Kohkadi Hit and Run Accident : Shirur Police Station building in Pune Rural, Maharashtraशिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथील मुख्य इमारतीचे दृश्य.
Advertisement
Advertisement

23 July 2026

Kohkadi Hit and Run Accident या शिरूरमधील दुर्दैवी घटनेत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे.

Kohkadi Hit and Run Accident प्रकरणात पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत एका मासे विक्रेत्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू पापाराम कनिच्छे (वय 55, रा. कोहकडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हे मंगळवारी (दि. 21 जुलै) रात्री सुमारे 8.50 वाजता सराफमळा परिसरात म्हसेकडून शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नातेवाईकासोबत पायी फिरत होते.

त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.

गंभीर जखमी झालेल्या बाळू कनिच्छे यांना तातडीने शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी मयताचे पुत्र रुपेश बाळू कनिच्छे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

Read more》》》》

Shirur Missing Girl Case: क्लासला सोडल्यानंतर 20 वर्षीय तरुणी बेपत्ता; शिरूर पोलिसांत नोंद

Shirur Drunk Driving Case : शिरुरमधे दारू पिउन वाहन चालवणे आता पडणार महागात!

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.