
Contents
- 1 Worker’s Exploytation कामगारांचे शोषण : रांजणगाव एम आय डी सी त नित्याचेच !
- 1.1 Worker’s Exploytation कामगारांचे शोषण : कंत्राटदाराने राबवले,डांबुन ठेवले, मारहाण देखील केली!
- 1.2 फिर्यादी –
- 1.3 सुधाकर रामराव माखणे ,वय -39 वर्ष व्यवसाय – मजुरी ,सध्या राहणार – ढोकसांगवी,तालुका -शिरुर ,जिल्हा -पुणे
- 1.4 आरोपी –
- 1.5 1)आनंद दिगंबर वाघळकर 2)सुनील दिगंबर वाघळकर 3) प्रशांत श्रावण साळवे 4) अक्षय काळे
- 1.6 यातील अटक करण्यात आलेले आरोपी –
- 1.7 1)आनंद दिगंबर वाघळकर
2) प्रशांत श्रावण साळवे
- 1.7.1 Worker’s Exploitation : रांजणगाव एम आय डी सी त कंत्राटदार, खाणावळीवाला व सुपरवायझर !
- 1.7.2 Worker’s Exploitation: आरोपींवर इतर कलमांसह वेठबिगार कायदा देखील लावला !
- 1.7.3 Worker’s Exploitation: कामगारांना मारहाणीचा गुन्हा रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन मधे दाखल!
- 1.7.4 Worker’s Exploitation कामगार मारहाण प्रकरणातील दोन आरोपींना अटक !
- 1.7.5 About The Author
Worker’s Exploytation कामगारांचे शोषण : रांजणगाव एम आय डी सी त नित्याचेच !
Worker’s Exploytation
कामगारांचे शोषण : कंत्राटदाराने राबवले,डांबुन ठेवले, मारहाण देखील केली!
शिरुर,दिनांक 2 फेब्रुवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
(Thanks to pixabay.com for Images in this content )

Worker’s Exploytation
कामगारांचे शोषण ही रांजणगाव एम आय डी सी त नित्याचेच आहे.आता कंत्राटदाराने कामगारांना राबवले,डांबुन ठेवले,दवाखान्यासाठी सुद्धा पैसे न देता केली मारहाण केली आहे. त्याबाबत रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये कंत्राटदारासह खाणावळीवाला व एका सुपरवायझर अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रे Industrial Area मुळे विकास होतो.असे गळा काढुन काढुन राजकारणी ओरडत असतात.पण विकास कुणाचा होतो? कसा होतो ? हे कोणी सांगत नाही.भारतात जास्त स्वस्तात मजुर मिळतो.म्हणुन बहुराष्ट्रीय कंपन्या येतात.नफेखोरी करतात.प्रचंड पैसा कमवुन नेतात.
Read more >>
रांजणगाव एम आय डी सी त मोठा बेकायदा गुटका साठा पोलिसांना सापडला !
Worker’s Exploitation कामारांचे शोषण : कंत्राटदार व माफिया मिळुन करतात !

फिर्यादी –
सुधाकर रामराव माखणे ,वय -39 वर्ष व्यवसाय – मजुरी ,सध्या राहणार – ढोकसांगवी,तालुका -शिरुर ,जिल्हा -पुणे
त्यांच्याच खांद्यांला खांदा लावुन स्थानिक कंत्राटदार व माफिया मिळुन कामगारांचे शोषण Workers Exploitation करतात.हे सर्वत्रच लागू होते. म्हणुन औद्योगीक क्षेत्रे अशा शोषणांची केंद्रे बनतात.स्थानिक कामगार घेतले जात नाहीत.कारण ते ,’आवाज'(?) करतात ! म्हणुन परराज्यातून येणारे गरीब कामगार ,’सहन'(?) करतात.मिळेल ती मजुरी घेऊन राब राब राबतात.असे हे चित्र असते.
आरोपी –
1)आनंद दिगंबर वाघळकर
2)सुनील दिगंबर वाघळकर
3) प्रशांत श्रावण साळवे
4) अक्षय काळेयातील अटक करण्यात आलेले आरोपी –
1)आनंद दिगंबर वाघळकर
2) प्रशांत श्रावण साळवे
वरुल घटनेत दिनांक 25/1/2025 रोजी पूर्वी तसेच रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास ते दिनांक 01/02/2025 रोजी 07.00 वाजण्याच्या सुमारास दरम्यान वेळोवेळी ढोक सांगवी, तालुका- शिरूर ,जिल्हा -पुणे येथील एस के एच कंपनी समोर वरील घटना घडली आहे.
Read more >>
Worker’s Exploitation : रांजणगाव एम आय डी सी त कंत्राटदार, खाणावळीवाला व सुपरवायझर !
श्री. अभंग यांच्या रूममध्ये फिर्यादी सुधाकर माखणे हे कामगार रहात आहेत. तसेच फिर्यादी सोबत इतर कामगार सुद्धा रहात आहेत. कॉन्ट्रॅक्टर आनंद दिगंबर वाघळकर व सुनील दिगंबर वाघळकर,जेवण देणारे प्रशांत श्रावण साळवे व सुपरवायझर अक्षय काळे यांनी कंपनीमध्ये काम करण्यासाठी हे कामगार आले.तेव्हा त्यांना डांबून ठेवले. धमकावून वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करण्यास भाग पाडले .तसेच केलेल्या कामाचे पैसे दिले नाहीत. कॉन्ट्रॅक्टर सुनील वाघळकर व सुपरवायझर अक्षय काळे यांना दवाखान्यात जाण्यासाठी कामगारांनी पैसे मागितले .पण त्यांनी फायबरच्या पाईपने पाठीत कामगाराला कमरेवर मारहाण केली. आप खुशीने साधी दुखापत केली आहे. तसेच इतर कामगार यांना देखील वेळोवेळी मारहाण केली आहे. वगैरे मजकूरची फिर्यादी फिर्यादी ने रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.
Worker’s Exploitation: आरोपींवर इतर कलमांसह वेठबिगार कायदा देखील लावला !

आरोपींवर बाबत गुन्हारजिस्टर नंबर -38/2025 असा आहे. तर आरोपींवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 126(2),127(2)(3)(4),118(1),115(2),351(2)(3)3,(5),352 तसेच वेठबिगार कायदा कलम 4,16 प्रमाणे रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
Worker’s Exploitation: कामगारांना मारहाणीचा गुन्हा रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन मधे दाखल!

रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन मधील स्टाफमधील दाखल पोलीस हवालदार श्री. संदीप जगदाळे हे आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. अविनाश थोरात हे करत आहेत.
Worker’s Exploitation कामगार मारहाण प्रकरणातील दोन आरोपींना अटक !
दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी आनंद वाघाळकर व प्रशांत साळवे यांना अटक करण्यात आली आहे. आज रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 5/2/2025 पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे इतर आरोपींचा शोध सुरू आहे.अशी बातमी आहे.
Read more >>
रांजणगाव पोलिस : आज मोठी सफलता मिळविण्यात सफल झाले आहेत,कसे ते वाचा…
ही माहिती श्री.महादेव वाघमोडे , पोलीस निरीक्षक ,रांजणगाव पोलीस ठाणे यांनी दिली आहे.हे हिमनगाचे फक्त वरुन दिसणारे टोक आहे.’पाण्याखालील ‘ भाग शोधणे हे रांजणगाव एम आय डी सी पोलिसांचे आहे.हा विषय तितका साधा व सोपा नाही. हा कामगारांचे शोषण Worker’ s Exploitation हा जगव्यापी Phenomena आहे.त्यावर जगभर चिंतन झालेले आहे. गंभीर संघर्ष झाले आहेत.क्रांत्या झालेल्या आहेत.त्यानंतर कामगार हिताचे अनेक कायदे अनेक देशांमधे झालेले आहेत. पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. हे खरे आहे.कारण सत्तेवर भांडवलदार,सरंजामदार,माफिया आणि तथाकथित धर्मसंस्था यांचा प्रभाव व पकड अजुन आहे.