Advertisement Karade Firing Case मधील शिरूर तालुक्यातील करडे गावात गोळीबार करणारे सराईत गुन्हेगार ७२ तासांत शिरूर पोलिसांची पकडले आहेत. अक्षरश: शिरूर पोलीसांनी करडे गावात गोळीबार करणार्यांची शहरातुन धिंड काढली आहे.वाचा सविस्तर… शिरूर (प्रतिनिधी) : (शाबान शेख यांच्याकडून) शिरूर: करडे (ता. शिरूर) येथील गोळीबार प्रकरणातील ५ आरोपी व २ अल्पवयीन मुलांना शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या ७२ तासांत सुपा येथून ताब्यात घेतले. जुन्या वादातून पिस्तूलातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. करडे (ता. शिरूर) गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरून पिस्तूलमधून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना शिरूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अवघ्या ७२ तासांच्या आत सुपा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले आहे. Contents1 Karade Firing Case : तीन राऊंड फायर केले होते !2 Karade Firing Case :शिरुर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता गुन्हा!3 अटक करण्यात आलेले आरोपी:4 आरोपी व फिर्यादी दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी:4.1 FAQs4.2 Q1. Karade Firing Case म्हणजे काय?4.3 Q2. Karade Firing Case मधील आरोपींना किती वेळात अटक करण्यात आली?4.4 Q3. या प्रकरणात गोळीबाराचे कारण काय होते?4.5 Q4. Karade Firing Case चा तपास कोण करत आहे?4.6 Q5. Karade Firing Case बाबत अधिकृत माहिती कुठे मिळेल?4.7 ❤️ Support Satyashodhak Blog Karade Firing Case : तीन राऊंड फायर केले होते ! पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास करडे गावातील तलावाजवळ जुन्या वादातून आरोपींनी निखिल सतीश थेऊरकर (वय २३) याच्यावर पिस्तूलमधून तीन राऊंड फायर केले होते. “दरम्यान शिरूर पोलीसांकडून आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली आहे.अक्षरश: शिरूर पोलीसांनी करडे गावात गोळीबार करणार्यांची शहरातुन धिंड काढली आहे.त्यामुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. “ Karade Firing Case :शिरुर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता गुन्हा! याप्रकरणी निखिलने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास पथके रवाना केली. गोपनीय बातमीदाराद्वारे आरोपी सुपा येथील बस स्टँडवर येणार असल्याची माहिती मिळताच, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि पथकाने तेथे सापळा रचून ५ मुख्य आरोपी व २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी: 1. अथर्व उर्फ टिन्या रावसाहेब शेळके (वय १९, रा. रांजणगाव) 2. रोहन उर्फ दाद्या गणेश पंचमुख (वय १९, रा. रांजणगाव) 3. आदित्य दशरथ लंगे (वय १९, रा. करडे) 4.निखिल विलास कायस्थ (वय १९, रा. कारेगाव) 5. सनि परमेश्वर मस्के (वय २०, रा. कारेगाव) आरोपी व फिर्यादी दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी: अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अथर्व शेळके आणि रोहन पंचमुख यांच्यावर यापूर्वी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणी व बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, फिर्यादी निखिल थेऊरकर हादेखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, मारहाण व अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी ५ गुन्हे दाखल आहेत. फिर्यादीने यापूर्वी आरोपींना मारहाण केली होती, त्या रागातूनच हा गोळीबार झाल्याचे तपासात समोर आले आहे. Karade Firing Case मधे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिसांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. ” टीप: या वृत्तातील माहिती शिरूर पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपी दोषी किंवा निर्दोष असल्याचे निश्चित होईल.” FAQs Q1. Karade Firing Case म्हणजे काय? उत्तर: करडे (ता. शिरूर) येथे जुन्या वादातून एका युवकावर पिस्तूलातून तीन राऊंड गोळीबार झाल्याची घटना म्हणजे Karade Firing Case होय. या प्रकरणात शिरूर पोलिसांनी ५ आरोपी आणि २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. Q2. Karade Firing Case मधील आरोपींना किती वेळात अटक करण्यात आली? उत्तर: शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या ७२ तासांच्या आत आरोपींना सुपा येथून ताब्यात घेतले. Q3. या प्रकरणात गोळीबाराचे कारण काय होते? उत्तर: पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यातील जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. तपास अद्याप सुरू आहे. Q4. Karade Firing Case चा तपास कोण करत आहे? उत्तर: या प्रकरणाचा तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक करत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचेही या तपासावर लक्ष आहे. Q5. Karade Firing Case बाबत अधिकृत माहिती कुठे मिळेल? उत्तर: या प्रकरणाबाबतची अधिकृत माहिती शिरूर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस यांच्या अधिकृत माध्यमांवरून मिळू शकते. तसेच अद्ययावत बातम्यांसाठी Satyashodhak.blog ला भेट द्या. Read more 》》》》 Shirur Crime News:शिरुरच्या एसबीआय चौकात कोयता दाखवुन दमदाटी ? Pune/Shirur News: शिरूरच्या 20 वर्षीय युवकाचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून तपास सुरू ! Shirur Taluka Crime News: लागोपाठ महिलेचे सोन्याचे गंठन हिसवावुन चोरटे पसार! ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Karade Firing ? : करडे येथे तरुणावर पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार ; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल