Shirur Crime : तांब्याच्या तारांसह 2 चोरट्या इसमाना ताब्यात घेण्यात शिरूर पोलिसांना यश मिळाले आहे.शिरुर पोलीस स्टेशन मधे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शिरुर मधील सिद्धार्थ नगर परिसरात घडली आहे.Contents1. Shirur Crime : आण्णाभाऊ साठे चौक येथे सनशयास्पद वावर!2. शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल2.1. संशयास्पदरीत्या फिरत होते3. अचानक तपासणीमुळे उडाली धान्दल4. खरेदीची पावती किंवा मालकीचा कोणताही समाधानकारक पुरावा नाही5. सारांश :6. पुढील तपासात काय उघड होणार?7. नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन8. कायदा व सुव्यवस्था — मोठा प्रश्न8.1. About The Author8.1.1. Dr.Nitin PawarShirur Crime : आण्णाभाऊ साठे चौक येथे सनशयास्पद वावर!शिरूर तालुक्यातील आण्णाभाऊ साठे चौक येथे संशयास्पद परिस्थितीत तांब्याच्या तारांचे तुकडे बाळगल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 215/2026 नुसार मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखलया प्रकरणी अजय हरीश्चंद्र पाटील (पोलीस अंमलदार, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून प्रथमेश नानासो राऊत (वय -21 वर्ष, राहणार-ढोक सांगवी, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे आणि सचिन सोपान वैराळकर (वय 24 वर्ष, सध्या राहणार- छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, रांजणगाव, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे; मूळ राहणार-किनोळा, तालुका-मोताळा, जिल्हा-बुलढाणा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयास्पदरीत्या फिरत होतेपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास आण्णाभाऊ साठे चौक, शिरूर येथे संशयास्पदरीत्या फिरताना दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी ते स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH 28 BJ 6472) वरून जात होते.अचानक तपासणीमुळे उडाली धान्दलतपासणीदरम्यान त्यांच्या जवळील काळ्या रंगाच्या बॅगमध्ये सुमारे 10 किलो वजनाच्या तांबे धातूच्या तारांचे छोटे-छोटे तुकडे आढळून आले. या तांब्याच्या तारांची अंदाजे किंमत 9,500 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एक काळ्या रंगाची Z Fast कंपनीची बॅग (किंमत अंदाजे 200 रुपये) आणि स्प्लेंडर मोटारसायकल (किंमत अंदाजे 25,000 रुपये) असा एकूण 34,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अचानक तपासणी सुरु केल्यावर आरोपीची धान्दल उडाली.खरेदीची पावती किंवा मालकीचा कोणताही समाधानकारक पुरावा नाहीसदर तांब्याच्या तारांबाबत आरोपींकडे खरेदीची पावती किंवा मालकीचा कोणताही समाधानकारक पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी दोघांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी गुन्हा 12 मार्च 2026 रोजी रात्री 11:35 वाजता एंट्री क्रमांक 73/2026 नुसार नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल अंमलदार सहायक फौजदार साबळे असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत. शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.सारांश :शिरुर गुन्हेगारी Shirur Crime घटना शिरुर शहर व तालुक्यात वाढत आहे. हा परिणाम की कारण का मुलभुत प्रश्न आहेच. मात्र नागरिक अशा घटनांमुळे चिंतेत पडतात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायम राहतो.पुढील तपासात काय उघड होणार?या प्रकरणात शिरूर पोलिसांनी आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या तांब्याच्या तारांचा स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात या तारा कुठल्या औद्योगिक परिसरातून किंवा बांधकाम साईटवरून चोरीस गेल्या असाव्यात, असा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः शिरूर परिसरातील MIDC भागात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना यापूर्वीही समोर आल्या असल्याने, या गुन्ह्याचा संबंध मोठ्या चोरीच्या साखळीशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस आता आरोपींच्या कॉल रेकॉर्ड्स, हालचाली आणि त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींची माहिती तपासत आहेत. तसेच, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. जप्त केलेल्या मोटारसायकलचा वापर इतर गुन्ह्यांमध्ये झाला आहे का, याचाही तपास सुरू आहे.नागरिकांसाठी महत्वाचे आवाहनशिरूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात कुठल्याही प्रकारची संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. विशेषतः रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या अनोळखी व्यक्ती, बांधकाम साईट किंवा औद्योगिक भागातील हालचाली यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.कायदा व सुव्यवस्था — मोठा प्रश्नअशा घटना वारंवार घडत असल्यामुळे शिरूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक प्रशासनाने अधिक कडक पावले उचलून गस्त वाढवणे, CCTV यंत्रणा सक्षम करणे आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः रात्रीच्या वेळेस सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्याचे संकेत दिले असून, संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Shirur Crime News आणखीन वाचा:Shirur Crime News : शिरूरमधील गुन्हेगारीच्या ताज्या बातम्या | Satyashodhak NewsShirur Crime: सविंदणे येथे शिक्षकाला घरात घुसून मारहाण; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखलShirur Crime News : एस.टी. आगारात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनShirur Crime : सख्या भावाला जीवे मारण्याची धमकी! गुन्हा दाखल. Shirur Crime Breaking – शिरूर तालुक्यात क्रिकेट स्पर्धेतून वाद; पिस्तुलातून फायरिंग, 7 जणांवर गुन्हा