Shirur Ramling Gharfodi:Shirur Ramling house burglary involving theft of valuables worth Rs 4.85 lakhशिरूरच्या रामलिंग येथे घरफोडी; ४ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला
Advertisement
Advertisement

29 ऑगस्ट 2026

Shirur Ramling Gharfodi घटनेत शिरूर तालुक्यातील रामलिंग येथे ४ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.शिरूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

●Shirur Ramling Gharfodi:बंद घराचे कुलूप तोडले

रामलिंग येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८५ हजार ५० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

●Shirur Ramling Gharfodi:गंगाधर रामचंद्र भोसले फिर्यादी

ही घटना 13 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत मौजे रामलिंग, ता. शिरूर येथे घडली. याप्रकरणी गंगाधर रामचंद्र भोसले (वय 69) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement
Advertisement

●सोन्याचे विविध दागिने, चांदीच्या वस्तू आणि 3,600 रुपये रोख लंपास

फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी-कोंडे तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून त्यातील तिजोरीचा कप्पा फोडला. त्यामधील सोन्याचे विविध दागिने, चांदीच्या वस्तू आणि 3 हजार 600 रुपये रोख चोरून नेले.

चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कानातले, नथ, सातपुतळ्या आदी दागिन्यांसह चांदीचा पाळणा, चांदीच्या पादुका आणि चांदीचे गोळे यांचा समावेश आहे. चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत 4 लाख 85 हजार 50 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 772/2026, भारतीय न्याय संहिता कलम 331(2), 305 अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.07 वाजता दाखल करण्यात आला.

या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Advertisement
Advertisement

●Read more>>>>

Shirur Crime Gharphodi : शिरूरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

About The Author