Shirur Pune Crime Farmer Beating : शिरूर तालुक्यात दारूसाठी पैसे न दिल्याने 72 वर्षीय शेतकऱ्याला मारहाणमांडवगण फराटा येथे ज्येष्ठ शेतकऱ्यावर हल्ला; शिरूर पोलिसांत गुन्हा.

Shirur,7 August 2026

Shirur Pune Crime Farmer Beating : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून ज्येष्ठ शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात एकाविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर बातमी ….

Shirur Pune Crime Farmer Beating:दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार?

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून 72 वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirur Pune Crime Farmer Beating:मांडवगण फराटा, ता. शिरूर येथील घटना

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराम श्रीपती इथापे (वय 72, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सागर विश्वास गव्हाणे (रा. मांडवगण फराटा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 6 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.15 वाजता मांडवगण फराटा गावातील वाघेश्वर मंदिराजवळ घडली.

फिर्यादीनुसार, आरोपीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला हाताने मारहाण केली. तसेच जवळ पडलेले लाकडी दांडके उचलून तोंडावर, पाठीवर व पायावर मारहाण केली.

यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 715/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ई. कदम करीत आहेत.

Shirur Pune Crime Farmer Beating घटना पाहता व्यसनाधीनता कोनत्या थराला जाऊ शकते? हे दिसते.

FAQs

1. ही घटना कुठे घडली?

मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे येथे.

2. फिर्यादी कोण आहेत?

देवराम श्रीपती इथापे (वय 72).

3. आरोपीवर कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला?

भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352 आणि 351(2)(3) अंतर्गत.

4. तपास कोण करत आहेत?

पोलीस उपनिरीक्षक ई. कदम.

आणखीन बातम्या वाचा…

Shirur Court News ; शिरूर न्यायालयाकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दोषींना कारावासाची शिक्षा !;

Shirur Gramin Crime News : टाकळी हाजी येथे तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण; शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Shirur Crime Police Action News : आलेगाव पागा येथे 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त; एकावर गुन्हा दाखल

About The Author