अध्यक्ष श्री.धरमचंद फुलफगर, संस्थेचे सचिव श्री.नंदकुमार निकम,विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य श्री.गुरुदत्त पाचर्णे ,पर्यवेक्षक मच्छिंद्र बनकर, चंद्रकांत देवीकर, दिगंबर नाईक तसेच पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
डॉ. नितीन पवार हे ‘Satyashodhak Blog’ चे संस्थापक, संपादक आणि वैचारिक लेखक आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या त्यांच्या जीवनप्रवासाने त्यांना समाज, शिक्षण आणि मानवी मानसिकतेचे बारकावे समजून घेण्याची संधी दिली.
ते सामाजिक प्रश्न, जातव्यवस्था, शिक्षण, राजकारण, तत्त्वज्ञान आणि जागतिक घडामोडी यावर सखोल, तर्कशुद्ध आणि निर्भीड लेखन करतात. त्यांच्या लेखनात वैयक्तिक अनुभव, अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि वास्तवाचे थेट प्रतिबिंब दिसते.
“सत्य शोधणे, त्याचे विश्लेषण करणे आणि निर्भीडपणे मांडणे” हे त्यांच्या लेखनाचे मुख्य ध्येय आहे. ते केवळ माहिती देत नाहीत, तर वाचकाला विचार करायला भाग पाडतात.