Shirur Crime Gharphodi:शिरूर पोलीस ठाण्यासमोर घरफोडी प्रकरणातील कारवाईनंतर पोलीस पथकशिरूर घरफोडी प्रकरणाचा तपास करणारे पोलीस पथक आणि जप्त मुद्देमाल.

26 August 2026

Shirur Crime Gharphodi : शिरूरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १८.५ लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३ आरोपींना अटक

शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB), सासवड पोलीस आणि शिरूर पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे.

या कारवाईत पोलिसांनी तीन अट्टल चोरांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून १८ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

●Shirur Crime Gharphodi:बीएसएनएल ऑफिस अन् बंद घराला केले लक्ष्य

१२ जुलै २०२६ रोजी शिरूर येथील स्टेट बँक कॉलनीमधील बी.एस.एन.एल. (BSNL) च्या ऑफिसचे कुलूप तोडून चोरट्यांनी मदरबोर्ड व पी.सी.बी. प्लेट्स लांबवल्या होत्या.

त्याचप्रमाणे, वाडा कॉलनीतील एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा (गु.र.नं. ६४९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०५, ३३१(३)(४)) दाखल करण्यात आला होता.

● Shirur Crime Gharphodi:तांत्रिक विश्लेषण अन् गुप्त बातमीदाराचे नेटवर्क

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली.

घटनास्थळाचे सीसीसीटीव्ही (CCTV) फुटेज, गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी (कार्यपद्धती) आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास वेगाने सुरू करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संशयित आरोपी इंदापूर तालुक्यातील लासुर्णे भागात वास्तव्यास आहेत. त्यानुसार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांनी लासुर्णे परिसरात छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले.

●अटक करण्यात आलेले आरोपी:

●सुरज भिमा निंबाळकर (रा. डोरलेवाडी, ता. बारामती)

●शंकर तायप्पा घोरपडे (रा. लासुर्णे वैदवाडी, ता. इंदापूर)

●संगाम लाला शिंदे (रा. लासुर्णे, ता. इंदापूर)

●१८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या कडक चौकशीत आरोपींनी शिरूर येथील घरफोडीची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी जप्ती पंचनाम्याद्वारे

●खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

●१२१ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने

●२०० ग्राम वजनाचे चांदीचे दागिने

●एकूण बाजारमूल्य: रु. १८,५०,०००/-

सध्या तिन्ही आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्यांच्या इतर साथीदारांचा शोध शिरूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Shirur Crime Gharphodi ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

●Read more>>>>

Shirur Crime Police Action News : आलेगाव पागा येथे 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त; एकावर गुन्हा दाखल

Shirur Missing Girl Case: क्लासला सोडल्यानंतर 20 वर्षीय तरुणी बेपत्ता; शिरूर पोलिसांत नोंद

About The Author