
Contents
- 1 श्रीराम BCA / BCS महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची विद्यापीठ संघात निवड !
- 1.1 श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानीव,सोलापुर या महादिद्यालयातील आहेत विद्यार्थिनी !
- 1.1.1 शिरुर,दिनांक 23 डिसेंबर : (डाॅ.नितीन पवार,संपादक, यांच्याकडुन)
- 1.1.2 खो खो अस्सल भारतीय खेळ…..
- 1.1.3 खो खो चे विशिष्ट नियम…
- 1.1.4 ‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
- 1.1.5 क्रिकेट ला अवास्तव महत्व सरकार कडुनच…
- 1.1.6 सोलापुर च्या या महादिद्यालयातील मुलींचा एक आदर्श पायंडा…
- 1.1.7 श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन….
- 1.1.8 शिक्षक, प्रशिक्षकांचे काम प्रशंसनीय !
- 1.1.9 About The Author
- 1.1 श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानीव,सोलापुर या महादिद्यालयातील आहेत विद्यार्थिनी !
श्रीराम BCA / BCS महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची विद्यापीठ संघात निवड !
श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानीव,सोलापुर या महादिद्यालयातील आहेत विद्यार्थिनी !
शिरुर,दिनांक 23 डिसेंबर : (डाॅ.नितीन पवार,संपादक, यांच्याकडुन)
श्रीराम BCA / BCS महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची विद्यापीठ संघात निवड झाली आहे.श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानीव या महादिद्यालयातील आहेत विद्यार्थिनी ! ही खो खो ची आंतरविद्यापिठीय स्पर्धा राजस्थानमधे दिनांक 16 ते 19डिसेंबर दरम्यान होत आहे.
खो खो अस्सल भारतीय खेळ…..
खो खो हा एक मैदानी भारतीय पारंपारीक खेळ आहे. कब्बडी प्रमाणे खो खो खेळाचा उल्लेख प्राचीन साहित्यात आढळतो. तसा तो भारतात शैक्षणीक पाततळीवर शाळा,महाविद्यालयाच्या स्तरावर खेळला जातो.पण संपुर्णपणे दक्षिण आशियामधे हा खेळ खेळला जातो. हा खेळ दोन संघांमधे खेळला जातो. प्रत्येक संघात 12 खेळाडु असतात.त्यातील तीन राखीव असतात.तर 9 मैदानात असतात. दोन खांबांच्या मधे गुडघ्यावर एका संघातील खेळाडू बसतात.त्यापेकी एक एका खांबाजवळ उभा राहतो. हा त्याच संघातील असतो.दुसर्या विरोधी संघातील 3 खेळाडु मैदानात उतरतात.त्यांना पहिल्या संघातील खेळाडुंनी पाठलाग करुन स्पर्श करायला असतो.तो केला तर तो खेळाडु बाद होतो.पण हा पाठलाग करताना नियमानुसार गुडघ्यावर बसलेल्या खेळाडुंनी उभे राहुन धावायचे असते.
खो खो चे विशिष्ट नियम…
पण एकदा एक दिशा पकडली तर त्याच दिशेने खेळाडुचा पाठलाग करायचा असतो.दिशा बदलली तर मागे फिरुन रांगेतल्या दुसर्या खेळाडुला खो द्यायचा असतो.मग तो गुडघ्यावर बसलेल्या स्थितीतुन उभा राहतो.एकाच दिशेने विरोधी खेळाडुला स्पर्श करायला धावतो.किंवा तिसर्याला खो देतो.मग तो धावतो.असे खेळाडु बाद करीपर्यंत चालते.एक बाद झाला तर दुसर्या संघातील दुसरा खेळाडु मैदानात येतो.बाद खेळाडुंनुसार गुण मोजले जातात.खेळासाठी पंचही असतात.ते निर्णय घेतात.बाद झाला किंवा दिशा चुकल्यास शिटी वाजवुन खेळाडुला सुचित करतात.त्यांचा निर्णय़ अंतिम मानला जातो.खेळाडुला तो मान्य करावा लागतो.मात्र खो खो चा आॉलिंपीक मधे समावेश केला गेलेला नाही.हे ही खरे आहे.
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog

क्रिकेट ला अवास्तव महत्व सरकार कडुनच…
भारत आणि पाकिस्तान मधे हा खेळ शालेल पातळीवर खेळला जातो.भारताबाहेरील किंवा दक्षिण आशिया बाहेर दक्षिण आफ्रिका व इंग्लड मधे हा खेळ काही प्रमाणात खेळला जातो.मात्र युरोप,अमेरिका,आस्ट्रेलिया, पुर्व आशिया,पश्चिम आशिया इ.भागांत हा खेळ खेळण्यासाठी प्रसार करण्याची आवश्यकता नक्की आहे.क्रिकेट खेळ आधी 8 देश खेळत होते.आता 16 पेक्षा जास्त देशांच्या क्रिकेट टिम आहेत.पश्चिम आशियामधेही क्रिकेटचा प्रसार होत आहे.या खेळातुन व्यायाम,चपळता,प्रसंगावधान,जिद्द,खिलाडुपणा,मैत्रीभाव वाढण्यास मदत होते.हे काही फार समजुन घ्यायला जड नाही.हा खेळ स्री व पुरुष दोघेही खेळु शकतात.तर मुले आणि मुलींमधे प्रदर्शनी सामने होतात तेव्हा अबालवृद्धही तो सामना पहायला गर्दी करताना गावांमधे दिसत असते.
सोलापुर च्या या महादिद्यालयातील मुलींचा एक आदर्श पायंडा…
अशा या पुर्ण भारतीय खेळाचा पुरस्कार इंफोरमेशन टेक्नॉलॉजी सारख्या विज्ञान क्षेत्रातील संस्थेकडुन होतो आहे.ही मोठी प्रशंसनीय बाब आहे. विद्यार्थिनी याबाबबत स्पर्धात्मक अंगाने तयारी करुन खेळतात ही आणखीन प्रशंसनीय बाब आहे.
निराशाजनक बाब ही आहे की सरकार अशा खेळांच्या बाबतीत निष्क्रिय आहे.अमाप पैसा आणि दिखावु व केवळ प्रदर्शनीय,खर्चिक,असलेल्या आय पी एल वगैर बाजारु खेळांमधे रस दाखवणारे आहे.हीचदुर्देवाची बाब आहे.
श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन….
श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,पानीव ,सोलापुर ही सोलापुर येथील नामवंत शिक्षण संस्था आहे. ही संस्था पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापुर ची अफिलिएट संस्था आहे. नैक चे B मानांकन असलेली ही शिक्षण संस्था आहे.
श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानीव,सोलापुर या महादिद्यालयातील कु.ननवरे नम्रता आप्पासो (बी.एस.सी.) (ई सी.एस.) भाग-३) आणि कु.पांडुळे शितल महावीर (बी.एस.सी. (ई सी.एस.) भाग-२) या विद्यार्थिनीची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्थरीय गोविंद गुरु ट्रिबल युनिव्हर्सिटी, बनस्वरा, राजस्थान येथे दि.16 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.‘श्रीराम’
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
शिक्षक, प्रशिक्षकांचे काम प्रशंसनीय !
यासाठी क्रीडा शिक्षक सुखदेव घुले व संतोष वाघमोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील , उपाध्यक्ष करण पाटील ,सचिव ॲड.अभिषेक पाटील, सहसचिव डॉ.समीर पवार व विशेष कार्यकारी अधिकारी भाऊसो वनवे, महाविद्यालयाचे विभागप्रमुख राजेंद्र डावकरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.