Shirur Gramin Crime News : टाकळी हाजी येथे तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण; शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर, ता. २२ जुलै : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील सम्राट बारमध्ये झालेल्या वादातून एका २६ वर्षीय तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश रामदास उचाळे (वय २६, रा. टाकळी हाजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयदीप गेनूभाऊ वरखडे आणि अजित संपत वरखडे (दोघे रा. टाकळी हाजी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ जुलै २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास टाकळी हाजी येथील सम्राट बारमध्ये घडली. फिर्यादी जेवणासाठी बारमध्ये गेले असता, “ऑफिसच्या कामात अडथळा का आणतो?” असा जाब विचारत आरोपींनी लाकडी दांडक्याने तसेच मुक्काबुक्की करून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या शरीरावर काळ्या-निळ्या जखमा झाल्याचे नमूद करण्यात आले असून, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७५/२०२६ नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत. ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Karade Firing Case: करडे गावातील गोळीबार प्रकरणातील ५ सराईत आरोपी ७२ तासांत जेरबंद; शिरूर पोलिसांची धिंड रांजणगाव MIDC Motorcycle Theft प्रकरणाचा छडा; आरोपी अटकेत, चोरीची मोटारसायकल जप्त