Ambedkar Jayanti 2026 विशेष लेख 4 – “आपली संविधानिक जबाबदारी काय असते?”
Contents
Ambedkar Jayanti 2026 Our Duties आपली ससंविधानिक जबाबदारी
प्रस्तावना
Ambedkar Jayanti 2026 Our Duties हा लेख 4 आहे. बाबासाहेब यांना एक वेगळे Tribute मी द्यावे. असे मला प्रकर्षाने वाटले. कारण मला त्यांच्यामुळेच लिहिता येते. एक साधन उपलब्ध झाले.ते कुणाच्या तरी वैज्ञानिक बुद्धीमुळे! तो पहीला मानव अज्ञात आहे.
भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख मिळवून देणारा पाया म्हणजे डॉ. बाबासाहेबाचे मु्ख्य योगदान आहे . या संविधानाच्या निर्मितीत त्यांचे योगदान अमूल्य आहे.हे सर्वाना माहिती आहे.
तरी एक गोष्ट मी नमुद करतो की बर्याच लोकांना मुलभुत स्वातंत्र्य, समता आणि बन्धुता clear झालेली नाही. सन्विधान म्हणजे काही एक जबाबदारी देखील प्रत्येक नागरिकावर असते याची. नुसते हक्क, आन्दोलन, मोर्चा, घेराव, नारे, फलक फडकावणे, उपोषण व शेवटी अगदी कारदा हातात घेऊन सरकारी मालमत्तेचे म्हणजे स्वतःचेच नुकसान करणे असे काहीसे या लोकांना वाटते.
गम्मत आहे की नाही! अतिक्रमण करताना आपण सन्विधानाचा अपमान करतो. हे जणू आपल्या गावीही नसते. शिवीगाळ, मारामारी, कौटुंबिक हिंसा, महिलांना ‘पारम्पारीक'(?) वागणूक देणे, सार्वजनिक सुविधाची नासाडी करणे, जमिनीवरुन भाऊबन्दकी, इतर नातलगाची जमीन हडपणे किंवा कुरतडणे, कर न भरणे इ. अशी एक ना अनेक ‘कर्मे’करतो. ती सन्विधानीक नसतात बरं का? सर्व कायद्यान्चे पालन करणे आपली जबाबदारी असते.
संविधान आपल्याला केवळ अधिकार देत नाही, तर आपल्या कर्तव्यांची जाणीवही करून देते. म्हणूनच “संविधान आणि आपली जबाबदारी” हा विषय आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो.आता अनेक समाज घटक जागृत होऊन अनेक माघण्या, आन्दोलने करताना दिसतात. त्यांना देखील हे लागु होते.
अधिकार आणि कर्तव्य यांचा समतोल
भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार देते. 1.स्वातंत्र्य, 2.समानता,3. शिक्षण, 4.अभिव्यक्ती यांसारखे अधिकार.बर्याच वेळा आपण इतरांचे हक्क विसरतो. स्वतःचे फक्त ध्यानात ठेवतो.
म्हणून फक्त अधिकार मिळवणे पुरेसे नाही. त्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला आपल्या कर्तव्यांची जाणीव असणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ:
• कायद्याचे पालन करणे
• इतरांच्या अधिकारांचा सन्मान करणे
• देशाच्या एकतेसाठी योगदान देणे
हा समतोलच लोकशाहीला मजबूत करतो.परिणामी हक्क, अधिकार यांचे सन्रक्षण होते. नाही तर केवळ अराजक!
लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी
• लोकशाही फक्त सरकारवर अवलंबून नसते. ती नागरिकांच्या सहभागावर टिकून असते.सकारात्मक सहभाग घेणे आवश्यक असते. विरोधासाठी विरोध,राजकीय असोत, की आर्थिक असोत की सामाजिक असोत कारस्थाने करणे आत्मघातकी असते.
• मतदान करणे,त्यासाठी पैसे न घेणे,योग्य नेतृत्व निवडणे व समाजातील प्रश्नांवर आवाज उठवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
• जर नागरिक जागरूक असतील, तरच लोकशाही सशक्त राहते.
संविधानाची जाणीव का आवश्यक आहे?
👉आज अनेकांना संविधानातील हक्क माहित आहेत, पण कर्तव्यांची जाणीव कमी आहे.
👉शाळा, महाविद्यालये व समाज माध्यमांद्वारे संविधानाचे शिक्षण दिले गेले पाहिजे.यामुळे समाजात जागरूकता वाढेल. नागरिक अधिक जबाबदार होतील.
आजच्या काळातील आव्हाने
आजच्या डिजिटल व वेगवान जगात अनेक नवीन आव्हाने समोर येत आहेत—
👉फेक न्यूज
👉द्वेषपूर्ण भाषण
👉सामाजिक तणाव
अशा परिस्थितीत संविधानातील मूल्ये—समानता, बंधुता आणि न्याय—आपल्याला योग्य दिशा देतात.पण ती माहित असतील तर!
आपण काय करू शकतो?
👉प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे.
👉सत्य माहितीच शेअर करणे
👉भेदभावाविरुद्ध उभे राहणे
👉समाजात सकारात्मक बदल घडवणे
👉छोटे छोटे प्रयत्न मोठा बदल घडवू शकतात.
निष्कर्ष
संविधान हे केवळ कागदावर लिहिलेले नियम नाहीत. तर ते आपल्या देशाचे मार्गदर्शक तत्त्व आहे.ती आपली दैनंदिन जीवन पद्धती बनली पाहिजे. शैली बनली पाहिजे. विविधता राखुन, स्वातंत्र्य राखुन, वेगळेपण जपून आणि साम्यस्थळे देखील वृद्धिंगत करुन!
जर आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, तरच संविधानाचे खरे मूल्य जपले जाईल.व्यक्ती व समाज दोन्हीचे कल्याण होईल.
म्हणूनच —
“संविधानिक जबाबदारी जपणे ही प्रत्येक भारतीयाची पहिली जबाबदारीच आहे!”
🔗 Free Authoritative Links : अधिक माहीती व अभ्यासासाठी
https://www.constitutionofindia.net
https://legislative.gov.in/constitution-of-india/
https://www.un.org/en/global-issues/democracy
Ambedkar Jayanti 2026|Tribute- 14 दिनांक – 14 क्रांतिकारी लेख |वाचा इथे>>>>
Ambedkar Jayanti 2026 | विशेष लेखमाला | 14 दिनांक 14 क्रांतिकारी लेख | लेख ; 2
Dr B R Ambedkar Biography 2026 | अभिनव अभिवादन ;14 दिन – 14 क्रांति लेख;
Dr B R Ambedkar Biography 2026 | अभिनव अभिवादन ; दिन – 14 क्रांति लेख
