Advertisement पुणे, दि. १६ जुलै 2026 E20 Petrol Protest Pune : ई 20 पेट्रोलच्या सक्तीविरोधात आम आदमी पार्टी ‘चे पुणे येथे आंदोलन झाले.यावेळी गाडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.सविस्तर बातमी वाचा… Contents1 E20 Petrol Protest Pune:20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलची सक्ती?2 E20 Petrol Protest Pune: राम नाम सत्य हैं, आम जनता त्रस्त हैं, नितीन गडकरी मस्त हैं”3 वाहनानुसार इंधन निवडण्याचा पर्याय द्यावा : मागणी4 आंदोलनात ‘आप’चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई सामील!4.1 आणखीन राजकीय बातम्या वाचा—-4.2 ❤️ Support Satyashodhak Blog E20 Petrol Protest Pune:20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलची सक्ती? पेट्रोल पंपांवर ई 20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलची सक्ती केल्याच्या विरोधात आम आदमी पार्टीने शुक्रवारी अनोखे आंदोलन केले. बसंत बहार टॉकीज येथील पेट्रोल पंपापासून गाडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेऊन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. Advertisement E20 Petrol Protest Pune: राम नाम सत्य हैं, आम जनता त्रस्त हैं, नितीन गडकरी मस्त हैं” आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “राम नाम सत्य हैं, आम जनता त्रस्त हैं, नितीन गडकरी मस्त हैं” अशा घोषणा दिल्या. आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ई20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज 5 ते 15 टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचा तसेच इंजिनच्या भागांवर परिणाम होऊन दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याचा दावा केला. वाहनानुसार इंधन निवडण्याचा पर्याय द्यावा : मागणी ग्राहकांना शुद्ध पेट्रोल (ई0 किंवा ई10) उपलब्ध करून द्यावे, ई20 पेट्रोलची किंमत कमी ठेवावी आणि वाहनानुसार इंधन निवडण्याचा पर्याय द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. तसेच जुन्या वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च भरून द्यावा किंवा वाहन उत्पादक कंपन्यांनी मोफत दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. आंदोलनात ‘आप’चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई सामील! E20 Petrol Protest Pune : आंदोलनात आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांच्यासह किरण साळोखे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. आणखीन राजकीय बातम्या वाचा—- शिरूर राजकारण : सर्व बातम्या आणि विश्लेषण Aam Aadmi Party;आप मे है दम ! दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील ;आप; च्या पुनरागमनाची खूण/ चाहूल! Aap Pune News : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड Advertisement ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Vadgaon Rasai Canal Damage | वडगाव रासाई येथे कालवा फोडून शासनाचे ₹1.31 लाखांचे नुकसान; एकाविरुद्ध गुन्हा दाखल