Shirur Crime Worker Cheated:शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मजूर पुरवण्याच्या नावाखाली 12 लाख 50 हजार रुपयांची फसवणूकमजूर पुरवण्याच्या बहाण्याने 12 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक!
Advertisement
Advertisement

25 August 2026

Shirur Crime Worker Cheated : मजुरांच्या नावाखाली १२ लाख ५० हजारांची फसवणूक!सविस्तर बातमी वाचा….

शिरूर तालुक्यातील कोळपेवस्ती, मांडवगण फराटा येथील शेतकऱ्याची मजूर पुरवण्याच्या बहाण्याने १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement

●Shirur Crime Worker Cheated:विठ्ठल कोळपे फिर्यादी

याप्रकरणी बाबुराव विठ्ठल कोळपे (वय ३६, रा. कोळपेवस्ती, मांडवगण फराटा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश दल्नु चव्हाण आणि रोशन सुरेश चव्हाण (दोघे रा. हारसवाडी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

●Shirur Crime Worker Cheated:ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे सांगितले!

फिर्यादीनुसार, ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे सांगून आरोपींनी वारंवार पैशांची मागणी केली. त्यानुसार फोन पे, आरटीजीएस तसेच रोख स्वरूपात एकूण १२ लाख ५० हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर मजूर देण्याचे आश्वासन देऊन फिर्यादीला आरोपींच्या गावात बोलावण्यात आले. मात्र, मजूर उपलब्ध नसल्याचे सांगत पैसे परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. वारंवार मागणी करूनही पैसे परत न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

Advertisement
Advertisement

●शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७५९/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करीत आहेत.

●Read more

Chetak E-Bike Theft in Shirur:शिरूरमध्ये चेतक ई-बाईकची चोरी

Shirur Drunk Driving Case : शिरुरमधे दारू पिउन वाहन चालवणे आता पडणार महागात!

About The Author