30 August 2026 Satyashodhak Darshan : 1 — डॉक्टर म्हणवून घेताना वाटणारी लाज आणि एका आत्याची वेदनादायी कहाणी इथे लेखकाच्या अश्रुंना आवरा शकत नाहीत.Contents1. Satyashodhak Darshan का?2. Satyashodhak Darshan:Out of Box जगणे3. तरुण आत्या ! एक केवळ कल्पनेतील चित्र!3.1. About The Author3.1.1. Dr.Nitin PawarSatyashodhak Darshan का?Satyashodhak Darshan मी डॉक्टर नितीन पवार लिहीत आहे.ते आधीच घडले आहे.आता फक्त शब्दबद्ध करत आहे.Medical Doctorate हे लक्षात घ्या.अन्यथा माझ्याकडे टोचून घ्यायला रुग्णांची रांग लागेल!मी पुस्तकांचा डॉक्टर आहे.शेकडो पुस्तके मी वाचली आहेत.Satyashodhak Darshan मधे मी नमुद करतो ‘दर्शन’ हे मी थेट का लिहिले आहे?पण एक विचित्र गोष्ट आहे—कधी कधी स्वतःला “डॉक्टर” म्हणवून घेतानाही मला संकोच वाटतो.लाजच वाटते.कारण लोकांना हे माहित नसते की कोणत्याही विषयाचा डॉक्टर असू शकतो.मी वाचले आहे थायलंड नधे केश कर्तनाचे विद्यापीठ आहे.Satyashodhak Darshan:Out of Box जगणेत्यामागे माझ्या आयुष्याचा एक मोठा आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे.मी एमबीबीएसला प्रवेश घेतला होता. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचा विद्यार्थी म्हणून दोन-तीन वर्षे राहिलो. त्या काळात आयुष्यात अनेक अडचणी आल्या. सरकारी वसतिगृहाची व्यवस्था झाली नव्हती.समाजकल्याण विभागाची वसतिगृहे अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांसाठी असतात. पण त्या काळात आमच्या मेडिकल कॉलेजपासून ती व्यवस्था सहज उपलब्ध नव्हती.माझ्यासोबत अधूनमधून माझे वडील राहत असत. आम्ही दोघेच त्या परिस्थितीत जगत होतो.त्या दिवसांची आठवण झाली की माझ्या डोळ्यांसमोर एक वेगळेच चित्र उभे राहते.माझ्या अंगावर चेकचे कपडे असत. वडिलांच्या अंगावरही साधे चेकचे कपडे असत. आमच्याकडे एक ट्रंक होती. त्या ट्रंकेत आमचे थोडेफार सामान असे. गरजेपुरते कपडे, रग, ब्लँकेट आणि संसाराला म्हणावे असे काही मोजके साहित्य.माझ्या वडिलांनी आयुष्यात स्वतःच्या हौसेने नवीन कपडे घेतलेले मला फारसे आठवत नाहीत. त्यांच्या भावांकडे जास्तीचे कपडे असले की ते त्यांना मिळत. माझे काका—वामनराव नामदेव पवार आणि डॉ. यशवंत नामदेव पवार.यशवंत काका एमबीबीएस झाले होते. वामनराव काका पुण्यातील लष्करी भागातील कँटोन्मेंट परिसरात केंद्र सरकारी सेवेत क्लेरिकल पदावर होते. त्या काळात केंद्र सरकारी नोकरीला तुलनेने चांगले वेतन मिळत असे.वडिलांना एकूण चार भाऊ होते आणि त्यांच्यासह ते पाच भाऊ झाले. त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या भावंडांची आणि त्या काळच्या जीवनाची अनेक चित्रे माझ्या मनात त्यांच्या सांगण्यामुळेच तयार झाली.माझ्या वडिलांना—आप्पा, आबा नामदेव पवार—त्यांच्या एका सख्ख्या बहिणीची आठवण नेहमी असायची.तरुण आत्या ! एक केवळ कल्पनेतील चित्र!तिचे नाव मला आज पूर्णपणे निश्चित आठवत नाही; वडील तिला प्रेमाने “ताई” म्हणत. आम्ही तिला कधी पाहिले नव्हते. ती आमच्या जन्माच्या आधीच या जगातून निघून गेली होती.पण तिची कहाणी माझ्या मनात इतकी खोलवर कोरली गेली आहे की, कधी कधी मला असे वाटते—मी तिला पाहिले नसले तरी तिचे दुःख मी ऐकले आहे.जाणतो, अनुभवतो आहे.ती तरुण होती. तिचे लग्न झाले होते. तिला काही मानसिक त्रास होत असे. पण त्या काळात मानसिक आरोग्य, आजार, मानसशास्त्र किंवा वैद्यकीय उपचार यांची समज समाजात किती होती?काहीच नाही !आज आपण ज्या गोष्टींना मानसिक आजार, मानसिक ताण किंवा वैद्यकीय समस्या म्हणतो, त्याकडे त्या काळात अनेकदा वेगळ्याच नजरेने पाहिले जात असे.“भूत लागले आहे.”“करणी झाली आहे.”“काहीतरी बाहेरचे झाले आहे.”अशा समजुती समाजात खोलवर रुजलेल्या होत्या.माझ्या त्या आत्यालाही अशाच अंधश्रद्धेच्या चक्रात ढकलले गेले.तिला “भूत लागले आहे” किंवा “कुणीतरी करणी केली आहे” असे समजले गेले. भूत काढण्यासाठी एका भगताकडे, बुवाकडे किंवा देवळाशी संबंधित व्यक्तीकडे नेले गेले. उपचाराच्या नावाखाली तिच्यावर मारहाण केली जात असे.एकदा ती आपल्या आईला—माझ्या आजीला कासाबाईला—विनवणी करत होती,“अगं, मला नको मारूस… मला लागते… मला नको मारूस…”आणि मरताना म्हणाली- “आई !तुच मला मारलेस”हे शब्द माझ्या मनात आजही घुमतात.अंगावर काटा आणतात.एकीकडे तिची असहायता होती आणि दुसरीकडे तिच्या आईचीही त्या काळच्या अंधश्रद्धेने बांधलेली असहायता.आजीला वाटत होते की मुलीला लागलेले काहीतरी “बाहेरचे” काढायचे आहे. त्यामुळे तिच्यावर होत असलेली मारहाणही एका प्रकारच्या “उपचाराचा” भाग मानली जात होती.पण अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू झालेली ही हिंसा हळूहळू त्या तरुण स्त्रीचे शरीर आणि मन दोन्ही खंगवत गेली.तिची तब्येत बिघडत गेली.आणि अखेर तिचा मृत्यू झाला.ही केवळ एका स्त्रीच्या मृत्यूची कथा नव्हती.ही एका विचारपद्धतीने घेतलेला बळी होता.माझे वडील त्या घटनेचे साक्षीदार होते. पुढे ते शिक्षण घेऊन सरकारी नोकरीला लागले. काळ पुढे सरकला. त्यांची विचार करण्याची पद्धतही बदलत गेली.आणि ते मला अनेकदा सांगत—“अंधश्रद्धा आणि भूतबाधेच्या नावाखाली माझ्या तरुण बहिणीचा बळी गेला.”हे वाक्य माझ्या मनावर खोलवर कोरले गेले.वडील तिची आठवण काढत. कधी कधी त्यांच्या डोळ्यांत पाणी येत असे.मला ते पाहवत नसे.कारण मी स्वभावाने संवेदनशील होतो.माझ्या मनात प्रश्न निर्माण होत.ती त्या वेळी काय विचार करत असेल?तिला कोणी समजून घेतले असेल का?तिला कोणी सांगितले असेल का की, “तुला भूत लागलेले नाही”?तिच्या वेदनेला कोणी वैद्यकीय कारण म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल का?की तिच्या भोवती असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तिच्यात एक “भूतबाधित स्त्री”च दिसत राहिली?सर्वांत भयंकर प्रश्न हा होता—तिचे ऐकणारे कोण होते?ती पूर्णपणे बेसहारा झाली असेल.तिच्या वेदनेपेक्षा समाजाच्या समजुती मोठ्या ठरल्या.तिच्या जगण्यापेक्षा अंधश्रद्धा मोठी ठरली.आणि तिच्या शरीरावर होत असलेल्या मारहाणीपेक्षा “भूत काढण्याची” कल्पना अधिक खरी मानली गेली.माझे वडील नंतर मला सांगत की, “त्या वेळी मी डॉक्टर झालो असतो, तर हे होऊ दिले नसते.”या वाक्यात मला त्यांच्या मनातील आयुष्यभराची वेदना जाणवत असे.■ How to calm your Mind ?https://www.satyashodhak.blog/en/how-to-calm-your-mind/त्यांच्या बहिणीला आपण वाचवू शकलो नाही, याची एक खोल अपराधी भावना त्यांच्यात होती की काय—असा विचार माझ्या मनात अनेकदा येतो.आज विचार केला तर ती स्त्री जिवंत असती तर तिचे वय नव्वदीच्या आसपास गेले असते. कदाचित तिची मुले, नातवंडे, परतवंडे असती. कदाचित तिचे आयुष्य वेगळ्या दिशेने गेले असते.पण तिच्या वाट्याला आलेले आयुष्य अंधश्रद्धेने मध्येच थांबवले.आणि या घटनेने मला एक गोष्ट खूप लहान वयात शिकवली—अंधश्रद्धा ही केवळ चुकीची समजूत नसते; कधी कधी ती माणसाच्या जीवावरही उठू शकते.ही समस्या एखाद्या एका जातीपुरती मर्यादित नव्हती. भारतीय समाजाच्या अनेक स्तरांमध्ये अशा समजुती खोलवर रुजलेल्या होत्या. आमचा समाजही त्याला अपवाद नव्हता.आम्ही त्या काळच्या अस्पृश्यतेचा इतिहास घेऊन जगणाऱ्या महार समाजातील होतो. गरिबी, सामाजिक विषमता, शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धा—या सगळ्या गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या होत्या.पण माझ्या आयुष्यात एक महत्त्वाची गोष्ट घडली.माझ्या वडिलांनी त्या घटनेला विसरून जाण्याऐवजी तिचे दुःख आपल्या मनात जिवंत ठेवले.आणि कदाचित त्यातूनच माझ्या मनात प्रश्न विचारण्याची प्रक्रिया सुरू झाली.मी माझ्या आत्याला कधी पाहिले नाही.पण तिची कहाणी मी ऐकली.तिचा चेहरा मला माहीत नाही.पण तिची भीती मी कल्पनेत पाहिली.तिचा आवाज मी कधी ऐकला नाही.पण “मला नको मारूस… मला लागते…” हे शब्द माझ्या मनात कायमचे राहिले.कदाचित माणसाच्या विचारांची खरी सुरुवात तिथूनच होते—जेव्हा तो एखाद्या मृत व्यक्तीच्या जीवनाबद्दल प्रश्न विचारू लागतो.आणि स्वतःला विचारतो—“हे असे का घडले?” Satyashodhak Darshan अशाच प्रश्नांतून निर्माण होत आहे.’आतला आवाज’ मला ते इतरांना सांगण्यास सांगत आहे.माझ्या आयुष्यात अंधश्रद्धेविरोधातील विचारांची जी बीजे नंतर रुजली, त्यापैकी एक बीज कदाचित याच एका दुःखद आठवणीत पडले होते.ही माझ्या आयुष्याची केवळ एक घटना नाही.ही माझ्या विचारविश्वाचा एक मैलाचा दगड आहे.●चिंतन– प्रत्येक सुद्धा ही अंधश्रद्धाच असते.प्रत्येक विश्वास हा अंधविश्वासच असतो.कारण त्यात 100% surrender असते.प्रश्न विचारणे बंद असते.प्रत्येक माणूस अंधश्रद्धाळुच असतो.फरक विषयाचा असतो.एक एका बाबतीत तर दुसरा तिसऱ्या बाबतीत,पण अंधश्रद्धाळुच असतो.अंधश्रद्धेने मानवी इतिहासात लाखो बळी घेतले आहेत.अंधश्रद्धेतून आनंद असु शकतो.जसा अज्ञानातही असू शकतो.तसा.सेपियन्स अधिक आनंदी होते की आपण? ‘उसके मर्जी के बगैर पेड का पत्ता भी नहीं हिलता’! मग हे बळी कोण घेतो?ईश्वर?म्हणजे तो ‘खलनायक’ देखील आहे?Javed Akhtar vs Mufti Shamail : मुस्लिम विद्वानो में बडी बहस!की एक नितीहीन एलियन की Dod?की केवळ भौतिक नियम? उत्क्रान्त होत जाणारे?Fix असते तर आदर्श असण्याचीच शक्यता जास्त आहे.की relative, व्यक्तिसापेक्ष की random?– —– क्रमशः●Read more >>>>Artificial Body Future Human : भविष्याचा जाहीरनामा 3Mazi Story : माझी स्टोरी – भाग 6:“अपयश नाही, परिवर्तन होतं! माझ्या विचारांचा नवा जन्म”Human from Mars? पृथ्वीवरील माणूस मंगळावरून आला असू शकतो? विज्ञान काय सांगते?Osho : ओशो माझे गुरु कसे बनले?About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts